सुरेश वांदिले
एक बहुआयामी, पथदर्शी, हृदयस्पर्शी, भविष्यवेधी लेखक
महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य
LATEST UPDATES.
पत्रकारापासून ते महाराष्ट्र शासनाच्या संचालक पदापर्यंतचा
३५ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास
महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समिती सदस्य
संचालक (माहिती व जनसंपर्क)
उपसंचालक- प्रकाशने आणि संपादक – लोकराज्य/ आपले मंत्रालय/ महाराष्ट्र वार्षिकी
मुख्यमंत्र्याचे जनसंपर्क अधिकारी – (श्री सुशीलकुमार शिंदे, स्व.विलासराव देशमुख, श्री अशोक चव्हाण)
जिल्हा माहिती अधिकारी- (नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर)
वरिष्ठ सहाय्यक संचालक – मंत्रालय मुंबई
सचिव – राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
उपसंपादक लोकमत
संपादक/ समन्वयक – लोकमत कॉमिक्स
संपादन – साहित्य जत्रा आणि गुरुवार पुरवणी (लोकमत)
पुढच्या पिढीच्या जडणघडणीसाठी योगदान
बालकथा
मुलांना वाचनाची आवड नसल्याचं सतत सांगितलं जातं. मात्र त्यांना आवडेल, रुचेल असं साहित्य दिलं तर ते नक्कीच त्यांच्या पसंतीस पडतं. हे लक्षात घेऊन, दररोज एक बालकथा हा डिजिटल उपक्रम सुरु केला. त्याअंतर्गत वेगवेगळ्या कथा देत गेलो. या कथांमध्ये साहस कथा, परी कथा, रहस्य कथा, प्रेरणा देणाऱ्या कथा, करिअर कथा, गंमत कथा, प्राणी कथा, पक्षी कथा, नव्या इसाप कथा अशा सर्व प्रकारातील कथा आहेत. मुलांसोबतच थोरांनांही आवडतील अशा या कथा आहेत. गोष्ट सांगता सांगता एखादा छोटासा उपदेश, मार्गदर्शन केलं जातं. रंजन हे मुख्य ध्येय्य, त्यातून मुलांना प्रेरणा मिळावी, एखादा चांगला गुण आत्मसात करता यावा, त्यांचा आत्मविश्वास वाढवा, चांगले नागरिक होण्यासाठी आवश्यक अशा कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव व्हावी, अशी माफक अपेक्षा आहे. ही अपेक्षा या कथा पूर्ण करत असल्याचे मिळालेल्या उदंड प्रतिसादावरुन दिसून येतं. दररोज एक बालकथा,हा डिजिटल उपक्रम मराठीत तरी एकमेव आहे.
प्रकाशित बालवाड्.मय
– खुल जा टिम टिम
– विचार करणारा गाढव
– यश कसं मिळतं ?
– भूताई लोटण
– बेअर्ड काका, पोपट आणि टारझन
– मूषक स्वामींचा दंगा, राणीला दंगा
– आम्ही स्मार्ट मुले
करिअर कंसेप्ट
10वी, 12वी आणि पदवी नंतर पुढे काय करायचं? हा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना कायम पडत असतो. करिअरचे विविध आणि असंख्य पर्याय उपलबध झाले आहेत. पण त्यांची नेमकी माहिती, नेमक्या वेळेला पालक आणि विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे मग अनेक संधी हुकत असतात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि अध्यापक योग्य त्या करिअर पर्यायांची माहिती विद्यार्थ्यांना देत नाहीत. त्यांनाही नव्या करिअर संधी आणि अभ्यासक्रमांची माहिती असत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन करिअर कंसेप्ट, हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. यावर 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विस्तृत माहिती, प्रवेश प्रक्रिया, चाळणी परीक्षा, रोजगार आणि स्वयंरोजगार संधी, शिष्यवृत्ती याविषयी मार्गदर्शन केलं जातं. या माहितीच्या आधारे पालक-शिक्षक-समूपदेशक-विद्यार्थ्यांना करिअर संदर्भातील स्पष्ट दृष्टीकोन मिळून त्यांची दिशा स्वयंस्पष्ट होऊ शकते.
करिअर गायडंस वर प्रकाशित पुस्तके:
– दहावी – बारावी नंतर काय?
– क्लास वन अधिकारी बनण्याचा राजमार्ग
– करिअरच्या दिशा (पदवी परीक्षेनंतर काय?)
– समृध्दीच्या दिशेने करिअर
– शिष्यवृत्ती हवी आहे काय?
– थिंक डिफरंटली बी सक्सेसफूल
– अचूक दिशा, सुयोग मार्ग (भाग एक आणि भाग दोन)
– स्मार्ट करिअर, उज्वल भविष्य (भाग एक आणि भाग दोन)
– मराठी भाषा-संधी आहे सर्वत्र
“मार्ग यशाचा”
गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधित लोकसत्तामध्ये ६० लेखांची महामालिका

सृजनात्मक योगदान
शासनाच्या विविध योजना, निर्णय आणि धोरणे याअनुषंगाने विपुल लेखन केले. नांदेड जिल्हयातील साक्षरोत्तर कार्यक्रमांतर्गत, नवसाक्षरांसाठी ५० पुस्तिकांच्या मालिकेची निर्मिती करण्यात आली. त्याचे संपादन केले. काही पुस्तकेही लिहिली. चंद्रपूर जिल्हयातील विकास कामे आणि जलसंधारणाच्या कामाच्या यशकथा लिहिता आल्या. नागरिकांच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी शासन सतत कार्यरत असतं. त्याचा फायदा अनेकांना होतो. त्यामुळे एकूणच सकारात्मकता वाढते आणि इतरांनाही हुरुप येतो.

नवसाक्षरांसाठी पुस्तके
आपला जिल्हा नांदेड
खरी शक्ती
आपला निसर्ग
दुषित पाण्याचे दुष्परिणाम
सूर्यचूल
आरोग्यम धनसंपदा

शासन संवाद
पाणलोटाचा चमत्कार
विकासाच्या वाटा
चक्र फिरतय विकासाचं
विविध विषयांवरील स्तंभलेखन
करिअर मंत्र (लोकसत्ता)
नव्या दिशा (सकाळ)
प्रतिबिंब (तरुण भारत मुंबई आणि नागपूर)
माध्यम (लोकमत)
झोका आणि धोका (कृषीवल)
नष्ट होणारे प्राणी (महाराष्ट्र टाइम्स)
अशा परीक्षा (लोकसत्ता)
मुलींसाठी शिष्यवृत्ती (डिजिटल लोकसत्ता)
कला - कौशल्य (लोकसत्ता)
जगू या आनंदाने (नवशक्ती)
नवी क्षितिजे (देशोन्नती)
शनिवार ते शनिवार (लोकमत)
कारभारी व्हा (लोकमत)
शासकीय योजना (उद्योजक)
सहावा मजला (लोकमत)
करिअर (नवराष्ट्र)
मिशन ॲडमिशन (सकाळ)
व्यवसाय मार्गदर्शन (लोकप्रभा)
क्षितिजे (जनप्रवाह)
युवास्पंदन (लोकमत)
बालमैफल (नवशक्ती)
जगणे आनंदाचे (पुण्यनगरी)
दिशा आणि दृष्टी (पुण्यनगरी)
बालकथा (नवराष्ट्र)

पुरस्कार

प्रकाशित पुस्तके

माध्यमांसोबत लेखन

स्तंभलेख

"आपणास जे ठावे, ते इतरांना द्यावे!" या शिकवणुकीनुसार गेली ३० वर्षे, विद्यार्थी, युवक, पालक, बालक यांच्यासाठी निरपेक्षपणे मनोभावे कार्यरत. कसलीही अपेक्षा नाही. इतरांना आनंद मिळावा, यशाचा मार्ग दिसावा, हीच अंतरिची इच्छा!

सुरेश वांदिले
पुरस्कार
लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार (१९८७ - ८८)
1987 - 88
लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार (१९८८ - ८९)
1987 - 88