(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,मुंबई

फॅशन लॉ

या संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमापैकी हा एक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम. याचा कालावधी सहा महिने आहे. तो कोणत्याही विषयातील पदवीधरास करता येतो. (यंदा पदवीची अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. मात्र संस्थेने निर्धारित केलेल्या कालावधीपर्यंत पदवीचा परीक्षेचा निकाल लागायला हवा.)

 या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषय घटकांचा समावेश आहे- (१) इंट्रोडक्शन टू फॅशन लॉ, (२) फॅशन लॉ ॲण्ड बिझिनेस – यामध्ये ब्रँड सेटअप, सप्लाय चेन, डिस्ट्रिबुशन प्रोसेस, बिझिनेस प्लॅन, फ्रँचायजी, सेल्स ॲण्ड मार्केटिंग, बिझिनेस काउंटरिफिटिंग, प्रॉडक्ट काउंटरिफिटिंग, इंटरनॅशल ट्रेड, कंम्प्लेंट मेकॅनिझम, प्रॉडक्ट लायबिलिटी, कंझ्युमर प्रोटेक्शन, एम्प्लॉयमेंट नेचर ॲण्ड ॲग्रिमेंट्स, ॲप्लिकेबल लॉज, वर्किंग अवर्स, वर्किंग कंडिशन, प्रिव्हेंशन ऑफ सेक्सुअल हरॅसमेंट, राइटस ऑफ वर्कर्स, राईटस ऑफ फॅशन मॉडेल्स ,वेलफेअर स्किम. या उपविषयांचे ज्ञान प्रदान केलं जातं. (३) फॅशन लॉ ॲण्ड निगोशिएशन- यामुख्य विषयांतर्गत फ्रँचाइज ॲग्रिमेंट, नॉन डिस्क्लोजर ॲग्रिमेंट, सेलिब्रेटी/इंफ्ल्युअर्स ॲग्रिमेंट, मॉडेलिंग ॲग्रिमेंट, डिस्ट्रिब्युशन ॲग्रिमेंट, व्हेंडर ,सप्लायर ॲग्रिमेंट, मॅन्युफॅच्युरर ॲग्रिमेंट, लायसनिंग ॲग्रिमेंट. या उपविषयांचा समावेश आहे. (४) फॅशन लॉ ॲण्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी या मुख्य विषयांतर्गत कॉपीराईटस, ट्रेड मार्क ॲण्ड ट्रेड ड्रेस, डिझाइन, पॅटेंट, जिऑग्रॅफिकल इंडिकेशन, डोमेन नेम, ट्रेड सिक्रेट, इंटरनॅशनल फायलिंग, या उपविषयांचा समावेश आहे.

 

मुंबई येथे असणारी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना २०१४ साली झाली. एका दशकानंतर ही संस्था देशातील विधि शिक्षण देणारी आघाडीची संस्था झाली आहे. या संस्थेत विधिविषयक प्रगत शिक्षण दिलं जातं. समाजाच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या विषयांवर संशोधन केलं जातं. सामाजिक परिवर्तन आणि विकासासाठी विद्यार्थ्यांना विधि सेवा, विधि सुधारणा, प्रगत विधी ज्ञान आदी विषयघटकांचं ज्ञान व कौशल्य मिळवून देणं हा आहे. सुरुवातीपासून या संस्थेने संशोधन आणि शिक्षण यात गुणवत्ता आणि दर्जा प्राप्त करुन तो सातत्याने वाढवला. बार काऊसिंल ऑफ इंडिया आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. मुंबईतील रम्य अशा पवई परिसरात संस्थेचं कॅम्पस आहे. समकालीन समाजात निर्माण होत असलेल्या नैतिक आणि तात्विक समस्यांच्या निराकरणासाठी संशोधन कार्यास या संस्थेनं प्राधान्य दिलं आहे. क्लिनिकल लिगल एज्युकेशन, क्रिमिनल जस्टिस, मेरिटाइम लॉ आणि रिसर्च, इंटलेक्चुअल प्रॉपटी, टॅक्सेशन लॉ, आर्बिट्रेशन, मेडिएशन ॲण्ड इन्फॉर्मेशन  टेक्नॉलॉजी या सारख्या विषयांवर संशोधन केंद्र सुरु केले आहेत. पर्यावरण विषयक विधि अभ्यासक्रमाचं अध्यासन या संस्थेत सुरु करण्यात आलय. केंद्र सरकारच्या, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रिज ॲण्ड इंटरनॅशनल ट्रेडने या विद्यापीठाला, आयपीआर (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिसर्च) अध्यासन मंजूर केलं आहे. अनेक परदेशी विद्यापीठांसोबत या संस्थेने संशोधनासाठी सहकार्याचे करार केले आहेत.

अभ्यासक्रम

या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करण्याची सुविधा आहे- (१) बीए-एलएलबी. (२) एलएलएम इन (अ) कॉर्पोरेट लॉ, (ब) मेरिटाइम लॉ, (क) काँस्टिट्युशनल लॉ. या सर्व अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी एक वर्षे. अर्हता-एलएलबी.या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी क्लॅट (पोस्ट ग्रॅज्युएट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. (३) एलएलएम इन इनव्हेस्टमेंट ॲण्ड सेक्युरिटीज लॉ. हा अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट आणि सेबी-सेक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं सुरु करण्यात आला आहे. (४) एमबीए.

एमबीए

या अभ्यासक्रमामध्ये  दोन स्पेशलायझेशनचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. (१) इंटरनॅशनल बिझिनेस टॅक्सेशन ॲण्ड लॉ आणि (२) कॉर्पोरेट फायनांस ,बँकिंग ॲण्ड लॉ.

दोन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील पदवीधरास प्रवेश घेता येतो. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यास ५० टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती संवर्गातील विद्यार्थ्यास ४५ टक्के गुण मिळायला हवेत.

संपर्क- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दुसरा माळा, सीईटीटीएम, एमटीएनएल   बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई मुंबई-४०००७६,ईमेल- nlumumbai@mnlumumbai.edu.in संकेतस्थळ- mnlumumbai.edu.in

दूरध्वनी-०२०-२५७०३२८९

 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औंरगाबदच्या अंतर्गत, स्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. या स्कूलमार्फत व्यवस्थापन व विधी शिक्षणाचे सांगड घालणारे पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

(१) बीबीए- एलएलबी कालावधी-पाच वर्षे, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

(२) इंटिग्रेटेड बीबीए-एमबीए इन लॉ ॲण्ड मॅनेजमेंट, कालावधी-पाच वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ६० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यापैकी ३७ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ३० टक्के जागा महिलांसाठी व ५ टक्के जागा दिव्यांग संवर्गासाठी राखीव आहेत. इतर २३ जागा या अखिल भारतीय स्तरावरील आहेत.

(३) एमबीए  इन-फायनांशिअल सर्व्हिसेस ॲण्ड कोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन, कालावधी-दोन वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वाटर लॉ, पॉलिसी ॲण्ड गर्व्हनन्स- हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम वॉटर पॉलिसी सेंटरच्‍या सहकार्यानं सुरु करण्यात आला आहे. पाण्याच्या अनुषंगानं सध्या निर्माण झालेल्या समस्या आणि प्रश्न, भाविष्यातील व्यामिश्र समस्या याविषयी सखोल ज्ञान, देणारा हा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येतो. क्लॅट- पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

संपर्क-  महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी, पैठण रोड कांचनवाडी, औरंगाबाद-४३१००५, ईमेल- support@mnlua.ac.in संकेतस्थळ https://mnlua.ac.in/contact

०००

०००

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूर

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूरने, एमबीए इन इंश्युरंस हा दोन वर्षे कालवधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना १० वी, १२वी  आणि कोणत्याही विषयातील पदवी अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी ७० टक्के वेटेज हे शैक्षणिक कामगिरीला दिलं जातं. प्रत्येकी १५ टक्के वेटेज हे समुह चर्चा आणि मुलाखतीला दिलं जातं. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.

संपर्क- https://nlujodhpur.ac.in/university/mba-insurance

०००

नॅशनल लॉ  स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी -बेंगळुरु

नॅशनल लॉ  स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी -बेंगळुरु, मार्फत दोन वर्षे कालावधीचा, मास्टर इन पब्लिक पॉलिसी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. इच्छूक उमेदवारांना कोणत्याही विषयातील पदवी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी, नॅशनल लॉ स्कूल ॲडमिशन टेस्ट (एनएलएसएटी) ही परीक्षा द्यावी लागते.

संपर्क-https://www.nls.ac.in/programme/master-of-public-policy/

००००

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद

नॅशनल ॲकॅडेमी ऑफ लिगल स्टडीज ॲण्ड रिसर्च (नाल्सार) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद

या संस्थेच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात- (१) बीबीए- एमबीए (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेट). या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा (नालसार मॅनेजमेंट एंट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट) अथवा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्फत घेण्यात येणाऱ्या आयपीएमएटी (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट) चाळणी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात.

(२) एमबीए- या अभ्यासक्रमांतर्गत (१) कोर्ट मॅनेजमेंट, (२) इनोव्हेशन ॲण्ड सस्टेनिबिलिटी मॅनेजमेंट, (३) सप्लाय चेन ॲण्ड ऑपरेशन मॅनेजमेंट, (४) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, (५) बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (६) बिझिनेस रेग्युलेशन्स, (७) कॉर्पोरेट गर्व्हनन्स, (८) मार्केटिंग (९), फायनांशिअल सर्व्हिसेस ॲण्ड कॅपिटल मार्केट्स. या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना कोणत्याही विषयातील पदवी परीक्षेत  किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन ॲडमिशन टेस्ट या परीक्षेत  ७० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज नसते.

संपर्क -https://doms.nalsar.ac.in/

सुरेश वांदिले