वेगळया वाटा,अनोखी संधी
अग्निशमन अधिकारी
अग्निशमन हा अतिशय महत्वाचा विषय आहे. वाढत्या शहरीकरणामुळ या क्षेत्राचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललय. मात्र त्या तुलनेत या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्ती कमी प्रमाणात उपलब्ध आहेत . ही उणीव दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालनालयाअंतर्गत कार्यरत, राज्य अग्निशमन अकादमीने उपस्थानक अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उतीर्ण झालेल्या पुरुष विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी -५२ आठवडे.
संपर्क- महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालनालय, विद्यानगरी,हंस भुग्रा मार्ग, सांताक्रुझ, पूर्व मुंबई- ४०००९८, दूरध्वनी -०२२-२६६७७५५५, फॅक्स-२६६७७६६६ संकेतस्थळ- http://www.mahafireservice.gov.in,ईमेल-info@ mahafireservice.gov.in
000
सुरेश वांदिले