
अनोखे सामर्थ,वेगळे अभ्यासक्रम!
दिव्यांगांना अनोख्या सामर्थ्याचे धनी समजले जाते. त्यांना तंत्रशुध्द पध्दतीने शिक्षण-प्रशिक्षण दिले गेल्यास, ते स्वबळावर आयुष्य जगू शकतात. विविध प्रकाराचे अपंगत्व असलेल्या व्यक्तिंना शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या मनुष्यबळनिर्मितीसाठी, भारत सरकारने स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, हे अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देतात.
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन)– या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या, दिव्यांगजन मंत्रालयाने १९८३ साली केली. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. दिव्यांगाच्या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी, शिक्षण- प्रशिक्षण-संशोधन, असे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात.
अभ्यासक्रम
बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी ॲण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी (बीएएसएलपी)- हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी, स्वतंत्र श्रणवतज्ज्ञ किंवा भाषा पॅथॉलॉजिस्ट म्हणून स्वतंत्रपणे कार्य करु शकतात. वेगवेगळया रुग्णालयातील, कान-नाक-घसा विभाग, पुनर्वसन औषध (रिहॅबिलिटेशन मेडिसीन), न्युरॉलॉजी, पेडिॲट्रिक्स, प्लॅस्टिक सर्जरी आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन विभागांमध्ये, श्रणव आणि भाषा केंद्र, श्रवण साहाय्यता साहित्य (हिअरिंग एड इंडस्ट्री) उद्योग, दिव्यांग मार्गदर्शन केंद्र, दिव्यांग शाळा, प्रशिक्षण कार्यक्रमातील संशोधन साहाय्यक, अशा करिअर संधी मिळतात.
अर्हता– १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित किंवा जीवशास्त्र हे विषय अभ्यासणे आवश्यक. (खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के),(कॅम्पस- मुंबई, कोलकाता, सिकंदराबाद, नॉयडा). कालावधी – ४ वर्षे.
२) बॅचलर ऑफ एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (बीएड- हिअरींग इम्पेअरमेंट), अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी (खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के), (कॅम्पस- मुंबई, कोलकाता, सिकंदराबाद, जान्ला) कालावधी-दोन वर्षे.
३) डिप्लोमा इन इंडियन साइन लँग्वेज इंटरप्रिटर कोर्स, अर्हता – कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के). (कॅम्पस- कोलकाता, जान्ला, अहमदाबाद आणि मुंबई) कालावधी दोन वर्षे.
४) मास्टर ऑफ सायंस इन ऑडिऑलॉजी- हा अभ्यासक्रम मुंबई आणि सिकंदराबाद येथे करता येतो.
अर्हता- बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी ॲण्ड स्पिच लँग्वेज पॅथालॉजी, (खुला संवर्ग ५५ टक्के आणि राखीव संवर्ग- ५० टक्के), कालावधी- दोन वर्षे.
५) मास्टर ऑफ सायंस इन स्पिच लँग्वेज पॅथालॉजी – हा अभ्यासक्रम कोलकाता येथे करता येतो. अर्हता- बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी ॲण्ड स्पिच लँग्वेज पॅथालॉजी, (खुला संवर्ग ५५ टक्के आणि राखीव संवर्ग- ५० टक्के). या अभ्यासक्रमाला वेस्ट बेंगाल युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायंसव्दारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. कालावधी- दोन वर्षे.
दोन्ही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेले उमेदवार शिक्षकांना प्रशिक्षित करु शकतात, प्रशिक्षण संस्थांमध्ये मास्टर ट्रेनर्स, शिक्षण संस्थांमध्ये प्राचार्य , अध्यापक, शिक्षक, संशोधन अधिकारी म्हणून कार्य करु शकतात.
६) मास्टर ऑफ एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (हिअरिंग एम्पेरमेंट) -हा अभ्यासक्रम मुंबई येथे करता येतो. (अर्हता- बीएड एचआय, बीएड डीफ, बीएड स्पेशल एज्युकेशन, खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के)
७) डिप्लोमा इन एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (हिअरिंग एम्पेरमेंट) -हा अभ्यासक्रम कोलकाता, नॉयडा, सिकंदराबाद, जान्ला येथे करता येतो. अर्हता – कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के), कालावधी- दोन वर्षें
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना, पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून संधी मिळू शकते. श्रवणदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्राथमिक विभागात शिकवू शकतात.
८) डिप्लोमा इन टिचिंग साइन लँग्वेज इंटरप्रिटर कोर्स, अर्हता – कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के). हा अभ्यासक्रम कोलकता, गोवा, जान्ला, सिकंदाराबाद आणि मुंबई येथे करता येतो. कालावधी दोन वर्षे.
९) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑडिटरी व्हर्बल थेरपी (पीजीडीएव्हीटी)– हा अभ्यासक्रम मुंबई येथे करता येतो. कालावधी- एक वर्षं.
१०) बॅचलर ऑफ एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (इंटलेक्चुअल ॲण्ड डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी), अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी (खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के), हा अभ्यासक्रम अहमदाबाद कॅम्पसमध्ये चालवला जातो.
११) डिप्लोमा ऑफ एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (इंटलेक्चुअल ॲण्ड डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी) -हा अभ्यासक्रम अहमदाबाद येथे करता येतो. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के
१२) डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज ॲण्ड स्पीच- हा अभ्यासक्रम जान्ला येथे करता येतो. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी खुला संवर्ग ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के,कालावधी-एक वर्षं.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२५ आहे.
बीएएसएलपी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा २८ जून २०२५ रोजी, मुंबई आणि नागपूर येथे होईल. एम.एस्सी ऑडिऑलॉजी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा १२ जुलै २०२५ रोजी, मुंबई आणि नागपूर येथे होईल. एमएड- स्पेशल एज्युकेशन (हिअरिंग एम्पेअरमेंट), बीएड- स्पेशल एज्युकेशन (हिअरिंग एम्पेअरमेंट), पीजीडीएव्हीटी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा परीक्षा, २६ जुलै २०२५ रोजी, मुंबई आणि नागपूर येथे होईल.
संपर्क – अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) के. सी. मार्ग बांद्रा रिक्लेमेशन बांद्रा वेस्ट, मुंबई- ४०००५०, दूरध्वनी- ०२२-२६४०१५२९, संकेतस्थळ- https://ayjnishd.nic.in/ ईमेल-ayjnihh-mum@nic.in
०००
दिव्यांगांसाठी कौशल्य अभ्यासक्रम
याच संस्थेत श्रवणदोष आणि भाषा दोष (हिअरिंग ॲण्ड स्पीच डिसॅबिलिटी) दिव्यांगासाठी पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत- (१) सर्टिफिकेट कोर्स फॉर डाटा एन्ट्री, अर्हता- दहावी उत्तीर्ण, कालावधी- सहा महिने. हा अभ्यासक्रम नि:शुल्क आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी दरमहा हजार रुपये आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांला दीड हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. दिव्यांगांच्या सहाय्यासाठी असणाऱ्या उपकरणासाठी प्रशिक्षण संपल्यावर ५ हजार रुपये, प्रशिक्षण संपल्यावर प्लेसमेंटच्या अनुषंगाने दोन ते सहा महिन्यासाठी दरमहा ३ हजार रुपये दिले जाते.
संपर्क- सोशिओ इकॉनॉमिक रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट, रुम नंबर डी १०४, फर्स्ट फ्लोअर, एवायजेएनआयएसडीएच (डी), मुंबई, दूरध्वनी- ०२०-६९१०२१०१
(२) सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर (अर्हता- दहावी उत्तीर्ण, कालावधी- एक वर्षं), (३) सर्टिफिकेट कोर्स इन डाटा एन्ट्री ऑपरेटर (अर्हता- दहावी उत्तीर्ण, कालावधी- सहा महिने), (४) सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक ॲनिमेशन (अर्हता- बारावी उत्तीर्ण, कालावधी- सहा महिने), हे अभ्यासक्रम नि:शुल्क आहेत. डे स्कॉलरला ४०० रुपये आणि वसतीगृहात राहणाऱ्यांना दरमहा ७०० रुपये विद्यावेतन दिले जाते.
(५) वेगवेगळया स्पर्धा परीक्षांना बसलेल्या किंवा बसू इच्छिणाऱ्या दिव्यांगांना कोचिंग (प्रशिक्षण)- अर्हता १२वी/पदवी. कालावधी- ९ महिने. दरमहा ४००० रुपये विद्यावेतन आणि दोन हजार रुपये दिव्यांग साहाय्यता दिले जाते. पुस्तकांसाठी ५ हजार रुपयांचे साहाय्य केले जाते.
०००
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हिअरिंग, म्हैसुरु
(१) डिप्लोमा इन हिअरिंग एड ॲण्ड इअरमोल्ड टेक्नालॉजी, अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स विषयासह आयटीआय/ कालावधी- १ वर्षं, (२) डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहूड स्पेशल एज्युकेशन हिअरिंग एम्पेअरमेंट, अर्हता-१२ वी / कालावधी- १ वर्षं, (३) डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज ॲण्ड स्पीच, अर्हता-१२ वी / कालावधी- १ वर्षं, (४) बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी ॲण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी- अर्हता-१२ वी / कालावधी- ४ वर्षं, (५) बॅचरल ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग एम्पेरमेन्ट, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या कालावधी – २ वर्षं. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.
संपर्क– ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हिअरिंग, नैमिशाम कॅम्पस, मानसगंगोत्री, म्हैसूर- ५७०००६, दूरध्वनी- ०८२१- २५०१०५१५, संकेतस्थळ – www.aiishmysore.in, ईमेल- director@aiishmysore.in
सुरेश वांदिले