अभियांत्रिकीमधील संधी -१
गेल्या काही वर्षात देशातील काही खाजगी अभियांत्रिकी संस्थांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने मोठी झेप घेतली आहे. यातील बहुतेक संस्थांना स्वायत्तता मिळाली असल्याने, आधुनिक काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम या संस्थांनी सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम वर्षानुवर्षे तसेच चालत राहावे,असा या संस्थांचा दृष्टिकोन दिसून येत नाही. औद्योगिक जगतास आवश्यक असणारे तंत्रज्ञान आणि कौशल्य याची जाण ठेऊन तत्परतेने अभ्यासक्रमांमध्ये बदल केला जातो.
या संस्थांमध्ये प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. अशा काही संस्थांमधील प्रवेशासाठी विचार करण्यास हरकत नसावी.
केंद्रीय शिक्षण मंत्रालया (मनुष्यबळ विकास मंत्रालय)मार्फत दरवर्षी नॅशनॅल इंस्टिट्यूशनल रँकिंग (एनइआरएफ) फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत विविध ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यामध्ये यातील बहुतेक संस्थांचा क्रमांक पहिल्या 100 मध्ये लागत असतो.
यापैकी काही संस्था –
(1)वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी–
ही आपल्या देशातील महत्वाची खाजगी संस्था आहे. या संस्थेला एनआयआरएफ रँकिंगमध्ये 16 वा क्रमांक मिळाला आहे. संस्थेची सातत्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन या संस्थेस भारत सरकारने इंस्टिट्यूट ऑफ एमिनन्स, हा दर्जा दिला आहे. यामुळे या संस्थेला अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्याची स्वायत्तता प्राप्त झाली आहे.
या संस्थेचे भोपाळ, वेल्लोर,चेन्नई आणि अमरावती(आंध्रप्रदेश) या ठिकाणी कॅम्पस आहेत. यासंस्थेत पुढील शाखांमध्ये बी.टेक अभ्यासक्रम करता येतात.
स्पेशलायझेशन
कॉम्प्युटर सायन्स- संगणकीय अभ्यासक्रमांच्या स्पेशलायझेनच्या सध्याच्या काळात सर्वाधिक मागणी असणारे पुढील अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरु केले आहेत. – कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1) इन्फर्मेशन सेक्युरिटी, (2) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (3) सायबर फिजिकल सिस्टिम्स, (4) बिझिनेस सिस्टिम्स (हा अभ्यासक्रम टीसीएस कंपनीच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे.), (5) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (6) डेटा सायन्स, (7) डेटा ॲनालिटिक्स ,(8) नेटवर्किंग ॲण्ड सेक्युरिटी, (9) गेमिंग टेक्नॉलॉजी, (10) सायबर सेक्युरिटी ॲण्ड डिजिटल फॉरेन्सिक,(11) ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, (12) आर्टिफिशिअल टेक्नॉलॉजी ॲण्ड रोबोटिक्स.
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1)रोबोटिक्स, (2)बायोइन्फर्मेटिक्स.
इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग इन– (1) बायोमेडिकल इंजिनीअरिंग, (2) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड सायबरमेटिक्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1)ऑटोमेटिव्ह इंजिनीअरिंग, (2) गेमिफिकेशन, (3) प्रॉडक्शन ॲण्ड इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, (4) मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड ऑटोमेशन,
निवड प्रकिया-
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व्हीआयटी ऑनलाइन एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. ही परीक्षा 12 वी विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या अभ्यासक्रमांवर आधारित वस्तुनिष्ट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पध्दतीची आहे.
महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक.
प्लेसमेंट – या संस्थेकडे मोठ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी जात असतात. संस्थेच्या सांख्यिकी माहितीनुसार 2019 साली या संस्थेतील विविध शाखांमधील 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना, त्यांची गुणवत्ता आणि शैक्षणिक कामगिरीनुसार प्लेसमेंट मिळाले आहे. गेल्या वर्षी 500 हून अधिक कंपन्यांनी प्लेसमेंट प्रकियेत सहभाग घेतला.
संपर्क– व्हीआयटी, वेल्लोर- 632014, तामिळनाडू, टेलेफॅक्स- –0416-2243091, ई-मेल-info@vit.ac.in, संकेतस्थळ-vit.ac.in
(2)एसआरएम इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी
या संस्थेला एनआयआरएफ रँकिंगमध्ये 43 वा क्रमांक मिळाला आहे. या संस्थेचे, सोनपत (हरयाणा), एनसीआर(दिल्ली) आणि अमरावती (आंध्रप्रदेश) येथे कॅम्पस आहेत. या संस्थेने पारंपरिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक विषयांचे पुढील अभ्यासक्रम गेल्या काही वर्षांमध्ये सुरु केले आहेत.
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1) सायबर सेक्युरिटी, (2) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (3) बिग डेटा ॲनालिटिक्स, (4) क्लॉउड कॉम्प्युटिंग, (5) नेटवर्किंग, (6) इंटरनेट ऑफ थिंग्ज.
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – (1) स्मार्ट ग्रीड कॅरेक्टिरिस्टिक्स ॲण्ड डिझाइन, (2) इंडस्ट्रिअल ऑटोमेशन ॲण्ड कंट्रोल, (3) नॉनलिनिअर डायनामिकल सिस्टिम्स ॲण्ड कंट्रोल.
सिव्हील – (1) एन्व्हरॉन्मेन्टल इंजिनीअरिंग, (2) ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, (3) स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन –(1) स्मार्ट मॅन्युफॅक्चुरिंग, (2) वायरलेस सेन्सर नेटवर्क, मेकॅनिकल –(1) मटेरिअल्स ॲण्ड थ्रीडी प्रिंटिंग, (2) रोबोटिक्स ॲण्ड मेकॅट्रॉनिक्स /ऑटोमोटिव्ह, निवड प्रकिया
या अभ्यासक्रमांना एसआरएम जॉईंट इंजिनीअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही संगणकाधारित(कॉम्प्युटर बेस्ड-ऑनलाइन) परीक्षा आहे. महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर, औेरंगाबाद,लातूर आणि नाशिक
प्लेसमेंट
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील या संस्थेचा दर्जा लक्षात घेऊन देशातील महत्वाच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सामील होतात. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 600हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी हजेरी लावली. त्यात 7 हजाराहून अधिक ऑफर्स विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या संस्थेतील महिला विद्यार्थ्यांसाठी शेल इंडिया, सेंट गोबेन, आयबीएम, केपजेमिनी या कंपन्या विशेषत्वाने भरती प्रक्रिया राबवतात.
संपर्क- एसआरएम नगर, कट्टंककुलाथूर-603203, दूरध्वनी-044-27417000, फॅक्स-27417499, ई-मेल-admissions.india@srmist.edu.in ,संकेतस्थळ-srmist.edu.in.
इतर अभ्यासक्रम
या संस्थेमध्ये पुढील 16 शाखांमध्ये बी.टेक अभ्यासक्रम करता येतात. ऑटोमोबाइल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, एरोनॉटिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंस्ट्रुमेंटेशन, बायोमेडिकल, बॉयोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मीडिया टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल ॲण्ड प्रॉडक्शन, कॉम्प्युटर ॲण्ड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन.