(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अमृततूल्यची” चढती कमान!

सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे  अमृततूल्य चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत, “अमृततूल्य”ची सर्वत्र चलती आहे.यवतमाळमध्ये “पेनकिलर अमृततूल्य” चहाने सर्वांना आकर्षित केलं आहे.चहांची दुकानं चहाच्या टपऱ्यांपासून ते अमृततूल्यपर्यंतचा हा प्रवास चहाच्या अतिशय वाढलेल्या लोकप्रियतेचा पुरावा होय.

या अमृततूल्य चहाची,” निर्मिती-उत्पादन- चहा लागवड- चहा शेतीशी निगडित खते-कीटकनाशक निर्मितीचे कारखाने,” यासाठी तज्ज्ञ व्यवस्थपकांची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ बेंगालने, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टी मॅनेजमेंट, हा स्वयंसहाय्यीत अभ्यासक्रम १९९६ साली सुरु केला. चहामळे आणि चहा निर्मिती कारखान्यांमधील उत्पादन, विक्री, विपणन आणि व्यापार या क्षेत्रातील सर्व पैलुंच्या सैध्दांतिक बाबी उमदेवारांना कळव्यात यादृष्टिने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमदेवारांना (१)चहामळे, (२)चहा निर्मिती कारखाने, (३)चहा उत्पादनाशी संबंधित कृषीरासायनिक कारखाने, (३)खत कारखाने आणि (४)टी ब्रोकर कंपन्यामध्ये साहाय्यक व्यवस्थापक या पदावर रोजगाराची संधी मिळू शकते.

चहा लागवड, व्यवस्थापन याक्षेत्रातील कार्यात्मक ज्ञान, कौशल्यप्राप्तीसाठी आणि  सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांना त्यांचे ज्ञान – कौशल्यवृध्दी व पुढील प्रगतीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.

 अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास प्रवेश मिळू शकतो. उमेदवाराचे कमाल वय १ जून रोजी २५ वर्षे असावे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे – () चहाचे वनस्पतीशास्त्र आणि चहाची रोपवाटिका, () मृदा आणि जलव्यवस्थापन, () किटकनाशक व्यवस्थापन, () चहाचे कृषीशास्त्र, () चहाच्या सर्वसामान्य बाबी, () जैवरसायनशास्त्र आणि चहा उत्पादन, () कामगार कायदे आणि व्यवस्थापन, () चहाचे अर्थशास्त्र, () संगणकाचा वापर.

निवड प्रकिया- या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी त्यांना पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाते. उपलब्ध जागा आणि राखीव जागेचे निकष लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो. अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास चाळणी परीक्षा घेतली जाऊ शकते. या अभ्यासक्रमाचा कालावधी-एक वर्षं आहे.

या संस्थेमध्ये पुढील अभ्यासक्रमही करता येतात- () बीएस्सी इन टी सायंस.कालावधी- ३ वर्षे,() एम.एस्सी इन टी सायंस. कालावधी- २ वर्षे. () एम.फिल इन टी सायन्स. () पीएचडी इन टी सायंस.

संपर्क – युनिव्हर्सिटी ऑफ नार्थ बेंगाल, पोस्ट ऑफिस- राजा राममोहनपूर, जिल्हा- दार्जिलिंग सिलीगुरी – ७३४०१३, दूरध्वनी- ०५३- २७७६३३१, संकेतस्थळ – www.nbu.ac.in,ईमेल-regnbu@nbu.ac.in

०००