(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अर्थशास्त्र हा अत्यंत महत्वाचा विषय. कोणत्याही देशासाठी कळीचे मुद्दे ठरणाऱ्या दारिद्य, असमानता, शिक्षण, आरोग्य सुविधा, बेरोजगार, कर प्रणाली, जागतिक तापमानवाढ, वैश्विकीकरण आदी सार्वजनिक हिताच्या विषयांचा या शाखेत सखोल अभ्यास केला जातो. १२ वी आणि पदवी नंतर पुढे काय? किंवा पुढे काय होणार? या प्रश्नाच्या विळख्यातून सुटण्याचा मार्ग अर्थशास्त्राच्या अभ्यासातून जाऊ शकतो. मात्र, हा काही सोपा आणि उरकून टाकण्याचा विषय नाही. याचा अभ्यास दर्जेदार संस्थांमधून करायला हवा. अभ्यासक्रमाच्या कालावधीत या विषयाच्या सैध्दांतिक ज्ञानाचा पाया पक्का आणि स्वयंस्पष्ट झाला तरच करिअर संधी मिळणे अवघड जाणार नाही. किमान १२ वीपर्यंत किंवा १२ वीमध्ये गणित अथवा सांख्यिकीचा अभ्यास केलेला असल्यास उत्तम.

काही महत्वाच्या संस्था

  • मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेला, इंस्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा तामिळनाडू सरकारने दिला आहे. ही स्वायत्त संस्था आपली स्वत:ची पदवी प्रदान करु शकते. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासोबतच संशोधनाची सुविधा आहे.

(१) बीए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स- अर्हता- ६५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण. नॉन क्रिमिलिअर इतर मागास संवर्ग ६० टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्ग ५५ टक्के

(२) एम.ए  इन इकॉनॉमिक्स

या अभ्यासक्रमात पुढील स्पेशलायझेशनची सुविधा आहे- (१) एनव्हिरॉन्मेंटल इकॉनॉमिक्स, (२) फायनांशियल इकॉनॉमिक्स, (३) ॲक्चुरिअल इकॉनॉमिक्स, (४) जनरल इकॉनॉमिक्स, (५) ॲप्लाइड क्वाँटिटेटीव्ह फायनांस.

हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना- (१) एचएसबीसी, (२) आयएफएमआर, (३) सिटीग्रुप ग्लोबल सर्व्हिसेस, (४) इन्फोसिस बीपीओ, (५) जेनपॅक्ट, (६) हेवलेट पॅकार्ड, (७) सिम्फोनी, (८) म्यु सिग्मा, (९) नाथन असोशिएटस या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळालं आहे.

(३) एम.एस्सी इन डाटा सायंस  

दोन्ही पदव्युत्तर पदवीसाठी अर्हता- ५५ टक्के गुणांसह, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान, अभियां‍त्रिकी  किंवा सामाजिक शास्त्रातील पदवी. नॉन क्रिमिलिअर इतर मागास संवर्ग ५० टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्ग ४५ टक्के. डाटा सायंस अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- प्रत्येकी दोन वर्षे

पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला संस्थेच्या वतिने घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- गांधी मंडपम रोड, बिहाइंड गव्हर्मेंट डाटा सेंटर, कोट्टूपूरम चेन्नई – ६०००२५, दूरध्वनी- ०४४- २२३००३०४,ईमेल-info@mse.ac.in, संकेतस्थळ- mse.ac.in

०००

(२) गोखले इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पॉलिटिक्स

१९३० साली स्थापन झालेली ही आपल्या देशातील अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि संशोधन करणारी सर्वात जुनी संस्था. या संस्थेने गेली अनेक दशके आपली गुणवत्ता आणि दर्जा टिकवून ठेवला आहे. सामाजिक हिताचे विविध प्रश्न आणि समस्यांवर सखोल संशोधन केले आहे. अर्थशास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अशा तिनही क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.

अभ्यासक्रम-

(१) बीएस्सी इन इकॉनॉमिक्स, कालावधी तीन वर्षे, (२) बीएस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स, कालावधी चार वर्षे

मुख्य अर्थशास्त्रीय संकल्पनांचा पाया मजबूत करणे, सध्याचे प्रश्न आणि समस्यांच्या निराकरणासाठी अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा उपयोग, विविध समस्यांकडे बघण्यासाठी विश्लेषणात्मक दृष्टीचा विकास ही प्रमुख उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.

अर्हता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट (सीयूइटी-यूजी) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

(२) एम.एस्सी इन (१) इकॉनॉमिक्स, (२) ॲग्रिबिझिनेस इकॉनॉमिक्स, (३) इंटरनॅशनल बिझिनेस इकॉनॉमिक्स ॲण्ड फायनांस, (४) पाप्युलेशन स्टडीज ॲण्ड हेल्थ इकॉनॉमिक्स, (६) जिओ पॉलिटिक्स ॲण्ड जिओ इकॉनॉमिक्स, (७) पब्लिक पॉलिसी आणि एम.ए इन इकॉनॉमिक्स

अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट (सीयूइटी-यूजी), या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

प्लेसमेंट– या संस्थेत पुढील कंपन्या / विभाग प्लेसमेंटसाठी येत असतात-

(१) इंडिया बुल होम लोन्स, (२) एडेलविस म्युच्युअल फंड, (३) टाटा स्टिल, (४) निल्सेन, (५) रिलायंस, (६) निती आयोग, (६) भारत सरकारचा वित्त विभाग, (७) एसबीआय, (८) एसबीआय म्युच्युअल फंड, (९) इंडियन ऑइल, (१०) बिर्ला सन लाइफ, (११) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, (१२) केपिएमजी, (१३) थरमॅक्स, (१४) फिक्की, (१५) मॉर्गन स्टॅन्ले, (१६) जे.पी.मॉर्गन, (१७) आयसीआयसीआय बँक, (१८) आयसीआयीसआय प्रुडेंशिअल (१९) हिंदुस्थान लिव्हर, इत्यादी

संपर्क – ८४६ शिवाजी नगर डेक्कन, पुणे ४११००४, ईमेल-gokhleinstitute@ gipe.ac.in संकेतस्थळ-https://gipe.ac.in, दूरध्वनी-०२०-२५६८३३००

०००

(३) सरला अनिल मोदी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायंस, या डिम्ड टुबी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ही संस्था येते. या संस्थेत २०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून, बीएस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स आणि बीएस्सी (ऑनर्स वुइथ रिसर्च) इन इकॉनॉमिक्स, हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आहेत.

अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण.

प्लेसमेंट

नोमुरा, (२) झोमॅटो, (३) डिजिट, (४) ॲक्सिस माय इंडिया, (५) गोल्डमन सॅच, (५) जे.पी.मॉर्गन या कंपन्या संस्थेत प्लेसमेंटसाठी येतात.

एमएस्सी इन इकॉनॉमिक्स

हा अभ्यासक्रम केल्यावर – (१) रिसर्च ॲनॅलिस्ट, (२) डाटा ॲनॅलिस्ट, (३) फायनांशिअल ॲनॅलिस्ट, (४) मॅनेजमेंट कंसलटंट, (६) इन्व्हेस्टमेंट बँकर अशा करिअर संधी मिळू शकतात.

हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून तो कोणत्याही विषयातील पदवीधरास करता येतो. मात्र त्याने १२ वीला गणित किंवा स्टॅटिस्टिक्स या विषयाचा अभ्यास केलेला असावा.

प्लेसमेंट

हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे-

(१) निल्सेन, (२) एचडीएफसी बँक, (३) आरबीएल बँक, (४) क्रिसील, (५) एडेलवीज इत्यादी.

संपर्क- व्ही. एल. मेहता रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई – ४०००५६, दूरध्वनी-०२२-२६१३४५७७, संकेतस्थळ- economics.nmims.edu, ईमेल- enquiry@ nmims.edu

०००

(४) डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी- दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर या संस्थेची स्थपना करण्यात आली.

अभ्यासक्रम

(१) पाच वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स- अर्थशास्त्रासोबत समाजशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, नैतिक मूल्ये आदी सामाजिक शास्त्रातील विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्थशास्त्रातील नव्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना शिकवले जाते व स्वतंत्र विचार करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. नाविन्यपूर्ण विषय घटक तसेच शिकवण्याच्या वेगळया पध्दती, संशोधनात्मक कार्याला प्राधान्य ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण. या विद्यार्थ्यांनी १२वीमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना १२ वी परीक्षेत किमान ६५ टक्के, आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण आवश्यक. या प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट-युजी,देणे आवश्यक. संपर्क – www.cucetexam.in

(२) एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स आणि एम.एस्सी इन फायनांशिअल इकॉनॉमिक्स-

कालावधी- दोन वर्षे. अर्हता- बी.एस्सी किंवा बी.एस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स या विषयातील पदवीधर. या विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावर इकॉनॉमेट्रिक्स, मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक. या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांची किमान मर्यादा- ५०  टक्के.

प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या

टेक महिंद्रा, क्रिसिल, डाटा लॅब, पीडब्ल्यूसी, ग्रँट थॉर्टान, निकोर असोशिएटस, इवाय, कंतार, टीएनएस इंडिया फाउंडेशन

संपर्क – जनाभारती मेन रोड, नागरभावी पोस्ट, बेंगळुरु- ५६००७२, दूरध्वनी – ८० – २३९९८५००, ईमेल- info@base.ac.in, संकेतस्थळ-  base.ac.in

 सुरेश वांदिले