(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अहा आणि वहा !

अचहाची गुणवत्ता आणि दर्जा कोण ठरवते?  या क्षेत्रासाठी वेगळया प्रकारचे कौशल्य असलेले मनुष्यबळ लागते. हे कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्तिंना चहा निर्मिती कंपन्यांमध्ये  रोजगाराची संधी मिळते. काहीजण खाजगीरीत्या आपल्या कौशल्याची सेवा देतात.

प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन  टी टेस्टिंग ॲण्ड मार्केटिंग,

हा अभ्यासक्रम इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट  या संस्थेने सुरु केलाय. ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पुढाकारानं स्थापन करण्यात आलीय. या संस्थेचा विकास सेंटर ऑफ एक्सलंस म्हणजेच गुणवत्तेचे केंद्र म्हणून केले जात आहेे. या संस्थेला टी बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, स्पाईसेस बोर्ड आणि प्लँटेशन इंडस्ट्रीनं पाठबळ दिल आहे.

टी टेस्टिंग या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आणि सध्याच्या काळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चहा उद्योगाशी निगडित महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलीय. टी टेस्टिंग सोबत मार्केटिंग (विपणन)  तंत्र आणि कौशल्य शिकवले जात असल्याने उमेदवारांना रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळणे सुलभ जाते.

  काय शिकाल ? – सुयोग्य विपणनासाठी टी टेस्टिंग, चहाचे उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण, टी टेस्टिंगची भाषा, कप टेस्टिंगची तंत्रं, इलेक्ट्रॉनिक नोज आणि इलेक्ट्रॉनिक टंग, खरेदीच्या अनुषंगाने टेस्टिंग आणि चहांचे मिश्रण, चहाच्या चवीच्या अनुषंगाने रसनेंद्रियाचा विकास , चहा श्रेणीकरणाच्या सूक्ष्म छटा इत्यादी विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. टी टेस्टिंगच्या अनुषंगाने रसनेंद्रियाच्या कौशल्य निर्मितीचं प्रात्यक्षिक शिकवले जाते. टी इस्टेट, चहा उत्पादन करणारे कारखाने आदींच्या भेटी या बाबींचा प्रशिक्षण कालावधीत समावेश आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यावर प्रकल्पाचं (प्रोजेक्ट वर्क) सादरीकरण करावं लागतं. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. दोन्हीच्या गुणांवर आधारित, सर्टिफिकेट कोर्स इन टी टेस्टिंग ॲण्ड मार्केटिंग हे प्रमाणपत्र दिले जाते.

    देशात आणि परदेशात उत्पादन होणाऱ्या प्रमुख चहांच्या परीक्षणाच्या विविध पध्दतींची ओळख या अभ्यासक्रम/प्रशिक्षणात करुन दिली जाते. या संस्थेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत परीक्षणाच्या पध्दती शिकवल्या जातात. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक बोलावले जातात. या अभ्यासक्रमाचं दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात चहा उद्योगाशी संबंधित विक्री- विपणनातील संधी, जागतिक स्तरावरील ग्राहकांच्या चहाच्या आवडीनिवडी आदी बाबींची ओळख करुन दिली जाते. त्यामुळे या  क्षेत्रातील व्यवसाय संधीची माहिती मिळते.

हा अभ्यासक्रम/ प्रशिक्षण कोणत्याही विद्याशाखेतील उमेदवारांना करता येतो. प्रत्यक्ष मुलाखत आणि टी टेस्टिंगची आवड लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.

संपर्क- प्रोग्रॅम कुऑर्डिैनेटर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट,जनभारती कॅम्पस, पोस्ट ऑफिस मलाथल्ली, बेंगळुरु- ५६००५६, दूरध्वनी-०८०-२३२११७१६, ईमेल- mdp.iipmb@gmail.com / mdp@iipmb.edu.in

०००