आयआयटीत लिबरल आर्ट अभ्यासक्रम
आयआयटीमध्ये लिबरल आर्ट म्हणजे मानव्यशास्त्र आणि समाज शास्त्रांचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
(१) आयआयटी मंडी येथे, मास्टर्स इन डेव्हलपमेंट स्टडीज हा अभ्यासक्रम करता येतो.यंदा या अभ्यासक्रमाच्या २० जागांसाठी ४०० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. हा अभ्यासक्रम कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधरास करता येतो.हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्था,थिंक टँक आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
(२) सध्या अनेक विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांमध्ये रस असतो आणि त्यांना त्यांची ओळख केवळ वैज्ञानिक,डॉक्टर,अभियंते म्हणून अशी न राहता, अवतीभवती घडणाऱ्या घटना घडामोडी यांच्या सांस्किृतक-सामाजिक-आर्थिक परिणामांविषयी जाणून घेण्याची इच्छा आणि कल असतो.याकडे आयआयटी गांधीनगरच्या, ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायंस या विभागाचे प्रमुख जैसन मंजाली यांनी लक्ष वेधले आहे.या विभागाने, एमए इन सोसायटी ॲण्ड कल्चर आणि एमएस्सी इन कॉग्निटिव्ह सायंस हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(३) आयआयटी गौहाटीने मास्टर ऑफ लिबरल ऑर्ट हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु केला आहे.