(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गेल्या काही वर्षापासून आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याकडे अधिकाधिक कल वाढताना दिसतो.त्यामुळे भविष्यात या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायंसेस ही आपल्या देशातील आयुर्वेद औषध निर्मितीशास्त्राचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था. या क्षेत्रातील या संस्थेचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने संस्थेस, इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पार्टन्सचा दर्जा गेल्यावर्षी दिला असून यापुढे ही संस्था, इंस्टिट्यूट ऑफ टिचिंग ॲण्ड रिसर्च इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायंसेस या नावाने ओळखली जाईल. या संस्थेत आयुर्वेद औषधी निर्माणशास्त्रातील डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म), बॅचलर इन फार्मसी (बी.फार्म) हे अभ्यासक्रम करता येतात.

डी.फॉर्म- कालावधी दोन वर्षे. १० वीतील गुण आाणि मुलाखतीव्दारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमात रसशास्त्र आणि भैशज्य कल्पना, द्रव्यगुण, आयुर्वेद आणि स्वस्थवृत्त, शरीर रचना आणि क्रिया, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स (औषधी निर्माणशास्त्रातील न्यायतत्वशास्त्र), औषध साठा व्यवस्थापन, रुग्णालयातील औषधालये आदी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर उमदेवार आयुर्वेदिक औषधालय टाकू शकतो. या उमेदवारास शासकीय रुग्णालयाच्या औषधालयातील तज्ज्ञ वाटपदार (Pharmacist), आयुर्वेद औषधी निर्मिती कंपन्यासाठी मार्केटिंग (विपणन), औषध तयार करणारा तज्ज्ञ (Dispenser) आदी करिअर संधी मिळू शकतात.

बी.फॉर्म- कालावधी चार वर्षे. अर्हता- १२ विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण. १२ वीतील गुण आणि मुलाखतीव्दारे अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. या अभ्यासक्रमात औषधीनिर्मितीचे रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान, औषधीनिर्मितीची अभियांत्रिकी, औषधीनिर्मितीचे जैवरसायनशास्त्र, औषधीनिर्मितीचे सूक्षजीवशास्त्र, गुणवत्ता नियंत्रण, संगणकाचा वापर, औषधालयाच्या संदर्भात कायदे, नियम आणि अधिनियम, पर्यावरणशास्त्र, संस्कृत आाणि इंग्रजी, न्यायवैद्यकीय औषधालये, रसशास्त्र आणि भैशज्य कल्पना, द्रव्यगुण, आयुर्वेद आणि स्वस्थवृत्त, शरीर रचना आणि क्रिया, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स (औषधी निर्माणशास्त्रातील न्यायतत्वशास्त्र) आणि औषध साठा व्यवस्थापन, रुग्णालयातील औषधालये आदी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर आयुर्वेदिक औषधी निर्मिती उद्योगांमध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून करिअर संधी मिळू शकते. त्याच बरोबर, गुणवत्ता नियंत्रक अधिकारी, शासकीय प्रयोगशाळांमध्ये विश्लेषक (ॲनॅलिस्ट), ड्रग इन्सपेक्टर, औषधांचे पुरठवदार, वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह), खरेदी अधिकारी, अशा संधी मिळतात. आयुर्वेदिक औषधालय उघडून स्वंयरोजगाराची पायाभरणी करता येते.

प्लेसमेंट- या संस्थेच्या प्लेसमेंट प्रकियेमध्ये (१)इमामी, (२)बैधनाथ, (३)हिमालय, (४)आस्फा, (५)वासू हेल्थकेअर, (६)उंझा आयुर्वेदिक फार्मसी, (७)विर्गो आयुर्वेदिक फार्मा, (८)बेनमून फार्मा रिसर्च, (९)झांडू, (१०)बॅन लॅब लिमिटेड, (११)व्हायटल केअर-हेल्थ ॲण्ड हॅप्पिनेस, (१२)मुलतानी, (१३)आर्युकेअर फार्मास्युटिकल्स, चरक, आदी कंपन्या सहभागी होतात.

संपर्क-  अपोजिट बी डिव्हिजन पोलीस स्टेशन, गुरुव्दारा रोड,जामनगर,गुजरात -३६१००८, दूरध्वनी – ०२८८- २५५५७४६, संकेतस्थळ- www.itra.ac.in, ईमेल- directoritra@edu.ac.in