(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आरोग्य व्यवस्थेला आधार

गेल्या आठवड्यात एका लग्न समारंभात जवळच्या नातेवाईकाची मुलगी भेटली. बऱ्यापैकी हुशार. जीवशास्त्रासह विज्ञान विषयातून बारावीची परीक्षा तिने दिलीय. “मग काय, डॉक्टर होणार ना?” नेहमीचा साचेबध्द प्रश्न मी विचारलं. “नाही हो काका, मी नर्सिंगला जायचय ठरवलय.” ती आनंदाने म्हणाली. मी तिच्या बाबांकडे बघितलं. त्यांनी हसून, “आम्हाला, नो प्रॉब्लेम,” असं सांगितलं. नर्सिंग ज्ञानशाखेबद्दलची ही पालकांची आणि विद्यार्थ्यांची बदललेली सकारात्मक भूमिका बरीच आशादायी वाटली. पूर्वी नर्सिंग अभ्यासक्रम प्रवेशाच्या जाहिराती या अभावानेच दिसत. आता अनेक शहरांमध्ये या जाहिराती ठळकपणे दिसू लागल्या आहेत. हे या सकारात्मकतेचं निदर्शकच ठरतं. राज्यशासनानेही आता नव्या नर्सिंग  महाविद्यालयांना परवानगी दिली आहे.

नर्सिंगमध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी देशविदेशात मिळू शकतात. या करिअरचा गाभा, सेवा हाच असला तरी, ही एक स्वत:साठी व कुटुंबियांसाठी उत्तम आयुष्य जगण्यासाठी संधीसुध्दा देत असते. चांगले वेतन/ मानधन मिळणारं हे क्षेत्र आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नर्सेसची गरज कधीच कमी होणारी नाही. रुग्णालयांची संख्या वाढत जाणारी आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रशिक्षित नर्सेसची गरज अधिकाधिक भासणार. सध्या मोठया संख्येने पर्सनलाईज्ड म्हणजे व्यक्तिगत स्तरावरही नर्सेसची सेवा घेण्याकडे कल वाढत चाललाय. अशा नर्सेसना चांगले सेवा-शुल्क दिले जाते. या क्षेत्रातही पदव्युत्तर पदवी आणि सूक्ष्म स्पेशलायझेशनच्या सुविधा आहेत. त्यामुळे आणखी चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.

इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही म्हणून नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा पर्याय ठेऊ नये. विद्यार्थींनींनी ठामपणे या ज्ञानशाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घ्यावा. पालकांनी त्यासाठी मुलींना प्रोत्साहन द्यावे. यंदा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींना पुढील चार ते पाच वर्षात महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही चांगल्या संधी मिळू शकतात.

बी.एस्सी नर्सिंग (ऑनर्स)

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) च्या दिल्ली, रायपूर, भटिंडा, ऋषिकेश, भोपाळ, भूवनेश्वर, कल्याणी, नागपूर, देवघर, गोरखपूर, जोधपूर, बिलासपूर, मंगलगिरी, पाटणा, बिबिनगर, रायबरेली, गौहाटी येथे, बी.एस्सी नर्सिंग (ऑनर्स) अभ्यासक्रम करता येतो. या सर्व एम्समध्ये एकूण १२३१ जागा चाळणी परीक्षेव्दारे भरल्या जातात. यामध्ये सर्व संवर्गातील जागांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा असून केवळ महिला उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात, खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यांना सरासरीने किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट.

प्रवेश प्रकिया

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दिल्ली एम्सच्या, वतिने ऑनलाइन चाळणी परीक्षा देशातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये  घेतली जाते.बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठीचा चाळणी पेपर १०० गुणांचा आणि  इंग्रजी व हिंदी भाषेत असतो. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातील प्रत्येकी ३० गुणांचे आणि सामान्य ज्ञानावरील १० गुणांचे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. निवड प्रकियेच्या पुढील टप्प्यात येण्यासाठी या चाळणी परीक्षेत खुल्या संवर्गातील उमेदवारांना ५० टक्के, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर मागास वर्ग  ४५ टक्के , अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील उमेदवारांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. परीक्षेचा कालावधी- दोन तास.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संपर्क– असिस्टंट कंट्रोलर (एक्झाम), एआयआयएमएस, नवी दिल्ली- ११०६०८, दूरध्वनी- ०११-२६५८९९००, संकेतस्थळ-www.aiims.edu. https://aiimsexams.ac.in ईमेल exams.ac.in@gmail.com

०००

महाराष्ट्रातील संधी

बी.एस्सी (नर्सिंग) हा अभ्यासक्रम हा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहे.

या अभ्यासक्रमाला, एमएच सीईटी-नर्सिंग, या परीक्षेतील गुणांव्दारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा ऑनलाइन आहे. पेपरचा कालावधी ९० मिनिटे आहे. या पेपरमध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड (कल), भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयांवर आधारित प्रत्येकी २० प्रश्न विचारले जातील. १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.

याशिवाय काही शिक्षण संस्थेत, बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. 12 वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना या अभ्याक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

०००

  आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, कमांड हॉस्पिटल कोलकता, कमांड हॉस्पिटल बेंगळुरु लखनौ, आयएनएसएच अश्विनी या लष्करी वैद्यकीय संस्थांमधील बीएस्‍सी-नर्सिंग अभ्यासक्रमाला नीट-यूजी, परीक्षेच्या गुणांवर प्रवेश आधारित दिला जातो.

०००

   प्रयोगशाळा तंत्रज्ञ

डॉक्टरांना अधिक उत्तमपध्दतीने निदान करण्यासाठी किंवा अचुकतेपर्यंत जाणारा औषधौपचार सुचवण्यासाठी प्रयोगशाळेतील वैद्यकीय अहवाल हे उपयुक्त ठरतात. अभ्यासक्रम करुन कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते.

काही संस्था

(१) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स – बी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी, संपर्क- संकेतस्थळ- sihspune.org, ईमेल- admin@sihspune.org (२) मनिपाल कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स-बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क संकेतस्थळ- manipal.edu,ईमेल- admissions@manipal.edu, (३) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायन्स-बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क संकेतस्थळ – jipmer.edu.in, (४) एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स-बीएस्सी इन लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संकेतस्थळ- mgmuhs.com,ईमेल-registrar@mgmuhs.com, (५) भारती विद्यापीठ- डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क संकेतस्थळ-mcpune.bharatividyapeeth.edu,ईमेल-bvumedicalpune@gmail.com, (७) अम्रिता सेंटर फॉर अलाइड हेल्थ सायंसेस-बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क संकेतस्थळ aims.amrita.edu, ईमेल- ugadmissions@aims.amrita.edu,

०००

इतर उपयुक्त अभ्यासक्रम

(१) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) – (१) दिल्ली कॅम्पसबी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी (कालावधी ३ चार वर्षे), डेंटल ऑपरेटिंग रुम असिस्टंट (कालावधी साडेतीन वर्षे), डेंटल हायजिन (कालावधी साडेतीन वर्षे), ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी (कालावधी साडेतीन वर्षे), ऑप्टिमेट्री (कालावधी ४ चार वर्षे).

(२) भुवनेश्वर कॅम्पस- बीएस्सी इन (१) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (२) ऑपरेशन थिएटर ॲण्ड ॲनेस्थिसिऑलॉजी टेक्नॉलॉजी, (३) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओथेरपी, (४) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी. या चारही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे.

(३) ऋषिकेश  कॅम्पस- (अ) कालावधी चार वर्षे/ बी.एस्सी इन (१) ॲनेस्थिसीया टेक्नॉलॉजी, (२) परफ्युजन टेक्नॉलॉजी, (३) न्युक्लियर मेडिसीन टेक्नॉलॉजी, (४) बॅचलर ऑफ ऑप्टेमेट्री.

(ब) कालावधी  साडे चार वर्षे/ बीएस्सी इन (१) स्लीप लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (२) रेस्पिरेटरी थेरपी, (३) डेंटल हायजिन, (४) डेंटल रुम ऑपरेटिंग असिस्टंट

  • कालावधी तीन वर्षे / बी.एस्सी इन (१) युरॉलॉजी टेक्नॉलॉजी, (२) रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, (३) न्युरो मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी, (४) आर्थोपेडिक्स टेक्नॉलॉजी, (५) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी. (४) नागपूर कॅम्पस- बी.एस्सी इन लॅब टेक्नॉलॉजी आणि बी.एस्सी इन मेडिसिन टेक्नॉलॉजी.दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.

अर्हता (१) बी.एस्सी-मेडिकल टेक्नॉलॉजी-रेडिओग्रॅफी/ डेंटल हायजिन/ डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट/ ऑप्टेमेट्री – १२ वी विज्ञानशाखेची परीक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ गणित आणि इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण. (डेंटल हायजिन/ डेंटल ऑपरेटिंग रुम असिस्टंट/ ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करणे आवश्यक.) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एम्समार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

००००

  () बी.जे गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज पुणे- बीएस्सी इन () रेडिओग्रॅफी, () कम्युनिटी मेडिसीन, () ब्लड ट्रान्सफ्युजन, () इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिस, () एन्डोस्कोपी, () मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी.

संपर्क- बी.जे गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल्स ॲण्ड कॉलेज ऑफ नर्सिंग, जयप्रकाश नारायण रोड, पुणे रेल्वे स्थानकाजवळ, पुणे-४११००१, दूरध्वनी- ०२०-२६१२८०००, फॅक्स- २६१२६०१०, संकेतस्थळ- www.bjmcpune.org, ,ईमेल- deanbjmcpune@gmail.com

() वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , यवतमाळ-  बीएस्सी इन () रेडिओग्रॅफी, () ब्लड ट्रान्सफ्युजन,() इर्मजन्सी मेडिसिन, () एन्डोस्कोपी,() मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी. () फॉरेन्सिक मेडिसिन, () ऑप्टोमेट्री

संपर्क- यवतमाळ-४४५००१, दूरध्वनी-०७२३२-२४२४५६, संकेतस्थळ- www.vngmcytl.ac.in

सुरेश वांदिले