(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट

पर्यटन आणि यात्रा व्यवस्थापन या विषयातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील सर्वात महत्वाची आणि दर्जेदार संस्था म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट या संस्थेने ख्यातीप्राप्त केली आहे. 1983  साली स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेला पर्यटन आणि यात्रा  व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था असून या संस्थेचे ग्वाल्हेर, नॉयडा, भूवनेश्वर , गोवा आणि नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत.

संस्थेच्या वतिने बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, मास्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

 (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल- कालावधी तीन वर्षे, असून, प्रवेशासाठी संस्थेमार्फत, आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट ही चाळणी परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा सध्यातरी 6 जून 2021 रोजी घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. ही परीक्षा ग्वाल्हेर, भुवनेश्वर, गोवा, नॉयडा आणि इतर काही केंद्रावर घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावण्यात येईल. तिनही घटकांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल. त्यासाठी प्रवेश परीक्षेतील कामगिरीला 70  टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी 15 टक्के वेटज दिले जाते.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट

(बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल

अशी असते प्रवेश परीक्षा

ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण 100. या पेपरमध्ये सामान्य अध्ययायनाचे 50 प्रश्न, भाषिक कौशल्याचे 25 प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा 12 वी परीक्षेचा असतो.

अर्हता- कोणत्याही शाखेतील 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग प्रवर्गासाठी गुणांमध्ये 5 टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या एकूण 375 जागा आहेत. ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये 112, भूवनेश्वर कॅम्पसमध्ये 113, गोवा  आणि नॉयडा कॅम्पसमध्ये प्रत्येकी 75 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट

(बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल

काय शिकाल?

या अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थापनाची तत्वे आणि संकल्पना, पर्यटनाची तोंडओळख, भारतीय इतिहास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, लेखाविषयक मुलभूत तत्वे, आतिथ्यसेवेची तोंडओळख, भुगोलाची तत्वे, व्यवसायाचे अर्थकारण, विपणन व्यवस्थापन, पर्यटनासाठी माहिती तंत्रज्ञान, यात्रा/ प्रवास/ पर्यटनाचे आयोजन, वाहतूक व्यवस्था, पर्यटन संसाधने, परदेशी भाषा (फ्रेंच किंवा जर्मन), पर्यटनाच्या कायदेशीर चौकटी, भारतीय संस्कृती आणि परंपरा, सांख्यिकी शास्त्राची तोंडओळख, हवाई वाहतुकीची तिकिटे आणि मूल्य निर्धारण, हवाईवाहतूक व्यवस्थापन, कार्यान्वयन व्यवस्थापन, पर्यटन छायाचित्रण, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहस पर्यटन, योग आणि सुदृढ आरोग्य, इव्हेंट व्यवस्थापन या विषय घटकांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या वेगवेगळया संस्थांमार्फत विविध संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जातो. ग्वाल्हेर, नॉयडा, नेल्लोर आणि भूवनेश्वर कॅम्पसमध्ये नाममात्र शुल्कात मर्यादित स्वरुपात निवासाची व्यवस्था करण्यात येते.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट

एमबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल

या क्षेत्राशी संबंधित हा महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्याचे कौशल्य आणि तंत्र या प्रदान केले जाते. एकूण 750 जागा पुढील प्रमाणे भरल्या जातात. ग्वाल्हेर कॅम्पस- ३३४, भुवनेश्वर कॅम्पस- ११२, नॉयडा कॅम्पस- १८९, नेल्लोर कॅम्पस- ७५ आणि गोवा कॅम्पस-५०.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट

प्लेसमेंट

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मेक अप माय ट्रिप, थॉमस कूक, ली पॅसेज टू इंडिया, टीयूआय डॉट इन, द रिट्ज कार्लटॉन, कुओनी, यात्रा डॉट कॉम, हॉलिडे इन, आयआरसीटीसी, केरला हॉलिडे मार्ट, शेरॅटॉन हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस, बनायन टूर ॲण्ड ट्रॅव्हल, मॅरिऑट हॉटेल्स रिसॉर्ट, बाल्मर लॅवरी ट्रॅव्हल आणि व्हॅकेशन, पॅलेस ऑन व्हील्स, इंडियन हॉरिजॉन-इंडियन ट्रॅव्हल एजन्सी, जिंजर,ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, ग्रीन ॲडव्हेंचर्स, ॲडव्हेंचर टुर्स इंडिया, हॅप्पी टूर-कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट, राजविलास जयपूर आदी कंपन्यांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट

अर्हता

या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील 50  टक्के गुणांसह पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये 5 टक्क्यांची सूट दिली जाते. प्रवेशासाठी दोन पध्दती अवलंबण्यात येतात. () पुढील चाळणी परीक्षेपैकी कोणतीही एक परीक्षा दिलेली असावी- (1) मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, (2) कॅट- कॉमन ॲडमिशन टेस्ट, (3) सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (4) झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट , (5) जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (6) असोशिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल मार्फत घेतली जाणारी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन. यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना, आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट द्यावी लागेल. ही परीक्षा ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर, नेल्लोर आणि इतर केंद्रांवर घेतली जाईल.

ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण 100. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाचे 50 प्रश्न, भाषिक कौशल्याचे 25 प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा हा पदवी परीक्षेचा असतो. ही परीक्षा किंवा उपरोक्त नमूद परीक्षेतील गुणांवर आधारित निवड विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. अंतिम निवड करताना प्रवेश परीक्षेतील कामगिरीला 70  टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी  15 टक्के वेटज दिले जाते.

संपर्क – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११, दूरध्वनी- ०७५१-२४३७३००, ईमेल- admissions@iittm.ac.in, संकेतस्थळ-www.iittm.ac.in

०००