उन्हाळयात आजीच्च
उन्हाळ्याच्यासुटित आजीकडे जायचं ,असं रश्मीनंघोषित केलं.याचं आईलाफार आश्चर्य वाटलं.कारण यंदा रश्मिला जंगलसफारीला जायचं होत.तीन चारमहिन्यांपासून त्यासाठी तिचीभूनभून चालली होती.अचानक रश्मिलाआजीची आठवण कशी कायआली बुवा?आईला आश्चर्यवाटलं.
आजीलानंतर भेटता येईल ना.आई म्हणाली.
नाही, मला या उन्हाळयातचआजीला भेटायचय.
अग पण तुलाकंटाळा येईल आजीकडे.
असाकसा येईल?
आजीकडेकेबल नाही ना.
मग कायझालं? आजीकडे केबल नसलातरी असंख्य गोष्टी आहेत.केबलवरील सिनेमापेक्षा अधिक मजेशिर आणि गमतिदार. त्या मलाऐकाच्याय. रश्मी म्हणाली.
खूप पुस्तक आहेत की तुझ्याकडेगोष्टींचे.आई म्हणाली.यावर रश्मी हसली आणि आईच्या गळयात पडत म्हणाली
हो गं आई, मला ठाऊक नाही का ते? पण मला या उन्हाळ्यात चालत्याबोलत्या पुस्तकांच्या तोंडूनच गोष्टी ऐकायच्यात.
चालतंबोलतं पुस्तक? आईनं आश्चर्यानं विचारलं.
आई. माझी आजी गं. गोष्ट सांग म्हणण्याचा अवकाश. हे पुस्तक चक्क बोलायलाच लागतं..
वा वा वा..छान आहे आजिला नवी उपमा, चालतं बोलंत पुस्तक..पण या पुस्तकाकडे आपल्याला कधीही जाता येईल की..आई म्हणाली.
नाही नाही..मला यंदाच आणि आत्ताच जायचय..रश्मी म्हणाली.
म्हणजे तुझा निर्णय पक्का झाला म्हणायचा..आईनं विचारलं.
यस्स माय डिअर आई. माझा निर्णय पक्का. त्यावर तुही मार ठप्पा. मी लाडकरुन घेणारेय आजीकडून, वर्षभराचा. बोरकूट खाणार मस्तपैकी. बर्फाचा गोळा मटकावणार. धापुडे आणि तांदळाचे पापडसुध्दा, गट्टम करणार,सकाळ-दुपार-संध्याकाळ..रश्मी नाचत नाचत म्हणाली.
अरे वा..सारं काही डोक्यात फिट्ट दिसतय,बाईसाहेबांच्या. आई कौतुकानं म्हणाली.
होय आई, शिवाय आणखी एक गोष्ट आहेच की..रश्मी हळू आवाजात नि डोळे बारीक करत म्हणाली.
आता तुझी कोणती गोष्ट बाई..आईनं आश्चर्यानं विचारलं.
रागावणार नसशील तर..सांगेन हं..
रागावणार नाही..
प्रॉमिस..
होय गधडे, प्रॉमिस..
आईपासून थोड्या दूर जात रश्मी म्हणाली.
पुढचे दोन महिने, हे करु नको नि ते करुनकोस या तुझ्या टिवटिवापासून पासूनसुटका करुन घेणारमी आजीकडे..
आताहिला रागवावं की कौतुककरावं या विचारात आई पडली.आईचेडोळे नकळत पाणावले.कारण तिलाहीतिची आजी आठवली.पण ती कधीचीचदेवाघरी गेली होती.आपल्या पोरीचाआनंद घालावायचा नाहीहे मात्र आईनं मनोमनठरवल.उन्हाळयात तुमच्याकडे येणारअसं तिने लगोलग आपल्या सासूबाईंना आणि रश्मीच्या आजीला कळवूनही टाकलं.
सुरेश वांदिले
000
.jpg)