इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली. सध्या, हे मंत्रालय केंद्रिय शिक्षण मंत्रालय यानावानं ओळखलं जातं. माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील उच्च प्रतिचं, शिक्षण-प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या संस्थेच्या वतिनं प्रयत्न केले जातात. या संस्थांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्था काळानुरुप व उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन स्वत:चा अभ्यासक्रम ठरवत असतात वा त्यात बदल करत असतात.
आयआयटी किंवा एनआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखांमध्ये प्रवेश मिळत नसल्यास आयआयआयटीमधील या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे उचित ठरेल. कोणत्याही खाजगी संस्थांमधील कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयांपेक्षा अधिक उत्तम ज्ञान या संस्थांमध्ये मिळू शकते.
या संस्थांमधील प्रवेश हे, जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ-मेन)च्या गुणांवर आधारित केले जातात. देशात एकूण २३ आयआयआयटी आहेत. या सर्व संस्थांना, इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला आहे. उच्च प्रशिक्षित अध्यापक, उत्तम प्रयोगशाळा, दर्जेदार शिक्षण व संशोधनाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
या सर्व संस्थांमध्ये प्लेसमेंट आणि ट्रेनिंग सेल उघडण्यात आले आहेत. या सेलद्वारे सर्व विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये इंटर्नशीपची संधी मिळवून दिली जाते. चांगल्या कंपन्या आणि उद्योग या संस्थांमधे प्लेसमेंटसाठी येत असतात.
महाराष्ट्रात नागपूर आणि पुणे येथे आयआयआयटीचे कॅम्पस आहेत.
नागपूर आयआयआयटी
या संस्थेने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून आपला ठसा उमटवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभाग आणि टाटा कंसलटन्सी यांचं सहकार्य या संस्थेला मिळालं आहे.
येथे पुढील अभ्यासक्रम करता येतात –
बीटेक (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग) इन (१) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (२) ह्युमन कॉम्प्युटर इंटरॲक्शन ॲण्ड गेमिंग टेक्नॉलॉजी, (३) डाटा सायंस ॲण्ड ॲनॅलिटिक्स, (४) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (५) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (६) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग
प्लेसमेंट्स-
पुढील काही कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसेमेंट मिळालं आहे – (१) इन्फोसिस, (२) ॲक्सेंच्युर फॉर गर्ल्स, (३) अमेरिकन एक्सप्रेस, (४) सीडॉट, (५) कार्बनशेल्फ, (६) सिस्को, (७) के फिनटेक, (८) फ्युचर फर्स्ट, (९) इंडिया मार्ट, (१०) नेटवर्क १८, (११) केपीएमजी, (१२) रिलायन्स जिओ इन्फोकॉम, (१३) मीडिया डॉट नेट, (१४) टीसीएस एनक्यूटू, (१५) टेस्को, (१६) जीई डिजिटल,
संपर्क- iiitn.ac.in
०००
पुणे आयआयआयटी
या संस्थेत, बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग हे अभ्यासक्रम करता येतात.
या संस्थेने उपरोक्त दोन विषयांमध्ये पुढीलप्रमाणे ऑनर्स पदवी घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
(१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ ऑनर्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ ऑनर्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि (३) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ ऑनर्स इन डाटा सायंस, (४) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ ऑनर्स इन डाटा सायंस.
या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना उपरोक्त दोन्ही विषयांमध्ये चार सत्रांपर्यंत ८ किंवा त्यापेक्षा अधिक सीजीपीए मिळवायला हवा व त्याचे कोणतेही विषय मागे राहायला नको. त्यानंतर पुढील प्रत्येक सत्रात त्याने ८ किंवा त्यापेक्षा अधिक सीजीपीए मिळवायला हवे आणि कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण व्हायला नको. उच्च शिक्षण, इंटर्नशीप, प्लेसमेंटमध्ये अधिक उत्तम संधी मिळण्यासाठी या ऑनर्स पदवीचा उपयोग होऊ शकतो.
प्लेसमेंट
विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये उत्तम प्लेसमेंट मिळालं आहे- (१) मार्व्हल सेमिकंडक्टर्स, (२) एनव्हिदिया, (३) शॉप कनेक्ट, (३) ॲमेझान, (४) डेल टेक्नॉलॉजी, (५) कोन एलेव्हेटर्स, (६) इंटेल, (७) आयबीएम, (८) सीडॉट, (९) अपग्रेड, (१०) सिनॉप्सिस, (११) सॅमसंग सेमिकंडक्टर्स, (१२) रिलायन्स जिओ, (१३) रिलायन्स इंडस्ट्रिज, (१४) कार देखो, () सीजीआय इत्यादी
संपर्क– http://www.iiitp.ac.in
०००
हैदराबाद आयआयआयटी
या संस्थेचे अभ्यासक्रम
बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक कामगिरीनुसार तिसऱ्या वर्षानंतर (१) बीटेक ॲण्ड मास्टर ऑफ सायंस इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) बीटेक ॲण्ड मास्टर ऑफ सायंस इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि (३) बीटेक ॲण्ड मास्टर ऑफ सायंस इन कॉम्प्युटेशनल नॅचरल सायंस या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते.
संपर्क-https://www.iiit.ac.in/academics/undergraduate/dual-degree/
०००
बेंगळुरु आयआयआयटी
संस्थेचे अभ्यासक्रम
बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (३) डाटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
इंटिग्रेटेड एमटेक
या संस्थेने प्रत्येकी पाच वर्षे कालावधीचे पुढील इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) बीटेक – एमटेक वुइथ ड्युएल डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग आणि (२) बीटेक- एमटेक वुइथ ड्युएल डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
प्रॉडक्ट डिझाइन ॲण्ड मॅनेजमेंट
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) या संस्थेने, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाइन ॲण्ड मॅनेजमेंट हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून तो कला, वाणिज्य, विज्ञान, विधि, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, डिझाइन यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधरास करता येतो. हा अभ्यासक्रम जुलै २०२४ मध्ये सुरु होईल.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाईल. सीयुइटी (सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट २०२४) किंवा कॉमन एंट्रन्स टेस्ट (कॅट २०२३) किंवा कॉमन एंट्रन्स एक्झामिनेश फॉर डिझाइन (सीइइडी २०२४),यापैकी कोणतीही एक परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांना सुयोग्य गुण मिळाले असतील, त्यांना संस्थेची चाळणी परीक्षा द्यावी लागणार नाही.
हा अभ्यासक्रम केल्यावर प्रॉडक्ट मॅनेजर, प्रॉडक्ट डिझायनर, बिझिनेस ॲनॅलिस्ट, टेक्नॉलॉजी कंसलटंट, युझर रिसर्चर अशा करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- www.iiitb.ac.in
०००
ग्वाल्हेर आयआयआयटी
या संस्थेचे अभ्यासक्रम
बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, (३) मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटिंग, (४) इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम (बीटेक-एमटेक) इन इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी. (५) इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम (बीटेक-एमबीए)
संपर्क- www.iiitm.ac.in
०००
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम)– – जबलपूर
या संस्थेत बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (३) डिझाइन, (४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (५) स्मार्ट मॅन्युफॅक्चुरिंग हे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क- http://www.iiitdmj.ac.in
०००
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम) – कांचिपूरम-
अभ्यासक्रम –
बीटेक (कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग) इन (१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,
(२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) वुइथ स्पेशलायझेशन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग,
ड्युएल डिग्री
बीटेक -एमटेक इन (१) कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन व्हीएएलएसआय डिझाइन, (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन सिग्नल प्रोसेसिंग, (४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग
संपर्क- www.iiitdm.ac.in/
०००
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम)– कुरनूल.
या संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन (१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग.
ड्युएल डिग्री
या संस्थेने (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग आणि (२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विषयांमध्ये, बीटेक-एमटेक ड्युएल डिग्री हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संपर्क- http://www.iiitdmkl.ac.in
सुरेश वांदिले
०००