
कलेतून संवाद
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॅफ्ट ॲण्ड डिझाइन, या संस्थेने, क्रॅफ्ट कम्युनिकेशन, हा नावीन्यपूर्ण असा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम पदवी (बॅचलर ऑफ डिझाइन), पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन) या स्तरावर करता येतो.
काय शिकाल?
(१) हस्तकलेच्या क्षेत्रात अभिकल्प आणि तंत्रज्ञान आणण्याचे कौशल्य या स्पेशलायझेशनमध्ये शिकवले जाते. (२) डिझाइन कौशल्य शिकणारे विद्यार्थी आणि हस्तकारागिर यांच्यातील दुवा साधण्याचे कौशल्य प्रदान केले जाते. (३) हस्तकलेसाठी लागणाऱ्या साहित्याची संस्कृती, प्रथा, परंपरा, कथाकथन, पौराणिक कथा या अनुषंगाने संवाद साधणे सुलभ जाते. (४) या विद्यार्थ्यांना संवादसंप्रेषण अभिकल्पातील प्रमुख कौशल्याचे तंत्र ठळकपणे शिकवले जाते. (५) दृष्यात्मक संवादसंप्रेषण (व्हिज्युअल कम्युनिकेशन)व्दारे विविध माध्यमांसाठी उपयुक्त ठरणारे अत्यंत प्रभावी व आकर्षक तंत्रकौशल्य प्रदान केले जाते. (६) या क्षेत्रात कार्यरत विविध पार्श्वभूमिच्या हस्तकारागिरांससोबत सुलभतेने कार्य करता येणे शक्य होण्यासाठीचे मानवीय कौशल्य प्रदान केले जाते, (६) हस्तकला वस्तुनिर्मितीसाठी उपयोगात आणल्या गेलेल्या, आता उपयोग आणल्या जात असलेल्या आणि भविष्यात उपयोगात आणल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू किंवा साहित्याचे महत्व जाणून घेण्याचे कौशल्य प्रदान केले जाते.
अभ्यासक्रमाचा उद्देश
(१) संवादसंप्रेषण (कम्युनिकेशन) आणि हस्तकला यांचा, हाताने तयार केलेल्या कलाकृतींएवढाच सखोल संबंध असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे. (२) कोणत्याही आकार आणि प्रकारातील हस्तकलेव्दारे निर्मित कलाकृती, कोणती ना कोणती भावना व्यक्त करते. काही वस्तु थेट व्यक्त होतात तर काही सूक्ष्मपातळीवर व्यक्त होतात.
(३) कम्युनिकेशन डिझाइनच्याव्दारे हस्तकलेचे विश्लेषण करता येते. ही प्रकिया डिझाइन थिकिंगमध्ये अंतर्भूत होते. (४) हस्तकलेच्या अनुषंगाने, (अ) कथन ही प्रक्रिया- पब्लिकेशन डिझाइनमध्ये, (ब) विक्री प्रकिया- सोशल मीडिया आणि ई कॉमर्समध्ये, (क) प्रोत्साहन प्रकिया– ब्रँडिगमध्ये, (ड) संरक्षण प्रकिया- पॅकेज डिझाइनमध्ये, (इ) डॉक्युमेंट प्रकिया- पॅकेज डिझाइनमध्ये समाविष्ट होते.
करिअर संधी
हे स्पेशलायझेशन केलेले विद्यार्थी (१) संशोधन, (२) विपणन, (३) प्रभाव आणि नावीन्यता/इनोव्हेशन, (४) दस्तावैजीकरण, (५) सक्षमीकरण, (६) समानुभूती (इम्पॅथी) आदी क्षेत्रात कार्य करु शकतात.
इतर अभ्यासक्रम
(१) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन क्लॉथिंग डिझाइन- या अभ्यासक्रमात, पारंपरिक भारतीय आणि पाश्चिमात्य पोषाखांच्या डिझाइनचे कौशल्य शिकवले जाते. डिझाइन थिकिंग, शास्वतता, विपणन या बाबींचेही ज्ञान प्रदान केले जाते.
(२) बॅचलर ऑफ डिझाइन इन ज्वेलरी डिझाइन- हा अभ्यासक्रम इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ज्वेलरी डिझाइन या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात पारंपरिक, आदिवासी आणि समकालीन दागिण्यांच्या डिझाइनचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. दानिण्याच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य, साधने, तंत्रज्ञान, निर्मिती प्रकिया आणि फिनिशिंग, विपणन यांचेही ज्ञान प्रदान केले जाते.
(३) बॅचलर ऑफ डिझाइन इन इंटेरिअर डिझाइन- या अभ्यासक्रमात पारंपरिक कलाकौशल्य आणि आधुनिक इंटेरिअर डिझाइनचे तंत्र यांचा समन्वय साधला जातो. हा अभ्यासक्रम २०२५ च्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.
सर्व बॅचलर ऑफ डिझाइन, अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षाचा आहे. अर्हता – कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवार.
प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर ऑनलाइन क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट घेतली जाते. (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेची चाळणी परीक्षा,युसीड (अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन,नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलाजी या संस्थेची चाळणी परीक्षा आणि सीड (कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन) या परीक्षा दिलेले व त्यात विशिष्ट गुण मिळवलेले विद्यार्थीसुध्दा, प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन या संस्थेची चाळणी परीक्षा द्यावी लागत नाही. त्यांना केवळ मुलाखतीचा टप्पा पार पाडावा लागेल.)
संपर्क- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॅफ्ट आणि डिझाइन, जे-८, झालना इन्स्टिटयुशनल एरिया, जयपूर ३०२००४, राजस्थान, दूरध्वनी -०१४१-२७०१२०३, फॅक्स- २७००१६०, ई-मेल-info@iicd.ac.in आणि admissions@iicd.ac.in, संकेतस्थळ -www.iicd.ac.in.
००००
क्रिएटिव्ह कम्युनिकेशन
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सर्जनशील मन असते. या मनाची मशागत करुन विविध संकल्पनांना जन्मास घालणे आणि त्यातून उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठीचे तंत्र आणि कौशल्य, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रम इन क्रॅफ्टिंग क्रिएटिव्ह कम्युनिकेशन, या अभ्याक्रमामध्ये शिकवले जाते. हा अभ्यासक्रम, मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, या संस्थेमार्फत चालवला जातो.
हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी रणनीतिकार (स्ट्रॅटेजिस्ट), कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर), अभिकल्पकार (डिझायनर), ॲनिमेटर्स, चित्रपट निर्माते या क्षेत्रात नाव कमावले आहे.
काय शिकाल?
(१) संकल्पना निर्मितीचे तंत्र (आयडिया जनरेशन टेक्निक), (२) कथाकथन (स्टोरी टेलिंग), (३) प्रतिमा निर्मिती (ब्रँडिंग), (४) संहिता लेखन (कॉपी रायटिंग), (५) कला दिग्दर्शन (आर्ट डायरेक्शन), (६) सजर्नशील नोंद लेखन (रायटिंग क्रियेटिव्ह ब्रिफ्स), (७) दूरचित्रवाणी वाणिज्यिक/ जाहिरात निर्मिती नियोजन (टेलिव्हिजन कर्मशिअल प्लॅनिंग), (८) प्रचार/प्रसिध्दी मोहीम (कॅम्पेन प्लॅनिंग), (९) चिन्हविज्ञान- (सेमिऑटिक्स), (१०) डिजिटल संवादसंप्रेषन (डिजिटल कम्युनिकेशन), (११) छायाचित्रण (फोटोग्रॅफी), (१२) दृष्टीक्षेप (वेज ऑफ सीईंग) -आपल्या अवतीभवती असणारे विविध घटक/ पात्रे/ घटना अशा बाबींपासून सर्जनशील प्रेरणा कशी घ्यावी? याचे प्रशिक्षण, (१३) जाहिरात व्यवस्थापन (ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट), (१४) नवी माध्यमे आणि अनुभवात्मक विपणन (न्यू मीडिया ॲण्ड एक्सपिरेंशिअल मार्केटिंग) – नव्या माध्यमांचा वापर करुन पारंपरिक जाहिरातीपेक्षा नावीन्यपूर्ण पध्दतीने जाहिरात करण्याचे तंत्र/कौशल्य या विषय घटकात शिकवले जाते. (१५) ग्राहक केंद्रित संवाद संप्रेषण (कस्टमरसेंट्रिक कम्युनिकेशन), (१६) डिजिटल जाहिराती, (१७) रेडियो, (१८) ब्रँडिंग, (१९) साधनांचे शिक्षण (टूल लर्निंग) उदा- अडॉब फोटोशॉप, इल्युस्ट्रेटर, इन डिझाइन, प्रिमिअर प्रो, आफ्टर इफेक्ट्स, (२०) अनिमेशन ॲण्ड स्टॉप मोशन- वाळू, प्रकाश, माती, कठपुतळे, चित्रे, पेपरचे तुकडे अशा साहित्याच्या मदतीने चित्रपटांची निर्मिती, (२१) चित्रपट आस्वाद/ समीक्षा (फिल्म ॲप्रिशिएशन), (२२) चित्रपट निर्मिती.
कोणत्याही विषयातील पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रमाचा कालावधी- दहा महिने.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात-
(१) मॅनेजमेंट ट्रेनी, (२) क्रिएटिव्ह ट्रेनी, (३) मॅनेजर- ब्रँड स्ट्रॅटेजी, (४) सिनीयर मॅनेजर-ब्रँड स्ट्रॅटेजी, (५) कंटेट क्रिएटर , कॉपी रायटर, सिनियर कॉपी रायटर, (६) सिनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, (७) आर्ट डायरेक्टर, (८) व्हिज्युएलायजर, (९) सोशल मीडिया स्ट्रॅटिजिस्ट, (१०) असोशिएट क्रिएटिव्ह पार्टनर, (११) आर्ट डायरेक्टर, (१२) ग्रॅफिक डिझायनर, (१३) क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर
जाहिरात, ब्रँडिग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, व्युहनीती, डिजिटल मार्केटिंग या सारख्या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या व्यक्तीस आपली प्रतिभा आणि सृजनशीलता प्रभावीरीत्या व आधुनिक पध्दतीने वापरता यावी यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. एखाद्या नामवंत जाहिरात संस्थेत एक महिन्याची इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
संपर्क- https://www.mica.ac.in/academic-centres/mudra-institute-of-communications-research
ऑनलाइन अभ्यासक्रम
या संस्थेने (१) डिजिटल मार्केटिंग ॲण्ड कम्युनिकेशन वुइथ स्पेशलायझेशन, (२) ब्रँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट, (३) स्ट्रॅटेजिक ब्रँड मॅनेजमेंट ॲण्ड कम्युनिकेशन, (४) डिजिटल स्ट्रेटेजी ॲण्ड मार्केटिंग ॲनॅलिटिक्स, हे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम ब्रँडिंग, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, व्यवसायवृध्दीसाठी ठरवण्यात येणाऱ्या सृजनशील व्युहनीती, जाहिराती, डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
०००
कम्युनिकेशन मॅनेजमेंट
स्ट्रॅटेजिक मार्केटिंग (व्युहात्मक विपणन) आणि कम्युनिकेशन या विषयाचे अभ्यासक्रम चालवणारी मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे.
या संस्थेचा, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (कम्युनिकेशन), हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील पदवीधर करु शकतात. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते- (१) ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड ब्रँड मॅनेजमेंट, (२) डिजिटल कम्युनिकेशन मॅनेजमेंट, (३) बिझिनेस अॅनॅलिटिक्स (४) मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट.
संपर्क – मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) शेला, अहमदाबाद – ३८००५८, संकेतस्थळ-www.mica.ac.in,
सुरेश वांदिले
०००