कृषी उद्योग व्यवस्थापक (२)
ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही महत्वाच्या संस्था, प्रवेश प्रक्रिया यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
(१) आयआयएम अहमदाबाद-– या संस्थेमार्फत एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. कृषी, अन्नपदार्थ निर्मिती, कृषी व्यवसाय, ग्रामीण आणि तत्सम क्षेत्रासाठी सक्षम आणि समर्थ व्यवस्थापकांची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील उद्योगांच्या उच्च दर्जाच्या अपेक्षा साध्य करण्याची क्षमता आणि कौशल्य या विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमाव्दारे निर्माण केली जाते.
कृषी आधारित व्यवसाय हा इतर उद्योग/व्यवसायांपेक्षा भिन्न असल्याने अचुक निर्णय घेणे व त्याची तत्काळ व प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असते. हे कौशल्य या अभ्यासक्रमाव्दारे शिकवले जाते. उद्योजकीय प्रेरणा व क्षमतावृध्दीवर भर देण्यात येत असल्याने कृषी आधारित उद्योग/व्यवसायासाठी हे विद्यार्थी सकारात्मक बदलाचे घटक ठरावेत यासाठी विषय घटकांची दिशा निश्चित केली जाते. कालावधी- दोन वर्षे.
आयआयएमच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाची जोड या अभ्यासक्रमास मिळाली असून तो या क्षेत्रातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च श्रेणीच्या करिअरसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
अर्हता– (1)कोणत्याही विषयातील पदवी आणि कृषी व खाद्यान्ने व्यवसाय क्षेत्राची तीव्र आवड . निवड प्रक्रिया– या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पुढील पध्दतीने राबवली जाते. कॉमन एंट्रंस टेस्ट (कॅट) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित निवडक उमेदवारांची विश्लेषणात्मक लिखान कौशल्य (ॲनॅलिटिकल रायटिंग स्किल्स) चाचणी आणि मुलाखत घेतली जाते. अंतिम निवड करताना 70 टक्के वेटेज हे कॅटमधील गुण आणि30 टक्के वेटेज हे इतर बाबींना (ॲप्लिकेशन रेटिंग स्कोअर) दिले जाते. यामध्ये 10वी,12वी आणि पदवीमधील गुणांचा समावेश असतो.
संपर्क– प्रोग्रॅम ऑफिसर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद-380015, ईमेल– admission@iima.ac.in संकेतस्थळ– iima.ac.in, दूरध्वनी-079-७१५२४६३१
(२) आयआयएम लखनौ-– या संस्थेमार्फत एमबीए इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो.कालावधी- दोन वर्षे.निवड प्रक्रिया- कॅट परीक्षेतील गुण आणि संस्थेमार्फत घेतली जाणारी समूह चर्चा व मुलाखत. अर्हता- कृषी किंवा त्यासंदर्भातील इतर विषयातील पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी व कृषी व खाद्दाने क्षेत्राची तीव्र आवड .
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंध नगर-, आयआयएम रोड, लखनौ-०५२२-२७३४१०१ २२६०१३,दूरध्वनी-०५२२-२७३४१०१,ईमेल- diroffice@ iiml.ac.in, संकेतस्थळ- iiml.ac.in
(३) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस- या संस्थेने सुरु केलेला एमबीए इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट, हा महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या अभ्यासक्रमात वित्त (सूक्ष्म वित्त, धोके व्यवस्थापन, कर्ज, खरेदी विक्री इत्यादी), विपणन (ग्रामीण आणि किराणा (रिटेल)व्यवसाय व्यवस्थापन) पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि करनिर्धारण या विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. जागतिक व्यापर संघटना, कृषी माल आयात निर्यात/ कृषी वित्त याविषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. विद्यार्थ्यांची निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. निवड- संस्थेची चाळणी परीक्षा आणि मुलाखतीव्दारे.
संपर्क- गेट नंबर १७४/१ हिंजेवाडी, तालुका- मुळशी, जिल्हा पुणे, दूरध्वनी-०२०-२२९३४३१६, ईमेल-director@siib.ac.in
(३) वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कुऑपरेटिव्ह मॅनेजमेंट-ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. अभ्यासक्रम– पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. निवड प्रकिया- प्राथमिक निवड सुचिसाठी कॅट/ मॅट/ झॅट/ जीमॅट/ सीमॅट यापैकी कोणत्याही एका परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो.त्याव्दारे निवडक विद्यार्थ्यांची निवड समूह चर्चा आणि मुलाखतीसाठी केली जाते. या दोन्ही चाचणींवर आधारित अंतिम निवड यादी तयार केली जाते. संपर्क- चतु:श्रुंगी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ रोड, पुणे-४११००७, दूरध्वनी-०२०-२५७०१०००, फॅक्स-२५५३७७२६, ईमेल-info@vamincom.gov.in www.vamnocom.gov.in
000
(4) ‡Ó×›üµÖ®Ö ‡Ó×Ùü™ü¶æ™ü †Öò±ú ¯»Öò®™êü¿Ö®Ö ´Öò®Öê•Ö´Öë™ü
²ÖëÝÖôãû¹ý µÖê£Öê †ÃÖ»Öê»Öß ‡Ó×›üµÖ®Ö ‡Ó×Ùü™ü¶æ™ü †Öò±ú ¯»Öò®™êü¿Ö®Ö ´Öò®Öê•Ö´Öë™ü Æüß ÃÖÓãÖÖ ³ÖÖ¸üŸÖ ÃÖ¸üÛúÖ¸ü“µÖÖ ¾ÖÖÞÖß•µÖ †Ö×ÞÖ ˆªÖêÝÖ ´ÖÓ¡ÖÖ»ÖµÖÖ“µÖÖ †ÓŸÖÝÖÔŸÖ ÛúÖµÖÔ¸üŸÖ †ÃÖÞÖÖ¸üß Ã¾ÖÖµÖ¢Ö ÃÖÓãÖÖ ÆüÖêµÖ.. µÖÖ ÃÖÓãÖê®Öê ¯ÖÖêÙü ÝÖÏò•µÖã‹™ü ×›ü¯»ÖÖê´ÖÖ ‡®Ö ´Öò®Öê•Ö´Öë™ü-†òÝÖÏß ×²Ö×—Ö®ÖêÃÖ †Ñ›ü ¯»ÖÖÓ™êü¿Ö®Ö ´Öò®Öê•Ö´Öë™ü, ÆüÖ †³µÖÖÃÖÛÎú´Ö ÃÖã¹ý Ûêú»ÖÖ †ÖÆêü. ÛúÖ»ÖÖ¾Ö¬Öß-¤üÖê®Öü ¾ÖÂÖì. ÆüÖ ×®Ö¾ÖÖÃÖß ¯Ö¬¤üŸÖß“ÖÖ †³µÖÖÃÖÛÎú´Ö †ÖÆêü. †ÆÔüŸÖÖ-ÛéúÂÖß ØÛú¾ÖÖ ±ú»ÖÖêªÖ®Ö ØÛú¾ÖÖ ¯Ö¿Öã¾ÖîªÛú ØÛú¾ÖÖ ±úÖò¸êüÙÒüß ×ÛÓú¾ÖÖ ÃÖê׸üÛú»“Ö¸üÃÖÆü ÛúÖêÞÖŸµÖÖÆüß ×¾ÖÂÖµÖÖŸÖᯙ 50 ™üŒÛêú ÝÖãÞÖÖÓÃÖÆü ¯Ö¤ü¾Öß. †®ÖãÃÖæ×“ÖŸÖ •ÖÖŸÖß †Ö×ÞÖ •Ö´ÖÖŸÖß ÃÖÓ¾ÖÝÖÖÔŸÖᯙ ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓÃÖÖšüß 45 ™üŒÛêú ÝÖãÞÖ †Ö¾Ö¿µÖÛú. ¯ÖϾÖê¿ÖÖÃÖÖšüß ‡Ó×›üµÖ®Ö ‡×®Ã™ü™ü¶æ™ü †Öò±ú ´Öò®Öê•Ö´Öê®™ü´ÖÖ±ÔúŸÖ ‘ÖêÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ¸üß ÛúÖò´Ö®Ö †ò›ü×´Ö¿Ö®Ö ™êüÙü -ÃÖß‹™üß ØÛú¾ÖÖ ´Öò®Öê•Ö´Öê®™ü †òׯ™ü™ü¶æ›ü ™êüÙü -‹´Ö‹™üß,ØÛú¾ÖÖ ÛúÖò´Ö®Ö ´Öò®Öê•Ö´Öë™ü †ò›ü×´Ö¿Ö®Ö ™êüÙü-ÃÖß‹´Ö‹™üß µÖÖ ¯Ö¸üßõÖÖ ¤êü‰ú®Ö µÖÖêÝµÖ ÝÖãÞÖ ¯ÖÏÖ¯ŸÖ Ûú¸üÞÖê †Ö¾Ö¿µÖÛú †ÖÆêü. µÖÖÃÖÓãÖêÛú›êü †ŸµÖÖ¬Öã×®ÖÛú ¿ÖîõÖ×ÞÖÛú ¯ÖÖµÖÖ³ÖæŸÖ ÃÖã×¾Ö¬ÖÖ †ÖÆêüŸÖ. ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÓ®ÖÖ ¯Ö¸ü¤êü¿ÖÖŸÖᯙ ¿ÖîõÖ×ÞÖÛú ÃÖÓãÖÖÓ´Ö¬µÖê †®Öã³Ö¾ÖÖÃÖÖšüß ¯ÖÖšü¾Ö»Öê •ÖÖŸÖê. µÖÖ ÃÖÓãÖêÛú›êü ×›üו֙ü»Ö »ÖÑݾÖê•Ö †Ö×ÞÖ Ûú´µÖã×®ÖÛêú¿Ö®Ö ×ÃÛú»ÃÖ »Öò²Ö †ÖÆêüŸÖ. ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ˆªÖëÝÖÖÃÖÖê²ÖŸÖ µÖÖ ÃÖÓãÖê®Öê ÃÖÆüÛúÖµÖÔ Ûêú»Öê †ÖÆêü. ÛéúÂÖß-ˆªÖêÝÖ õÖê¡ÖÖŸÖᯙ ®Ö¾µÖÖ ˆ¤üµÖÖê®´ÖãÜÖ ¯ÖϾÖÖÆüÖÓ¿Öß ÃÖãÃÖÓÝÖŸÖ †¿Öß µÖÖ †³µÖÖÃÖÛÎú´ÖÖŸÖß»Ö ×¾ÖÂÖµÖ ‘Ö™üÛúÖÓ“Öß ÃÖÓ¸ü“Ö®ÖÖ Ûêú»Öß †ÖÆêü.
ÃÖÓ¯ÖÛÔú- ‡Ó×›üµÖ®Ö ‡Ó×Ùü™ü¶æ™ü †Öò±ú ¯»Öò®™êü¿Ö®Ö ´Öò®Öê•Ö´Öë™ü, –ÖÖ®Ö³ÖÖ¸üŸÖß Ûòú´¯ÖÃÖ, ¯ÖÖêÙü †Öò×±úÃÖ ´ÖÖ»ÖÖ£Ö»»Öß ²ÖëÝÖôãû¹ýü- 560056, ¤æü¸ü¬¾Ö®Öß, 080-560056, 2321 2767, 2321 2767, ‡Ô´Öê»Ö- admissions@iipmb.edu.in, ÃÖÓÛêúŸÖãÖôû-
www.iipmb.edu.in
(५) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट
हैदराबादस्थित ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. कृषी आधारित उद्योगांना लागणाऱ्या व्यवस्थापकांची निर्मिती या अभ्यासक्रमाद्वारे केली जाते. व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या आघाडीच्या देशस्तरीय खाजगी आणि शासकीय संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट मिळाले आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमन एन्ट्रस टेस्ट द्यावी लागते. प्रांरभिक निवडीसाठी हे गुण ग्राह्य धरे जातात. अंतिम निवड ही मुलाखत आणि समूह चर्चेद्वारे केली जाते. कॉमन एन्ट्रस टेस्ट परीक्षेचा अर्ज भरण्यासोबत या संस्थेचाही प्रवेश अर्ज भरावा लागतो. अर्हता– कृषी व कृषी संबंधित विषय आणि इतर कोणत्याही विषयातील 45 टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये 5 टक्के सूट. अंतिम निवडीसाठी 100 टक्के वेटेज पुढील प्रमाणे विभाजित केले जातात– 55 टक्के वेटेज कॅट गुण, 6 टक्के वेटेज हे शिक्षणातील वैविध्य (डायव्हर्सिटी फॅक्टर), निबंध लेखन– 5 टक्के वेटेज, समूह चर्चा– 10 टक्के वेटेज, मुलाखत– 14 टक्के वेटेज, कार्यानुभव– 5 टक्के वेटेज, शैक्षणिक अर्हता– 5 टक्के वेटेज. संपर्क– प्रिंसिपल कूऑर्डिनेटर–पीजीडीएम–एबीएम,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद-500030, पीजीसेल दूरध्वनी– 040-24016709,ईमेल-pgcell@manage.gov.in,संकेतस्थळ– manage.gov.in
०००
लक्षात ठेवा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत अनेक ऑनलाईन अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम कौशल्य निर्मितीस साहाय्य ठरु शकणारे लघुमुदतीचे आहेत. अशा अभ्यासक्रमांकडे लक्ष ठेऊन विद्यार्थ्यांनी आपली रोजगार-स्वयंरोजगार क्षमता वाढवणे गरजेचे आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये, सर्टिफाइड डेटा ॲनॅलिस्ट, सर्टिफाइड कोर्स ऑन इंटरनेट ऑफ थिंग्ज ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अकाउंटिंग ॲण्ड पब्लिशिंग, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायंस ॲण्ड ॲनॅलिटिक्स इत्यादी विषयांचा समावेश आहे. संपर्क संकेतस्थळ-www.nielit.gov.in/chandigarh, दूरध्वनी- ०१७२- २६५०१२१.
०००
