वेगवेगळ्या क्षेत्रांचा उदय झाला,झपाट्याने वाढ झाली, अशा क्षेत्रांना मोठे भांडवली साहाय्य लाभले,तंत्रज्ञानाचा आधार लाभला,परदेशी कंपन्यांशी सहकार्य झाले वगैरे वगैर,हे जरी सत्य असले तरी सर्व प्रकारच्या संकटाशी दशकानुदशके सामना करत कृषीक्षेत्र हेच भारतील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरत आहे.अगदी २०२५मध्ये सुध्दा या परिस्थितीत काही बदल झालेला नाही.भारतातील ५० टक्यांच्या आसपास लोकसंख्या कृषीक्षेत्र व त्याच्याशी संबंधित विविध उपक्षेत्रांवर अवलंबून आहे.कृषीक्षेत्रातील विविध उत्पादनात भारत हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.कृषी,वानिकी(फॉरेस्ट्री),मासेमारी यांचा सकल राष्ट्रीय उत्पादना १८ टक्क्यांचा वाटा आहे.वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन यापुढे कृषी उत्पादनाचे वाणिज्यकरण करण्याकडे सगळया जगात लक्ष पुरवण्यात येत आहे.पुरेसे उत्पादन आणि समन्यायी वितरण याकडे पुढील काळात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.जागतिकीकरणानंतर भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती लक्षणीयरित्या वाढली आहे.त्याच्या आहारविहाराच्या पध्दतीमध्येही मोठा बदल झालेला दिसतो.याबाबी कृषीव्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात अधिकाधिक करिअर संधी निर्माण करण्यात साहाय्यभूत ठरत आहेत.कृषी व्यवसाय आता केवळ शेतीतील उत्पादनाशी निगडित राहिले नसून यामध्ये आता कापणपश्चातच विविध बाबी,प्रकिया,बाजारातील पुरवठा,साठवणूक,निर्यात आदी बाबींचा समावेश झाला आहे.गेल्या काही वर्षा केंद्र सरकार,राज्य सरकार आणि खाजगी उद्योजकांनी याक्षेत्राकडे विविध प्रकारे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कृषीव्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रातकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळू लागल्या आहे.ॲग्रीप्रिन्युर(कृषी उद्योजक) होण्याची संधी मिळू लागली आहे.या अनुषंगाने देशातील दर्जेदार संस्थांनी सुरु केलेले एमबीए इन ॲग्रिबिझिनेस हा अभ्यासक्रम करिअर घडवण्याचा एक उत्तम पर्याय ठरत आहे.
हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काही कौशल्य ठळकपणे प्राप्त करता येते-(१)कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने व्यवस्थापनाच्या विविध बाजूंचे सखोल ज्ञान, (२) उच्च श्रेणीच्या निर्णयक्षतेचे कौशल्य, (३) वित्तीय व्यवस्थापन, (४)विपणन व्यवस्थापन, (५)पुरवठा साखळी व्यवस्थापन, ()मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, ()ग्रामीण विपणन,() सूक्षम वित्त नियोजन, () कृषी माल निर्यातक्षतेचे विश्लेषण, ()शित साखळी व्यवस्थापन, ()कृषी अर्थशास्त्रस, ()कृषीक्षेत्रासाठी नव्या साहित्य/उपकरणांचा विकास, ()कृषी किराणा(रिटेल) व्यवस्थापन
(२) आयआयएम लखनौ-– या संस्थेमार्फत एमबीए इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. कालावधी- दोन वर्षे.
या अभ्यासक्रमाच्या निवड प्रक्रियेत पुढील बाबींचा समावेश आहे– (१) कॉमन एंट्रन्स टेस्ट(कॅट) परीक्षेतील गुण-३५ टक्के वेटेज, (२)शैक्षणिक कामगिरी-बारावी- ५ टक्के वेटेज, ()शैक्षणिक कामगिरी-पदवी- ५ टक्के वेटेज, ()महिला-५ टक्के वेटेज, ()लेखी क्षमता चाचणी(रिटन ॲबिलिटी टेस्ट)- १० टक्के वेटेज, ()मुलाखत – ४० टक्के वेटेज,
अर्हता – कृषी किंवा याक्षेत्राशी संबंधित इतर विषयातील पदवी पदवी परीक्षेतील गुण-खुला संवर्ग -५० टक्के ,राखीव संवर्ग-४५ टक्के.
किंवा कोणत्याही विषयातील पदवी (खुला संवर्ग -५० टक्के गुण ,राखीव संवर्ग-४५ टक्के गुण) आणि कृषी व खाद्दाने क्षेत्राची तीव्र आवड.या संदर्भातील विशेष अर्ज मुलाखतीच्या वेळेस सादर करावा लागेल.
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंध नगर, आयआयएम रोड, लखनौ-२२६०१३, दूरध्वनी-०५२२-६६९६६७८, ईमेल- pgchair@ iiml.ac.in, संकेतस्थळ- iiml.ac.in
०००
(५) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट
हैदराबादस्थित ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. कृषी आधारित उद्योगांना लागणाऱ्या व्यवस्थापकांची निर्मिती या अभ्यासक्रमाद्वारे केली जाते. व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या आघाडीच्या देशस्तरीय खाजगी आणि शासकीय संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट मिळाले आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमन एन्ट्रस टेस्ट द्यावी लागते. प्रांरभिक निवडीसाठी हे गुण ग्राह्य धरले जातात.
अर्हता- कृषी व कृषी संबंधित विषय आणि इतर कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट.
कॉमन एन्ट्रस टेस्ट परीक्षेचा अर्ज भरण्यासोबत या संस्थेचाही प्रवेश अर्ज भरावा लागतो. अंतिम निवडीसाठी 100 टक्के वेटेज पुढील प्रमाणे विभाजित केले जातात- 55 टक्के वेटेज कॅट गुण, निबंध लेखन- 5 टक्के वेटेज, समूह चर्चा- 12 टक्के वेटेज, मुलाखत– 17 टक्के वेटेज, कार्यानुभव- 5 टक्के वेटेज, शैक्षणिक कामगिरी-६ टक्के वेटेज
संपर्क- प्रिंसिपल कुऑर्डिनेटर–पीजीडीएम– एबीएम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद-500030, पीजीसेल दूरध्वनी- 040-24694509,ईमेल-pgcell@manage.gov.in,संकेतस्थळ- manage.gov.in
०००
(१) आयआयएम अहमदाबाद–– या संस्थेमार्फत एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम गेल्या ५० वर्षांपासून चालवला जातो.याक्षेत्रातील हा आपल्या देशातील सर्वोत्कृष्ठ अभ्यासक्रम समजला जातो.कृषी व्यवस्थापनासोबतच या अभ्यासक्रमात अन्न प्रकिया उद्योग, विपणन,ग्रामीण पायाभूत सुविधा व्यवस्थापन यावरही लक्ष केंद्रित केलं जातं.हा अभ्यासक्रम करणारे अनेक विद्यार्थी या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे.बिग बॉस्केट सारख्या यशस्वी स्टार्टची सुरुवात या संस्थेच्या विद्यार्थ्याने केली आहे.
या क्षेत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या समर्थ व्यवस्थापकांची निर्मिती होण्याच्या अनुषंगानं या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील उद्योगांच्या उच्च दर्जाच्या अपेक्षा साध्य करण्याची क्षमता आणि कौशल्य या विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमाव्दारे निर्माण केली जातात.
कृषी आधारित व्यवसाय हा इतर उद्योग/व्यवसायांपेक्षा भिन्न असल्यानं अचुक निर्णय घेणं व त्याची तत्काळ व प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक असते. हे कौशल्य या अभ्यासक्रमाव्दारे शिकवलं जातं. उद्योजकीय प्रेरणा व क्षमतावृध्दीवर भर देण्यात येत असल्याने कृषी आधारित उद्योग/व्यवसायासाठी हे विद्यार्थी सकारात्मक बदलाचे घटक ठरावेत यासाठी विषय घटकांची दिशा निश्चित केली जाते. कालावधी- दोन वर्षे.
आयआयएमच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाची जोड या अभ्यासक्रमास मिळाली असून तो या क्षेत्रातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च श्रेणीच्या करिअरसाठी उपयुक्त ठरतो.
अर्हता- (१) कृषी वा कृषी क्षेत्राशी संबंधित इतर विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.खुला संवर्ग गुण -५० टक्के.राखीव संवर्ग- ४५ टक्के.किंवा
(२) कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.खुला संवर्ग गुण -५० टक्के.राखीव संवर्ग- ४५ टक्के . अशा उमेदवारांना कृषी व खाद्द्याने व्यवसाय क्षेत्रातील आवडीविषयी त्याला एक विशिष्ट नमुन्यातील अर्ज ऑनलाइन सादर करणं आवश्यक आहे.तो सादर केला नाही तर प्रवेशासाठी ही अर्हता ग्राह्य धरली जाणार नाही.
निवड प्रक्रिया– या अभ्यासक्रमारसाठी प्रवेश प्रक्रिया पुढील पध्दतीने राबवली जाते. कॉमन एंट्रंस टेस्ट (कॅट) मध्ये मिळालेल्या गुणांना ६५ टक्के वेटेज दिलं जातं. ३५ टक्के वेटेज (ॲनॅलिटिकल रायटिंग स्किल्स) चाचणी, ॲप्लिकेशन रेटिंग स्कोअर दिले जाते. यामध्ये मुलाखत १० वी ,१२ वी आणि पदवीमधील गुणांचा समावेश असतो.
संपर्क– प्रोग्रॅम ऑफिसर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद-380015, ईमेल- admission@iima.ac.in संकेतस्थळ- iima.ac.in, दूरध्वनी-०७९-७१५२३४५६
सुरेश वांदिले
०००
(३) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस- या संस्थेने सुरु केलेला एमबीए इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट, हा महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो.
या अभ्यासक्रमात वित्त (सूक्ष्म वित्त, धोके व्यवस्थापन, कर्ज, खरेदी विक्री इत्यादी), विपणन (ग्रामीण आणि किराणा (रिटेल) व्यवसाय व्यवस्थापन) पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि करनिर्धारण या विषय घटकांचं आणि जागतिक व्यापर संघटना, कृषीमाल आयात निर्यात/ कृषी वित्त याविषयांचं ज्ञान प्रदान केलं जातं. विद्यार्थ्यांची निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्ग ४५ टक्के गुण.निवड– संस्थेची चाळणी परीक्षा आणि मुलाखतीव्दारे.
संपर्क– जी नंबर १७४/१ हिंजेवाडी, तालुका- मुळशी, जिल्हा पुणे-४११०५७, दूरध्वनी-०२०-२२९४४४०७, ईमेल-director@siib.ac.in संकेतस्थळ-siib.ac.in