(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कृषी शिक्षणाचा राष्ट्रीय मार्ग

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च(आयसीएआर)  या संस्थेमार्फत देशातील ७४ कृषी विद्यापीठ/कृषी शिक्षण देणाऱ्या संस्था यातील शिक्षण,प्रशिक्षण आणि संशोधन यांचं संनियंत्रिण केलं जातं.

देशस्तरावरील महत्वाची कृषी विद्यापीठे, कृषी संस्था, डीम्ड युनिव्हर्सिटी, या केंद्रीय विद्यापीठांमधील कृषी विभागातील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रम प्रवेशासाठी, सीयुइटी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) (आयसीएआर – यूजी) ही परीक्षा घेतली जाते. त्याव्दारे गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात ५८४२ जागा भरल्या गेल्या.

प्रवेश पदध्दती

() १०० टक्के जागा- (अ) चार आयसीएआर- डीम्ड युनिव्हर्सिटी – (१) इंडियन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी- दिल्ली, (२) नॅशनल डेअरी इंस्टिट्यूट कर्नाल, (३) इंडियन व्हेटरनर्री इंस्टिट्यूट- इज्जतनगर, (४) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन- मुंबई, (ब) तीन केंद्रीय कृषी विद्यापीठे- (१) सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी (सीएयू)- इम्फाल, (२) डॉ.राजेंद्रप्रसाद सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (आरपीसीएयू) -समस्तीनगर, (३) राणी लक्ष्मीबाई सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (आरएलबी सीएयू) – झाशी, (क) चार केंद्रीय विद्यापीठातील कृषी विभाग- (१) फॅकल्टी ऑफ ॲग्रिकल्चर- बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) वाराणसी, (२) अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, (३) विश्वभारती विद्यापीठ-शांतिनिकेतन, (ड) आणि नागालँड विद्यापीठ-लुमामी.

 

(२) २० टक्के जागा-

राज्य स्तरीय ६३ कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील २० टक्के जागा या परीक्षेच्या गुणांवर आधारित भरल्या जातात.

अभ्यासक्रमनिहाय अर्हता- (१) बी.एस्सी (ऑनर्स) – कृषी-भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (२) बी.एस्सी (ऑनर्स)-उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/,(३) बी.एस्सी (ऑनर्स)-मत्स्यशास्त्र (फिशरी सायन्स) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र, (४) बी.एस्सी (ऑनर्स)- वानिकी (फॉरेस्ट्री) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र, (५) बी.एस्सी (ऑनर्स)- सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/, (६) बी.एस्सी -फूड न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (७) बी.एस्सी (ऑनर्स)-सेरिकल्चर  -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (८) बी.टेक इन ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (९) बी.टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/

(१०) बी.टेक फूड टेक्नॉलॉजी -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/

(११) बी.टेक इन बायोटेक्नॉलॉजी -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र

(१२) बी.एसस्सी (ऑनर्स) इन नॅचरल फार्मिंग – भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र

(१३) बी.एसस्सी (ऑनर्स) इन ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट- भौतिकशास्त्र/ रसायन शास्त्र/जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित, भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र

अर्हता- १२ वी विज्ञान शाखेत सरासरीने (अ) ५० टक्के गुण- खुला संवर्ग, नॉन क्रिमी लेअर इतर मागास संवर्ग,  आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग (इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास), () ४० टक्के गुण-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर), दिव्यांग.() परीक्षेसाठी बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे ३१ ऑगस्ट रोजी वय किमान १६ वर्षे असावे.

 

 

सरावाची संधी

नॅशनल टेस्टिंग एजंसीने या चाळणी परीक्षेच्या सरावासाठी संगणकीय केंद्रे उपलब्ध करुन दिली आहेत. ही सराव परीक्षा पूर्णपणे मोफत आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी प्रश्न सोडवताना, कोणतीही तांत्रिक अडचण जाऊ नये याचा सराव होण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते.जे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज दाखल करु शकत नाहीत त्यांच्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत देशभर दीड लाख ठिकाणी कॉमन सर्व्हिसेस सेंटरची उभारणी करण्यात येते. यासाठी संपर्क संकेतस्थळ- www.csc.gov.in. उमदेवारांना त्यांच्या घरानजिकच्या केंद्रावर सराव परीक्षा देता येणे शक्य व्हावे यादृष्टिने व्यवस्था करण्यात येते. केंद्रांची माहिती  https://nta.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते.

 परीक्षा केंद्रे

चाळणी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नासिक, पुणे.

संपर्क संकेतस्थळ-www.nta.ac.in किंवा www.icar.org.in