(१) बी.एस्सी (कृषी) हा अभ्यासक्रम केल्यावर, अधिक चांगल्या संधींसाठी संबंधित विद्यार्थी पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी), संशोधन (पीएचडी), एमबीए या अभ्यासक्रमांच्या मार्गावरुन जाऊ शकतो. (२) बँकिंग क्षेत्रातील कृषी/ग्रामीण भागाशी निगडित स्पेशलाइज्ड मनुष्यबळ किंवा प्रोबेशनरी ऑफिसर या पदांच्या चाळणी परीक्षेला बसू शकतो. (३) संघ लोकसेवा आयोग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च श्रेणीच्या पदांसाठीही तो पात्र ठरतो. (३) सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या/उद्योग यांनाही या मनुष्यबळाची गरज भासते. (४) राज्य शासनामार्फत कृषी अधिकारी/ मृदसंधारण अधिकारी/कृषी विस्तार अधिकारी अशा पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना बसू शकतो. (५) कृषी पदवीधरास, विमा क्षेत्रातही संधी मिळू शकते. (६) ॲग्रिकल्चरल रिसर्च सर्व्हिस एक्झामिनेशन (www.asrb.org.in) देऊन संशोधन कार्य करण्याची संधी मिळू शकते. या सेवेतंर्गत मुलाखतीव्दारे उपमहासंचालक, सहाय्यक संचालक, संचालक, प्रकल्प संचालक, विभागीय समन्वयक, संयुक्त संचालक, विभागीय केंद्रांवरील प्रमुख, प्रधान वैज्ञानिक, प्रशिक्षण आयोजक, वरिष्ठ संशोधक आदी पदांची भरती केली जाते. (७) विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा इंडियन काऊंसिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेची ज्युनिअर रिसर्च फेलोशीप ही परीक्षा देऊन संशोधन अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकते. ही परीक्षा उत्तम रितिने उत्तीर्ण झाल्यास सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता प्राप्त होते.
इतर संधी
(१) ॲग्रिकल्चर सायंटिस्ट, (२) प्रॉडक्शन मॅनेजर, (३) फूड मायक्रोबायलॉजिस्ट, (४) क्रॉप स्पेशॅलिस्ट, (५) प्लान्ट जेनिटिसिस्ट, (६) ॲग्रिकल्चरल इंजिनीअर, (७) ॲग्रॉनॉमिस्ट, (८) फॉरेस्टर, (९) वाटर कंझर्व्हनिस्ट, (१०) सॉइल इंजिनीअर, (११) फार्म मॅनेजर, (१२) फूड रिसर्चर, (१३) फर्टिलायझर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, (१४) ॲग्रिकल्चर फूड सायंटिस्ट, (१५) ॲक्वॅटिक इकॉलॉजिस्ट, (१६) हॉर्टिकल्चरालिस्ट, (१७) सॉइल ॲण्ड प्लांट सायंटिस्ट, (१७) ऑपरेशन मॅनेजर इन फर्टिलायझर युनिट, (१८) प्लँटेशन मॅनेजर, (१९) बँकांमधील ॲग्रिकल्चर लोन ऑफिसर
रोजगार देणाऱ्या काही कंपन्या – पुढील काही कंपन्या सातत्याने रोजगार संधी देत असतात- (१) ड्यू पॉईंट, (२) रॅलिज इंडिया, (३) न्युझिवीदू सीड्स, (४) लेमकर्न इंडिया ॲग्रो इक्विपमेंट, (५) ॲदवंता लिमिटेड, (६) मोनसॅन्टो इंडिया, (७) पॉॲब्स ऑर्ग्यनिक इस्टेट्स, (८) नॅशनल ॲग्रो इंडस्ट्री, (९) गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड, (१०) रासी सीडस (११) पार्ले, (१२) डाबर, (१३) पातंजली, (१४) हिंदुस्थान लिव्हर (१५) कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप (उदा.- रोग आणि किटक नियंत्रण, अचूक वेळेवर जलसिंचन आणि मृदा आरोग्य, पॅकेजिंग आणि वाहतूक, शेताची हवाई पाहणी करुन पिकासंदर्भात वा जमिनीसंदर्भात समस्यांचा शोध घेणे इत्यादी)
काही शिक्षण संस्था
वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांशी निगडित घटक व अनुदानित बीएस्सी (ऑनर्स) कृषी, या विषयातील २१ महाविद्यालये आहेत. यामध्ये २२२४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो मात्र इतर विषयांच्या महाविद्यालयांची संख्या अल्प आहे. त्यांची माहिती पुढील प्रमाणे-
(अ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी-
(१) अन्न तंत्रज्ञान – अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक
(२) कृषी अभियांत्रिकी- डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहूरी आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक
(३) कृषी व्यवसाय व्यवस्थापन- काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक
(४) उद्यानविद्या- उद्यानविद्या महाविद्यालय शिवाजीनगर, पुणे आणि उद्यानविद्या महाविद्यालय काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक संपर्क-
(१) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – राहुरी, संकेतस्थळ- mpkv.ac.in (२) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला, संकेतस्थळ-
http://www.pdkv.ac.in/ (३) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ – परभणी, संकेतस्थळ – www.mkv२mah.nic.in , (४) डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ- दापोली , संकेतस्थळ- www.dbskkv.org )
सुरेश वांदिले