केवळ महिलांसाठी-
कौशल्य प्राप्ती, उच्चशिक्षण,
मोदी युनिव्हर्सिटी
ही आपल्या देशातील फक्त मुलींसाठी चालवण्यात येणारी सर्वात मोठी खाजगी युनिव्हर्सिटी आहे. उद्योगपती आर. पी. मोदी यांनी तीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली. उच्च शिक्षणाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात या संस्थेने गेल्या तीन दशकात लक्षणीय भूमिका बजावली आहे. विविध ज्ञानशाखेतून १० हजार विद्यार्थींनींनी या संस्थेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या संस्थेने देश आणि विदेशातील अनेक शैक्षणिक संस्थांशी शैक्षणिक सहकार्य केले आहे. त्यामुळे आधुनिक काळाशी सुसंगत ज्ञानप्रवाहांची विद्यार्थींनींना सातत्याने माहिती होत असते.
उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल या संस्थेस ॲसोचाम या संस्थेच्या वतिने २०१९ साली महिलांची उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून गौरविण्यात आले .
या संस्थेतील विविध स्कूल्समार्फत (विभाग) कृषी, फिजिओथेरपी, आर्किटेक्चर, इंटेरिअर डिझाइन, फॅशन, लॉ, मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, कॉमर्स, सायन्स, आर्ट अशा विविध ज्ञानशाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. संशोधनाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.
स्कूल ऑफ बिझिनेस -अभ्यासक्रम-
बी.ए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स, बी.कॉम (ऑनर्स) वुईथ स्पेशलायझेशन इन स्ट्रॅटेजिक फायनांस, बीबीए, बीबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग/ फायनान्स/ ह्युमन रिसोर्स किंवा टुरिझम मॅनेजमेंट, बीबीए इन डिजिटल मार्केटिंग, इंटिग्रेटेड एमबीए (हा पाच वर्षाचा अभ्यासक्रम असून विद्यार्थींनींना ३ वर्षानंतर अभ्यासक्रम सोडता येतो. अशा विद्यार्थीनींना बीबीए ही पदवी प्रदान केली जाते. )
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी कॅट किंवा मॅट किंवा एनमॅट किंवा झॅट किंवा जीमॅट किंवा मोदी युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट मधील गुण ग्राह्य धरले जातात. कोणत्याही विद्याशाखेतील मुलगी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकते.
स्कूल ऑफ लिबरल आर्टस ॲण्ड सायन्स-
बी.ए (ऑनर्स) इन- (१) सोशिऑलॉजी (२) पोलिटिकल सायन्स (३) इंग्रजी
बी.एस्सी (ऑनर्स) इन (१) फूड ॲण्ड न्युट्रिशन, (२) मॅथेमॅटिक्स, (३)बायोटेक्नॉलॉजी, (४) फॉरेंसिक सायंस, (५) सायकॉलॉजी आणि बॅचलर ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन
स्कूल ऑफ लॉ
बी.ए – एलएलबी (ऑनर्स), बीबीए – एलएलबी (ऑनर्स), बीकॉम – एलएलबी (ऑनर्स), पीएचडी इन लॉ, एलएलबी -तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम
स्कूल ऑफ इंजिनीअरिंग
बी.टेक इन (मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन इंटरनेट ऑफ थिंग्ज, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन क्लॉऊड कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डीप लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन बिग डेटा ॲनालिटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, बायोइंजिनीअरिंग)
स्कूल ऑफ डिझाइन
बी. डिझाइन इन (फॅशन ॲण्ड लाइफस्टाइल ॲक्सेसरीज डिझाइन, फॅशन ॲण्ड मर्कंडायजिंग, फॅशन डिझाइन, टेक्सटाइल डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, युझर एक्सपिरियन्स) बॅचलर ऑफ व्हिज्यूअल आर्टस, एम.डिझाइन इन (फॅशन डिझाइन, फॅशन मर्कंडायजिंग, इन युजर एक्सपिरिअंस )
स्कूल ऑफ एटिकेट ॲण्ड फिनिशिंग स्किल्स
ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना असून शैक्षणिक गुणवत्तेच्या पलिकडे, जीवनात आवश्यक ठरणारे कौशल्य आणि तंत्र, या स्कूलमार्फत शिकवले जातात. स्वीत्ज्ञर्लंड येथील फिनिशिंग स्कूलच्या धर्तीवर मोदी युनिव्हर्सिटीने ही स्कूल सुरु केली आहे. यामध्ये भारतीय परंपरा, मूल्ये आणि संस्कृतीचा सुयोग्य संगम साधण्यात येतो. स्वत:मध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी या स्कूलमधील विविध प्रशिक्षणांमार्फत विद्यार्थींनींना उपलब्ध करुन देण्यात येते. या स्कूलमार्फत तीन महिने,
सहा महिने, एक वर्षं कालावधीचे अभ्यासक्रम/ प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहेत. काही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सहा आठवडे कालावधीचे अभ्यासक्रम/प्रशिक्षण – यामध्ये सोशल ग्रेसेस ॲण्ड एटिकेट्स, पब्लिक स्पिकिंग ॲण्ड कम्युनिकेशन स्किल्स, लेव्हल्स ऑफ फॉर्मल ॲण्ड सेमी फॉर्मल ड्रेसिंग, होम अपकीप, आर्ट ऑफ फाइन डायनिंग, कॉर्पोरेट एटिकेट, बालरुम डान्सिंग, कलनरी आर्ट इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
तीन महिने कालावधीचे अभ्यासक्रम-
यामध्ये कार्पोरेट ॲण्ड बिझिनेस एटिकेट, बॉडी लँग्वेज, क्रिएटिंग लास्टिंग इम्प्रेशन, बालरुम डान्सिंग, प्लॅनिंग ॲण्ड क्रिएटिंग मेमोरेबल इव्हेंट्स, टाइम मॅनेजमेंट, प्रॉडक्टिव्हीटी ॲण्ड इफेक्टिव्हनेस, हेल्थ ॲण्ड पॉझिटिव्ह लाइफस्टाइल थ्रू योग, मेडिटेशन ॲण्ड योग, लेव्हल्स ऑफ फॉर्मल ॲण्ड सेमी फॉर्मल ड्रेसिंग, आर्ट ऑफ फाइन डायनिंग, होम डेकॉर ॲण्ड अपकीप, आर्ट ऑफ पब्लिक स्पिकिंग ॲण्ड कम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी ॲण्ड गेस्ट एक्सपिरिअंस मॅनेजमेंट, लिडरशिप स्किल्स, फोटोग्रॅफी, कलनरी आर्ट, या घटकांचा समावेश आहे.
एक वर्षं कालावधीचे ॲडव्हान्स्ड अभ्यासक्रम/प्रशिक्षण-यामध्ये सोशल ग्रेसेस ॲण्ड एटिकेट्स, कॉर्पोरेट ॲण्ड बिझिनेस एटिकेट्स, बॉडी लँग्वेज, क्रिएटिंग लॉस्टिंग इम्प्रेशन, बालरुम डान्सिंग, लेव्हल्स ऑफ ड्रेसिंग ॲण्ड वार्डरोब मॅनेजमेंट, फोटोग्रॅफी, हॉर्स रायडिंग, वेल्थ मॅनेजमेंट, इंटनॅशनल लँग्वेजेस, फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग, पर्सनॅलिटी ॲण्ड इमेज एनरिचमेंट, कलनरी आर्ट, आर्ट ऑफ पब्लिक स्पिकिंग ॲण्ड कम्युनिकेशन, लिडरशीप स्किल्स, टाइम मॅनेजमेंट ॲण्ड इफेक्टिव्हनेस, हेल्थ ॲण्ड पॉझिटिव्ह लाइफस्टाइल थ्रू योग, मेडिटेशन ॲण्ड झुंबा, सेल्फ डिफेन्स, इंस्ट्रुमेंटल म्युझिक, आर्ट ॲण्ड म्युझिक ॲप्रिशिएशन, कॉर्पोरेट ॲण्ड सोशल रिस्पाँसिबिलिटी प्रोजेक्ट, आंत्रप्रिन्युरशीप या विषय घटकांचा समावेश आहे.
संपर्क – प्राचार्य-९८२९०७४७४९, ईमेल- principal.fs@modyuniversity.ac.in
प्लेसमेंट
विविध ज्ञानशाखेतील विद्यार्थींनींना करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी प्लेसमेंटसेलद्वारे प्रयत्न केले जातात. यासाठी करिअर डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. ॲमेझान, हॅवलेट पॅकर्ड, ॲक्सेंच्यर, ओरॅकल, केपजेमिनी, हनीवेल, एल ॲण्ड टी टेक्नॉलॉजी, आयबीएम, इन्फोसीस, एरिक्सन, व्होडाफोन, आयडिया सेल्यूलर , इंडिया बूल्स, ट्रायडंट, एक्स एल डायनामिक्स, जोरो एज्युकेशन, बँक ऑफ बरोडा, टॉमी हिलफिगर, कॅपिटल व्हाया, बॉन्टोन केबल, ॲक्सिस बँक, इन्डसलँड बँक, टेक महिन्द्रा, आदी नामवंत कंपन्या सातत्याने प्लेसमेंट प्रकियेमध्ये सहभागी होत असतात.
संपर्क – लक्ष्मणगढ जिल्हा सिकर राजस्थान- ३३२३११, दूरध्वनी – ०१५७३-२२५०४१, संकेतस्थळ- modyuniversity.ac.in/cybershiksha ईमेल-info@modyuniversity.ac.in
सायबर सुरक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
मायक्रोसॉफ्ट आणि डाटा सेक्युरिटी कांउसिल ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे हा प्रशिक्षण सुरु केला आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे यास सहकार्य मिळाले आहे. महिलांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी आणि या सुरक्षेच्या अनुषंगाने त्या सक्षम व्हाव्यात यासाठी, प्रशिक्षणाची संरचना करण्यात आली आहे. या प्रशिक्षणांतर्गत महिलांना सायबर सुरक्षेचे तांत्रिक कौशल्य शिकवले जाते. हे प्रशिक्षण कोणत्याही महिला अभियंत्याला घेता येते. या उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षे या दरम्यान असावे. या उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा कमी असावे.
या प्रशिक्षणामध्ये सायबर सुरक्षेच्या मुलभूत बाबी, कार्यप्रणालीच्या मूलभूत बाबी, क्रिप्टोग्रॅफी, नेटवर्क सुरक्षा आणि त्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना, वेब सर्व्हर आणि ॲप्लिकेशन सुरक्षा, सुरक्षेचे लेखांकन, सायबर गुन्हेनोंद या विषय घटकांचा समावेश आहे.
प्रशिक्षण काळात प्रात्यक्षिकांवर लक्ष केंद्रित करण्यात येते. या क्षेत्रातील तज्ज्ञांना शिकवण्यासाठी बोलावण्यात येते. व्यावसायिक तज्ज्ञांकडून व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी काही कौशल्य शिकवली जातात. तार्किक क्षमता आणि सांख्यिकी क्षमता कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा आहे.
संपर्क – लक्ष्मणगढ – ३३२३११, जिल्हा – सिकर, दूरध्वनी- ०१५७३-२२५००१, ईमेल-info@modyunivesity.ac.in