(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन हे आपल्या देशातील फक्त महिलांसाठी, १९९१ साली सुरु करण्यात आलेले पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय होय. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था आहे.

या संस्थेतील पदवीस्तरीय बीटेक अभ्यासक्रम- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इंस्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग या शाखांमध्ये करता येतो. या अभ्यासक्रमांना एमएच-सीईटी या परीक्षेतील गुणांवर  आधारित प्रवेश दिला जातो. (संस्थेत एम.टेक आणि पीएचडी करण्याची सुविधा आहे.)

संस्थेच्या शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा लक्षात घेऊन महत्वाच्या कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५४६ विद्यार्थींना प्लेसमेंट मिळाले.

शासनाच्या नियमांनुसार प्रत्येक संवर्गातील विद्यार्थींना शिष्यवृती/शुल्कमाफीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

संपर्क – क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमेन, कर्वेनगर पुणे – ४११०५२, संकेतस्थळ- www.cumminscollege.org ईमेल-principal@cumminscollege.in,दूरध्वनी-०२०-२४३११०००.

नागपूर कॅम्पस

या संस्थेचे एक कॅम्पस नागपूर येथे २०१० साली उघडण्यात आले. येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग या शाखांमध्ये प्रवेश दिला जातो.

संपर्क– हिंगणा कॅम्पस, मौजे सुकळी (गुपचूप), ता. हिंगणा, नागपूर- ४४१११० दूरध्वनी-९६५७६६७०३०, ईमेल- office@cumminscollege.edu.in, संकेतस्थळ- www.cumminscollege.edu.in

०००