(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

क्रॉफ्ट ण्ड डिझाइन

    हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीत खोलवर रुजली आहेत. पारंपरिक हस्तकौशल्याला समकालीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हस्तकौशल्य व्यवसाय अधिक स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन या संस्थेची स्थापना राजस्थान सरकारमार्फत करण्यात आली आहे.

संस्थेच्या वतिनेबॅचलर इन डिझाइन,हा चार वर्षे कालावधीचा आणि आठ  सत्रांमध्ये विभाजित करण्यात आलेला अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत (१) सॉफ्ट मटेरिअल ॲप्लिकेशन, (२) हार्ड मटेरिअल ॲप्लिकेशन, (३) फायर्रड मटेरिअल ॲप्लिकेशन-(४)ज्वेलरी डिझाइन (५)फॅशन डिझायनिंग (६)क्रॉफ्ट कम्युनिकेशन अशा सहा जागा क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते.एकूण १८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

    अर्हता – हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवाराला करता येतो.यंदा १२ वीची परीक्षा दिलेले उमेदवार सुध्दा प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.

 

 

प्रवेश प्रक्रिया

    या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखील भारतीय स्तरावर क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात जयपूर ,दिल्ली, अहमदाबाद,बेंगळुरू,कोलकता मुंबई, लखनौ अशा काही शहरांमध्ये घेतली जाते..

    या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी वेटेज किंवा गुणांकन पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आले आहे- जनरल अवेअरनेस, क्रिएटिव्हीटी ॲण्ड पर्सेप्शन टेस्टसाठी ३५ टक्के. मटेरिअल, कलर आणि कन्स्पेच्युअल टेस्ट ४५ टक्के,मुलाखत-२० टक्के

    या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड, मुलाखती नंतर केली जाते. या मुलाखती जयपूर येथे घेण्यात येतात.

 

पदव्युत्तर पदवी(मास्टर ऑफ डिझाइन) अभ्यासक्रम

    मास्टर ऑफ डिझाइन इन क्रॉफ्ट्स ॲण्ड डिझाइन हा दोन वर्षे कालावधीचा आणि चार सत्रांमध्ये विभाजित केलेला अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत  (१) सॉफ्ट मटेरिअल ॲप्लिकेशन, (२) हार्ड मटेरिअल ॲप्लिकेशन, (३) फायरर्ड मटेरिअल ॲप्लिकेशन-(४)ज्वेलरी डिझाइन (५)फॅशन डिझायनिंग (६)क्रॉफ्ट कम्युनिकेशन,अशा सहा क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते.एकूण जागा ९०

अर्हता– बी आर्क किंवा बी.डिााइन,बीए डिझाइन किंवा बीएस्सी डिझाइन

संपर्क- इंडियन इन्स्टिट्यूट  ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन, जे-८, झालना इन्स्टिट्युशनल एरिया,जयपूर ३०२००४, राजस्थान, दूरध्वनी:०१४१ -,२७०१२०३,फॅक्स:२७००१६०,संकेतस्थळ -www.iicd.ac.in,ई-मेल-info@iicd.ac.in/admissions@iicd.ac.in

0000