
“गतीशक्ती” आणि डिफेन्स इंस्टिट्यूट
परिवहन आणि मालवाहतुकीच्या अनुषंगाने शिक्षण- प्रशिक्षण आणि या क्षेत्रातील आंतरज्ञानशाखीय संशोधनास प्राधान्य देणाऱ्या, “गतीशक्ती” विश्वविद्यालयाची स्थापना २०२२ करण्यात आली. ही आपल्या देशातील अशा प्रकारची पहिली संस्था आहे. या केंद्रिय संस्थेला रेल्वेमंत्रालयाने प्रायोजित केले आहे. या संस्थेच्या वतिने पुढील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत-
पदवी अभ्यासक्रम
(१) बीटेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग) – या अभ्यासक्रमात रेल्वेसाठी उपयुक्त ठरेल, असे अभियांत्रिकी अभिकल्प (डिझाइन), बांधकाम, देखभाल आदी विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. (२) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग)- या अभ्यासक्रमात, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, सिग्नलिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, परिवहनातील सुरक्षा (कवच, सायबर सेक्युरिटी, परिवहन नियंत्रण) अशा बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. (३) बीटेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग)- या अभ्यासक्रमात, हायस्पीड रेल सिस्टिम, रेल ऑपरेशन, रेल व्हील इंटरॲक्शन, रेल्वे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, रेल मॅन्युफॅक्चुरिंग प्रोसेस, रेल मशिन टूल आदी विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. (४) बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग) इलेक्ट्रिक लोको, इलेक्ट्रिक व्हेइकल्स अशा सारख्या विद्दूत आधारित परिवहन क्षेत्रातील साधनांचे डिझाइन, विश्लेषणाचे कौशल्य आणि सक्षमता, या अभ्यासाच्या माध्यमातून निर्माण केली जाते. , (५) बीटेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (स्पेशलायझेशन इन ट्रान्स्पोर्ट ॲण्ड लॉजिस्टिक्स), या अभ्यासक्रमात परिवहन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकेल अशा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस विषयातील आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य मिळवून दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर डाटा सायंटिस्ट, बिझिनेस ॲनॅलिस्ट अशा करिअर संधी मिळू शकतात. मशिन लर्निंग, डाटा व्हिज्युलायझेशन, स्टॅटिस्टिक्स, या क्षेत्रात, उद्भणाऱ्या प्रत्यक्ष जगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे संशोधन करण्याची संधी मिळू शकते. आयबीएम कंपनीच्या सल्ल्यानुसार अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. (६) बीटेक इन एव्हीएशन इंजिनीअरिंग- या अभ्यासक्रमात, विमानाचे डिझाइन, विमान देखभाल, एरोस्पेस इंजिनीअरिंग ड्रोन आदी विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते.
प्रवेश प्रकिया
या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- मेन (जेइइ-मेन) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. जेइइ मेन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रकियेत सहभागी व्हावे लागेल.
पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन शाखा
या संस्थेने व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी/तंत्रज्ञान या शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केले असून, या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे उपलब्ध झाले आहे.
(१) एमबीए (लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट), (२) एमबीए (पोर्ट्स ॲण्ड लॉजिस्टिक्स). या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅट (कॉमन ॲडमिशन टेस्ट)/ मॅट (मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट)/ झॅट (झेव्हियर ॲपिट्यूड टेस्ट)/ सीयुइटी-पोस्ट ग्रॅज्युएट (कॉमन युनिव्हर्सिटी एनट्रन्स टेस्ट) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
पदव्युत्तर पदवी तंत्रज्ञान शाखा
(१) एमटेक इन इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिम, (२) एमटेक इन रेल्वे इंजिनीअरिंग, (३) एमटेक इन ब्रीज ॲण्ड टनेल इंजिनीअरिंग, (४) एमटेक इन रोड्स ॲण्ड हायवे इंजिनीअरिंग.
आर्थिक साहाय्य
या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असेल, त्यांना शिक्षणशुल्कातून १०० टक्के आणि वसतिगृह शुल्कातून ५० टक्के सूट दिली जाते. ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक आणि ३ लाख रुपयापर्यंत असेल त्यांना शिक्षणशुल्कातून ५० टक्के आणि वसतीगृह शुल्कातून २५ टक्के सूट दिली जाते. एअरबस कंपनीमार्फत ४० विद्यार्थ्यांना, शिक्षण आणि वसतीगृह शुल्कातून १०० टक्के सुट मिळवून दिली जाते. प्लॅसर इंडिया या कंपनीमार्फत १० विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क आणि वसतिगृह शुल्कातून १०० टक्के सूट मिळवून दिली जाते. सिमेन्स कंपनीमार्फत पात्र विद्यार्थ्यांना अशाच प्रकराची सुट मिळवून दिली जाते.
प्लेसमेंट आणि इंटर्नशीप
या अभ्यासक्रमांमध्ये संबंधित उद्योगांना लागणारे कौशल्य आणि तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांना अशा उद्योगांमध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करुन दिली जाते.
पुढील कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आणि इंटर्नशीपची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे- (१) व्होल्वो, (२) आयआरपी इंफ्रा टेक, (३) हिंद रेक्टिफायर, (४) श्रीराम सिमेंट, (५) ट्रान्सवर्ल्ड, (६) फ्लिपकार्ट, (७) टीसीआय, (८) इ २ इ रेल, (९) कॉगपोर्ट, (१०) डीपी वर्ल्ड, (११) टीव्हीएस सप्लाय चेन, (११) वंडर सिमेंट ,(१२) अल्ट्रा टेक, (१३) एक्सप्रेस ग्लोबल लॉजिस्टिक्स, (१४) ओम लॉजिस्टिक्स, (१५) आल कार्गो लॉजिस्टिक्स, (१६) महिंद्रा लॉजिस्टिक्स, (१७) डिलिव्हरी, (१८) जेएसडब्ल्यू, (१९) डीएचएल, (२०) जेएम बक्सी, (२१) इंडी कोल्ड, (२२) आदित्य बिर्ला अल्ट्राटेक
या संस्थेने पुढील काही संस्थांसोबत सहकार्य करार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, इंटर्नशीप, शिष्यवृत्ती, संशोधन, शैक्षणिक भेटी, अशा संधी उपलब्ध होतात- (१) दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन, (२) नोकिया, (३) रेल टेल, (४) कर्मयोगी भारत, (५) कॉनकॉर, (६) पाटील ग्रुप, (७) एअरबस, (७) मोंटाश युनिव्हर्सिटी, (८) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ट्रेनिंग, रिसर्च भोपाळ, (९) महाराज सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी बडोदा, (११) इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स
संपर्क- लालबाग वडोदरा, ३९०००४, ईमेल-admissions@gsv.ac.in, संकेतस्थळ-gsv.ac.in
०००
डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी
भारत सरकारच्या सैन्य मंत्रालय आणि डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत पुढील महत्वाचे पदव्युत्तर पदवीस्तरीय अभ्यासक्रम सरु केले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखांमधील पदवीधरांनी आपल्या पुढील रोडमॅपमध्ये या अभ्यासक्रमाचा समावेश करायला हवा. लष्करी शिस्तितील या दर्जेदार संस्थांमधील हे अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम करिअर संधी मिळवून देऊ शकतात. अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळते. अनुभवी प्राध्यापकांमुळे ज्ञानकक्षा चौफेर होण्यास साहाय्य मिळते.
एम टेकचे स्पेशलायझेशन (१) एरोस्पेस इंजिनीअरिंग- गायडेड मिसाइल, (२) मॉडेलिंग ॲण्ड सिम्युलेशन, (३) कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग- आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग- सेमिकंडक्टर चिप डिझाइन, सिग्नल प्रोसेसिंग ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रडार ॲण्ड कम्युनिकेशन, डिफेन्स ॲण्ड स्पेस इलेक्ट्रॉनिक्स, (४) टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, (५) डाटा सायंस, (६) सायबर सेक्युरिटी, (७) रिन्युएबल एनर्जी, (८) नॅनो सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी, (९) क्वांटम कॉम्प्युटिंग, (१०) सेन्सर टेक्नॉलॉजी/ लेसर ॲण्ड इलेक्ट्रो ऑप्टिक्स, (११) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – मरीन इंजिनीअरिंग, आर्मामेंट ॲण्ड कोम्बॅट व्हेइकल, मेकॅनिकल सिस्टिम डिझाइन, (१३) मटेरिअल इंजिनीअरिंग, (१४) ऑटोमेशन ॲण्ड रोबोटिक्स.
एम.एस्सी इन (१) फूड टेक्नॉलॉजी. हा अभ्यासक्रम डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) म्हैसुरु यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. (२) अप्लाइड फिजिक्स- फोनोटिक्स, (३) मटेरिअल सायंस, (४) डाटा सायंस, (५) ॲप्लाइड केमिस्ट्री, (६) एमएस्सी टेक -फोनोटिक्स
एमटेक अभ्यासक्रमांना गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. तर एमएस्सी अभ्यासक्रमांना जॅम (जॉईंट ॲडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. या सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.
प्लेसमेंट
हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना डीआरडीओ येथे प्लेसमेंटची संधी मिळू शकते. देशातील आघाडीच्या उद्योगांमध्येही चांगली करिअर संधी मिळते. क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी येथे मास्टर अभ्यासक्रम आणि जॉर्ज मॅसॉन युनिव्हर्सिटी येथे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग या विषयात ड्युएल डिग्री अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकते. हे अभ्यासक्रम केलेल्या ९५ टक्केंपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्या आणि उद्योगांमध्ये करिअर संधी मिळत असते.
संपर्क– गिरीनगर पुणे ४११०२५, ईमेल-jr@diat.ac.in संकेतस्थळ-www.diat.ac.in
सुरेश वांदिले