(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गुंतवणुकीचे सूत्रधार      (भाग तीन)

वाणिज्य शाखेशी संबंधित काही अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (बीबीएस)– या अभ्यासक्रमात व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, व्यवसाय गणित, व्यवसाय नीतीमत्ता, कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलिटी, मनुष्यबळ व्यवस्थापन आदी विषय शिकता येतात. मनुष्यबळ व्यवस्थापन विक्री, विपणन, वित्त, विकास आणि संशोधन अशा सारख्या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते.

बॅचलर ऑफ फायनांशिअल मार्केट्स(बीएफएम)– या अभ्यासक्रमात इक्विटी मार्केट, डेट मार्केट, रिस्क व्यवस्थापन, सूक्ष्मअर्थशास्त्र, गुंतवणूक, म्युच्यूअल फंड, सेक्युरिटी मार्केट अशा विषयांचा अभ्यास करावा लागतो. फायनांशिअल मार्केटमध्ये करिअर संधी मिळू शकतात.

बॅचलर ऑफ बॅकिंग ॲण्ड इन्शुरन्स(बीबीआय) या अभ्यासक्रमात फायनान्शिअल अकाउंटिंग आणि व्यवस्थापन, बँकिंग कायदे, व्यवसायविषयक कायदे, कॉर्पोरेटविषयक कायदे, लेखा आणि मूल्य अशा घटकांचा अभ्यास करता येतो. इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट, इनव्हेस्टमेंट अॅनालिस्ट, इनव्हेस्टमेंट बँकर आदी क्षेत्रात  हा अभ्यासक्रम केल्यावर करिअर संधी मिळू शकतात.  

बॅचलर ऑफ अकाउंटिंग ॲण्ड फायनान्स(बीएएफ) -या अभ्यासक्रमांतर्गत अकाउंटिंग आणि फायनांस विषयाचे शिक्षण दिले जाते.

बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन

  कार्पोरेट कार्यालये, बँकिंग ,फायनान्स कंपन्या, फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपन्यांमध्ये  हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी मिळू शकते. स्वत:चा व्यवसाय सुध्दा करता येऊ शकतो.

 बॅचलर ऑफ  मॅनेजमेंट स्टडीज

  व्यवसाय वृध्दी सल्लासेवा, मनुष्यबळ विकास, विपणन संशोधन आदी क्षेत्रात  हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर घडवता येऊ शकते.

   बी कॉम- एलएलबी

  वाणिज्य विषयाशी संबंधित विविध कायदेशीर बाजूंचे ज्ञान या अभ्यासक्रमात संपादित करता येते. त्यामुळे अशा विषयाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात हा पदवीधारक त्यांच्या ग्राहकास चांगली सेवा देऊ शकतो. हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर विक्री आणि अकबारी कर , सेवा कर, आयकर क्षेत्र, कार्पोरेट आणि व्यावसायिक कंपन्या, बँका, वित्तीय व संपत्ती निर्मिती कंपन्या यासाठी सेवा-सल्लागार म्हणूनही करिअर करता येऊ शकते.

करिअर संधी-

() बी.कॉम आणि एमबीए अशा पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कार्पोरेट या ठिकाणी उत्तम संधी मिळू शकते. जो उमेदवार संख्याशास्त्रावर प्रभुत्व मिळवतो त्यास वित्तीय अभियांत्रिकी (फायनांशिअल इंजिनीअरिंग) या उच्चश्रेणीच्या व आव्हानात्मक कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

() जागतिकीकरणानंतर जगभरातील बँका आणि विमा कंपन्यांनी आपले जाळे सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केल्याने या कंपन्यांना तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते आहे. वाणिज्य शाखेची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यामुळे करिअर घडवण्याचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. एमबीए (फायनान्स) हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

() व्यावसायिक आणि व्यापारिक उलाढालीचे उत्तम ज्ञान वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले असल्याने त्यांना ई-कॉमर्स क्षेत्रातही चांगली कामगिरी करता येऊ शकते.

  () वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम व या विषयाशी संबंधित स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम केल्यास पुढील करिअर संधी मिळू शकतात. (१) अकाउंटन्ट,  ()                फायनान्स कन्ट्रोलर, () अकाउंटन्ट एक्झिक्युटिव्ह, () चार्टर्ड अकाउंटन्ट (५) कंपनी सेक्रेटरी (६) फायनान्स ॲनालिस्ट (७) फायनान्स कंट्रोलर (८) फायनान्स मॅनेजर (९) फायनान्स कन्सलटन्ट (१०) इनव्हेस्टमेंट ॲनालिस्ट (११) स्टॉक ब्रोकर (१२) पोर्टफोलिओ मॅनेजर (१३) टॅक्स ऑडिटर (१४) टॅक्स कन्सलटन्ट (१५) ऑडिटर (१६) स्टॅटिस्टियन (१७) इकॉनॉमिस्ट (१८) क्रेडिट मॅनेजर (१९) ज्युनिअर अकाउंटंट (२०) बूक कीपर. (२१) इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- ईकॉमर्स. (२२) कार्पोरेट लॉयर.

०००

 स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम

 चार्टर्ड अकाउंटंट– हे तज्ज्ञ कंपनीचे लेखापरीक्षण, करनिर्धारण आदी बाबींवर लक्ष ठेवतात. कोणत्याही कंपनीमध्ये या तज्ज्ञांना महत्वाचे स्थान प्राप्त होते. कंपनीच्या वित्तीय बाबींची काळजी आणि संनियंत्रण करण्याचे कार्य या तज्ज्ञांना करावे लागते. आर्थिक उलाढाली सातत्याने वाढत असल्याने या तज्ज्ञांची गरजही वाढली आहे. विदेशातील कंपन्याही या तज्ज्ञांच्या सेवा घेतात. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था या विषयाशी निगडित अभ्यासक्रम चालवित असते.१२ वी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. संपर्कwww.icai.org

            कॉस्ट ॲण्ड वर्क्स अकाउंटंट- (सीडब्ल्यूए)- कंपनीच्या विविध प्रकारच्या मूल्यांकनासंदर्भात या तज्ज्ञांना कार्य करावे लागते. या अनुषंगाने कंपनीचे लेखापरीक्षण, आयात-निर्यात कागदपत्रांचे प्रमाणिकरण, प्रशासन, मूल्यनिर्धारण आदी कामेही या तज्ज्ञास करावी लागतात. संस्था आणि कंपनीच्या विविधांगी आर्थिक घडामोडींवर देखरेख ठेऊन धोरणात्मक व्युहनीतीबाबत सल्ले आणि निर्णय या तज्ज्ञांकडून अपेक्षित असतात.

  इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवते. तो फाउंडेशन, इंटरमीजिएट आणि  फायनल असा तीन स्तरीय आहे.

फाउंडेशन अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी करु शकतात. इंटरमिजिएट अभ्यासक्रमास कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर थेट अर्ज करु शकतात.

संपर्क – द इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटटन्ट्स ऑफ इंडिया, १२ सुद्द स्ट्रीट कोलकता- ७०००१६, संकेतस्थळ- https://icmai.in/आणि www.icwai-wirc.org  ईमेल- wirc@icmai.in

 ०००