(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गुरुजी आणि किम कार्दिशन

मुलांचे सामान्य ज्ञान आणि वैचारिक आकलन याची परीक्षा घेण्याचा मोह आज  गुरुजींना झाला. वर्गातआल्याआल्या त्यांनी विद्यार्थ्यांवर थेट प्रश्न फेकला.

बाजीराव पेशवे यांनी मस्तानीवर प्रेम कां केले? सदैव रखरखित वाळंवटासारखा चेहरा घेऊन वावरणाऱ्यागुरुजींच्या चेहऱ्यावर आज गुलाब उगवल्याचे बघून विद्यार्थी आर्श्चचकितच झाले. त्यांनी एकमेकांना चिमटे घेऊन हेआपलेच गुरुजी आहेत की तोतया गुरुजी आहेत याची खातरजमा करुन घेतली. या खातरजमेनंतर वर्ग गंभिर झाला. वर्गात चिडिचूप शांतता निर्माण झाली. हे बघून गुरुजींना आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान निम्नस्तरीयअसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा एकदा बाजीराव पेशवे पहिले मस्तानीच्या प्रेमात कां पडले हा प्रश्न थेटरमेशकडे फेकला. रमेशला उभे राहणे भाग पडले. तो, त त प प करु लागला. त्याची विकेट गेल्याचे बघून गुरुजींनाआनंद झाला. विद्यार्थ्यांची सामान्य

ज्ञान पातळी किती खाली गेलीय हे पुन्हा सिध्द होत होते.

गुरुजींनी हा प्रश्न अरुणाकडे फेकला. अरुणा धीट होती, ती म्हणाली, गुरुजी बाजीरांवाचे मला माहीत नाहीपण सलमान खान याने ऐश्वर्या रॉयवर कां प्रेम केले हे मी सांगू शकते. सांगू कां?

अहो, अरुणाताई अरबी समुद्राचे वर्णन करा असा प्रश्न आल्यावर तुम्ही मिठी नदीचे वर्णन लिहाल का? नाही ना.

गुरुजी, तुम्ही चुकताहात, प्रेमात काहीही चालतं. ते कधी समुद्रासारखं असतं तर कधी नदीसारखंच कायनाल्यासारखंही होऊन जातं. अरुणा ताडकन म्हणाली.

गुरुजी, प्रेम म्हणजे पाटीवर पटृीने काढलेली सरळ रेषा नव्हे हो. सरळ रेषेत जाते ते प्रेम नव्हेच. प्रेमाची रेषा मध्येतुटली पाहिजे, गायब झाली पाहिजे. या रेषेचा त्रिकोण झाला पाहिजे. या रेषेतून आणखी रेषा निघाल्या पाहिजेत तरचते खरे प्रेम. अरुणाचा धिटपणा बघून गोविंदास स्फुरण येऊन तो बोलून गेला.

त्याला पाठिंबा देत रश्मी म्हणाली, गुरुजी गोंविदाने जे सांगितलं ते खरं की खोट हे तुम्ही तपासू शकता.

कुणाकडून? गुरुजी संयम राखत म्हणाले.

विल्यम शेक्सपियर किंवा आपले कालिदास. रश्मी उद्गारली.

मी त्यांना नक्किच विचारुन खात्री करुन घेईन, पण रमेशने दिलेले उत्तर अचुक आहे, असेच तुम्हास वाटते का, गुरुजींनी प्रश्न केला.

गुरुजी प्रेम अचुक कसे राहू शकेल. प्रेम म्हणजे गणित आहे की रसायनशास्त्रातील सूत्रे आहेत, विनोदने मुद्दामांडला.

याचा अर्थ मी काय घ्यायचा, गुरुजींनी विचारलं.

याचा अर्थ सरळसाधा आहे गुरुजी. प्रेम म्हणजे प्रेम असतं, सलमान-ऐश्वर्याचं असो की बाजीराव मस्तानीचं सेम टूसेम असतं. प्रदीपने सांगून टाकले.

विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची ही खालावलेली पातळी बघून गुरुजींचा संयम कमी होऊ लागला. वरकरणी शांतराहत त्यांनी कविताकडे बाजीराव मस्तानीचा प्रश्न फेकला.

गुरुजी हा प्रश्न ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा गहन आहे का, कविताने प्रतीप्रश्न केला.

प्रेमात अर्थव्यवस्था कुठून बरे आली मिस कविता, गुरुजी चढ्या आवाजात म्हणाले.

गुरुजी असं कसं म्हणता, ऐश्वर्याची अर्थव्यवस्था उत्तम नसती तर सलमान काय तिच्या प्रेमात पडला असता का, मस्तानी छत्रसाल राजाची कन्या नसती आणि त्यांच्या मुदापकखान्यात काम करणाऱ्या आचाऱ्याची मुलगी असती तरबाजीरावांनी तिच्यावर प्रेम केले असते का, कविता उद्गारली.ते बघून सतीशलाही चेव आला, गुरुजी आपल्याकोणत्याही चित्रपटात हिरो किंवा हिरॉइनपैकी एकाची तरी अर्थव्यवस्था उत्तम असते. दोघेही गरीब असून प्रेमातपडल्याचे तुम्ही एखादा चित्रपट दाखवा आणि आमच्या कडून शंभर रुपये मिळवा. गुरुजींचा रागाचा पारा चढलाचहोता, पण विद्यार्थ्यांचा हा उध्दटपणा त्यांना सहन होत नव्हता.

प्रेमामध्ये अर्थव्यवस्था महत्वाची ठर नाही तर भावना महत्वाच्या असतात, गुरुजी शक्य तितका संयम राखतम्हणाले.

गुरुजी तेच आम्हास सांगायचे आहे, सलमान-ऐश्वर्याच्या प्रेमाची भावना आणि बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचीभावना आणि जोधा अकबर यांच्यातील प्रेमाची भावना सारखीच राहणार की नाही. गोविंद म्हणाला.

एकाची भावना गोरी,एकाची निमगोरी आणि एकाची पांढरीफटक अशी तर राहू शकत नाही. निलम म्हणाली.असे जर असते किम कार्दिशन ही आफ्रिकन टीम-ली याच्या प्रेमात पडली असती का?

कोण ही कार्दिशन. गुरुजी पुरते गांगरुन गेले आणि आता थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले.

गुरुजी,तुम्हास किम कार्देशन माहीत नाही म्हणजे काय?

अरेरे..

गुरुजींना किम कार्दिशन माहीत नाही, वर्ग एका सुरात खिदळत म्हणाला.

अरे चूप बसा, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट माहीत असायलाच पाहिजे असा काही नियम नाही…आपल्या अज्ञानानेखजिल होत गुरुजी म्हणाले.

गुरुजी हाच नियम आमच्या बाबतीतही कां लागू होत नाही. दिगंबरने विचारले..

म्हणजे काय ?

गुरुजी, बाजीराव मस्तानीच्या प्रेमात कां पडले याची माहिती आम्हास कां असावी बरे ? माझा भाऊ आमच्यासमोर राहणाऱ्या देशपांडेच्या पोरिच्या प्रेमात कां पडला हे मी सांगू शकते, पिंकी म्हणाली.

अगदी बरोबर..प्रदीप उठून म्हणाला. खरे तर त्यास तो पिंकीच्या कां प्रेमात पडला आहे, हे सुध्दा सांगावायचेहोते. पण त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले.

गुरुजी, तुमचे चुकले असे नाही वाटत का, विनयने धिटपणे विचारले.

आता मात्र गुरुजींचा राग अनावर झाला.

गधड्यांनो तुमचे सामान्य ज्ञान बघण्यासाठी मी हा प्रश्न विचारला होता. पण तुमचे ज्ञान  दिव्य निघाले.

जसे गुरुजी तसेच विद्यार्थी , तोमेश्वर म्हणाला.

म्हणजे रे काय गधड्या, रागावून गुरुजी बोलले.

गुरुजी, आम्हास बाजीराव मस्तानीचे प्रेम माहीत नाही आणि तुम्हास किम कार्देशन माहीत नाही. झालीफिट्टमफाट. आमचे सामान्य ज्ञान दिव्य असेल तर तुमच्या सामान्य ज्ञानाची इयत्ता किंडगरगार्डनची सुध्दा नाही, जयदेवउद्गारला.

आता गुरुजींचा संयम पुरता ढळला. रागाचा पारा चढला. हातात छडी असती तर एकेकाला बदडून काढले असतेअसे वाटून ते वर्गाबाहेर तरातरा निघून गेले….