(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

जहाज बांधण्याची कला

  व्यापारी व प्रवासी सागरी वाहतुकीस अधिकाधिक महत्व येत आहे. या वाहतुकीचा कणा असलेले प्रवासी जहाज, मालवाहू जहाज पाणीबुड्या, नौका, सागरी टँकर्स, अतिवेगवान जलनौका, फेरिज, युध्द नौका यांची निर्मितीसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे नॅव्हल अर्किटेक्चर आणि शिप बिल्डिंगचा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवारांना जहाजाचे डिझाइन, बांधणी, निर्मिती, दुरुस्ती, देखभाल या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात. या अभियंत्यांना खोदकाम प्लॅटफार्मचे डिझाइन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही कार्य करावे लागते.

  नॅव्हल आर्किटेक्ट हे जहाज बांधणी, उत्पादन आणि सुरक्षा या विषयाशी संबंधित आहे. या विषयातील तज्ज्ञ जहाज, बोटी, पाणबुडी यावर होणाऱ्या सागरी पर्यावरणाच्या परिणामांचा अभ्यास करतात. सागरी फलाटांचे डिझाइन, निर्मिती आणि संनियंत्रण करण्याची जबाबदारी या तंत्रज्ञावर असते. सागरीतळाच्या संशोधन कार्यात यांचा महत्वाचा सहभाग असतो.

  हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना जपान कोरिआ, भारत व इतर देशांच्या जहाज निर्मिती  व बांधणी कंपन्या, नौदल, तटरक्षक दल, डॉकयार्ड, शिपयार्ड, शिप सर्व्हेयर, शिप डिझाइन इन्स्टिट्यूट, आइल रिग कॅन्स्ट्रक्शन सेंटर्स, नव्हॅल ॲण्ड ओशनोग्रॅफी सेंटर्स  आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. हे अभियंता जहाज बांधणी, निर्मिती, डिझाइन व इतर तांत्रिक बाबतीत सल्ला वा सहाय्य सेवा सुध्दा देऊ शकतात. सागरी पर्यावरण व सागरी संशोधनाचे कार्य करण्याची संधी मिळू शकते. जे विद्यार्थी नॅव्हल आर्किटेक्ट आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करतात त्यांना संपूर्ण सागरतळाच्या / शिपयार्डच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते किंवा जहाज बांधणीचे नियोजन, निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष बांधणी अशा मर्यादित स्वरुपाचे काम सोपवले जाऊ शकते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर प्रि-सी ग्रॅज्यूएट मेकॅनिकल इंजिनीअरिंग हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम केल्यावर मरिन इंजिनीअर म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी (आयएमयू)मार्फत बी.टेक इन नॅव्हॅल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम चालवण्यात येतो. हा निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- १२ वीमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात सरासरीने ६० टक्के गुण आवश्यक. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजित ५० टक्के गुण आवश्यक. अनुसूचित जाती जमाती संवर्गातील उमदेवारांना गुणांमध्ये ५ टक्के सुट. वयोमर्यादा () मुले- २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ३० वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी – २८ वर्षे. ()मुली-२७ वर्षे, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग-३२ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-३० वर्षे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे सर्व उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.

०००

इतर अभ्यासक्रम

() बी.एस्सी इन शिप बिल्डिंग ॲण्ड रिपेअर. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. हा अभ्यासक्रम इंडियन मेरिटाइम या संस्थेशी संलग्नित कॉलेज ऑफ शिप टेक्नॉलॉजी – पल्लकड याच एका संस्थेत करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्याची गरज नाही. थेट प्रवेश दिला जातो. अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के गुण. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजित ५० टक्के गुण.

() बीबीए इन लॉजिस्टिक्स -रिटेलिंग- ई कॉमर्स. कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा देण्याची गरज नाही. या विद्यार्थ्यांना फक्त १२ वीच्या गुणांसह ऑनलाइन नोंदणी करावी लागते. सरासरीने ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. १० किंवा १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. वयोमर्यादा – () मुले- २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग-३० वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-२८ वर्षे. () मुली – २७ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ३२ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी- ३० वर्षे. हा अनिवासी म्हणजेच कॅम्प्सच्या बाहेर राहून हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम चेन्नई आणि कोची कॅम्पसमध्ये शिकवला जातो.

() ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड बीबीए इन मेरिटाईम लॉजिस्टिक्स. कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा देण्याची गरज नाही. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या विद्यार्थ्यांना फक्त १२ वीच्या गुणांसह ऑनलाइन नोंदणी करावी लागते. सरासरीने ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. १० किंवा १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. वयोमर्यादा-() मुले- २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ३० वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी – २८ वर्षे. () मुली-२७ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग – ३२ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-३० वर्षे. हा अनिवासी म्हणजेच कॅम्प्सच्या बाहेर राहून हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम चेन्नई आणि कोची कॅम्पसमध्ये शिकवला जातो.

आयएमयूला संलग्नित संस्था

() अँग्लो इस्टर्न ॲकॅडेमी, मुंबई अभ्यासक्रम – डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, () ॲप्लाइड रिसर्च इंटरनॅशनल, न्यू दिल्ली, अभ्यासक्रम – डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, () कोईम्बतूर मरिन कॉलेज, कोईम्बतूर, अभ्यासक्रम- बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, ()डॉ.आंबेडकर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोर्ट ब्लेअर , अभ्यासक्रम – डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, () इरो टेक मेरिटाइम ॲकॅडेमी, कोचिन अभ्यासक्रम – बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, () एचआयएमटी कॉलेज चेन्नई अभ्यासक्रम – बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, () इंटरनॅशनल मेरिटाइम इंस्टिट्यूट, नवी दिल्ली, अभ्यासक्रम – बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, आणि डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, () मेरिटाइम ट्रेनिंग इंस्टिट्यूट, मुंबई, अभ्यासक्रम – डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, () आर.एल इंस्टिट्यूट ऑफ नॉटिकल सायंस मदुराई, अभ्यासक्रम – बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, एकूण जागा, (१०) समुद्रा इंस्टिट्यूट मेरिटाइम स्टडीज, मुंबई, अभ्यासक्रम – बीटेक- मरिन इंजिनीअरिंग आणि डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (११)श्रीराम इंस्टिट्यूट मरिन स्टडीज, नवी दिल्ली, अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (१२) सदर्न ॲकॅडेमी ऑफ मेरिटाइम स्टडीज, चेन्नई, अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (१३) द ग्रेट इस्टर्न इंस्टिट्यूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, मुंबई, अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (१४) तोलाणी मेरिटाइम इंस्टिट्यूट, मुंबई, अभ्यासक्रम – बीटेक- मरिन इंजिनीअरिंग, आणि बीएस्सी इन नॉटिकल सायंस, (१५) ट्रेनिंग शिप रहमान, मुंबई, अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (१६) याक एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई, अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (१७) कॉलेज ऑफ शिप टेक्नॉलॉजी, पलक्कड, अभ्यासक्रम- बीएस्सी इन शिप बिल्डिंग ॲण्ड रिपेअरिंग.

०००

इंडियन नेव्ही मध्ये सेलर(खलाशी)भरती

शेफ (स्वयंपाक/भोजनगृहाची संपूर्ण व्यवस्था), स्ट्युअर्ट (अन्नपदार्थाचे मेसमध्ये वाटप/स्वच्छता इत्यादी), हायजिनिस्ट (कॅशरुमची स्वच्छता इत्यादी) या कार्यासाठी  उमेदवारांची नियमितपणे भरती केली जाते . अर्हता- १०वी उत्तीर्ण. फक्त मुलांनाच अर्ज करता येतो.ही भरती मॅट्रिक रिक्र्युट यानावाने ओळखली जाते.

निवडीसाठी लेखी परीक्षा घेतली जाते.या परीक्षेमध्ये गणित आणि विज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात. वेळ ३० मिनिटे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्द्यार्थ्यांना शारीरिक क्षमा चाचणी परीक्षा द्यावी लागते.यानंतर वैद्यकीय चाळणी केली जाते. या तिनही चाळणीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची निवड केली जाते. प्रशिक्षण कालावधी – १२ आठवडे. संपर्क-www.joinindiannavy.gov.in

 

 

कोटक कन्या स्कॉलरशीप

कोटक महिंद्रा उद्योग समूहामार्फत गुणंवत विद्यार्थींनींसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. नामवंत व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चर, डिझाइन, स्पेशलाईज्ड कामर्स, फायनांस, कॉम्प्युटर सायंस अशा सारख्या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींनी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

या विद्यार्थींनींना १२ वीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळायला हवेत. पालकांचे वार्षिक उत्पन्न  ३ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. या शिष्यवृत्ती अंतर्ग दरवर्षी एक लाख रुपयाचे सहाय्य केले जाईल.

संपर्क- https://www.buddy4study.com/page/kotak-kanya-scholarship