(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

जेरिॲट्रिक
केअर -वृध्द सेवा

    एकत्र कुटुंब पध्दती मोडित निघाल्याने आणि
वयोमानात वाढ झाल्याने वृध्दत्व आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली
आहे. हे जग तरु
णांचे असले
तरी ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षून चालणा
रे नाही. त्यांच्या परीश्रमावरच आजची पिढी
प्रगतीच्या वाटेवर भरधाव धावत असते.

वृध्दांची
सेवा आणि काळजी हा सामाजिक आणि भावनिक असलेला विषय एक वेगळया प्रकारच्या करिअरची
संधी उपलब्ध करुन देतो. या विषयाच्या अनुषंगाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स
या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (
1) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन
इंटिग्रेटेड जेरिॲट्रिक केअर, कालावधी एक वर्षं
. अर्हता
कोणत्याही विषयातील पदवी
. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.

        (2) सर्टिफिकेट कोर्स इन जेरिॲट्रिक केअर हा तीन
महिने कालावधीचा पूर्ण वेळेचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. ही संस्था भारत सरकारच्या
सामाजिक न्याय आणि सक्षमिकरण मंत्रालयाच्या कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे.
अर्हता– दहावी
उतीर्ण.

संपर्क – डेप्युटी
डायरेक्टर
,
ओल्ड एज केअर डिव्हिजन, नॅशनल इंस्टिटयूट ऑफ सोशल
डिफेन्स
, मिनिस्ट्री
ऑफ सोशल जस्टिस ॲण्ड एम्पॉवरमेंट
, वेस्ट ब्लॉक-1, विंग-3, फर्स्ट
फ्लोर
, आर.के.पूरम
,न्यू
दिल्ली-
110066, दूरध्वनी-011-26106883.
संकेतस्थळ-www.nisd.gov.in

000