तेजोमयी ज्या सदनिकेत राहते, त्याच्या प्रवेशव्दाराजवळील पॅसेजमधील भिंतीमध्ये, काचेच्या लहान तबकावर, गणपतीची मूर्ती, बाबांनी ठेवली होती. या मूर्तीचा बराच भाग तबकाच्या बाहेर आल्याने, ती भिंतीला घट्ट चिटकून बसावी यासाठी, त्यांनी फेव्हिकॉलसाररखी काहितरी चिक्की लावली.
अधूनधून आई – बाबा या मूर्तीला स्वच्छ करत. या स्वच्छ करण्याकरण्यात कदाचित मूर्तीची भिंतीसोबतची पकड ढिली झाली असावी. एकदा आईच्या ते लक्षात आलं. तिने बाबांचं त्याकडे लक्ष वेधलं. पण बाबांनी तिकडे दुर्लक्ष केलं. आईसुध्दा नंतर, ही गोष्ट विसरुन गेली.
परवा मंगळवारी अघटित घडलं. दुपारचं जेवण घेताना अचानक मोठा आवाज आला. आई पॅसेजकडे धावली. मूर्ती पडून तुटल्याचं तिने बघितलं. तिने ओरडून बाबांना बोलावलं. तेजोमयी, अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडर पॅसेजकडे धावले.
मूर्तीचे दोन तुकडे बघून तेजोमयीच्या पोटात धस्स झाले.
“अरे बापरे!” बाबा उद्गारले.
“मूर्ती हलतेय म्हणून, तुम्हाला आधीच कल्पना दिली होती की, पण, तुम्ही माझ्या सांगण्याकडे दुर्लक्षं केलं. बघा आता काय झालं. गणेशाचा कोपच झाला समजाना ”आई चढ्या स्वरात म्हणाली.
“चूक मान्य. पण यात गणेशाचा कोपाचा काय संबंध?” बाबा म्हणाले.
“आपली बुध्दी पाजळू नका.” मूर्तीचे तुकडे गोळा करीत आई रागावली.
“आता काय होणार आई?” तेजोमयीने घाबरुन विचारलं. ती घाबरल्याचं लक्षात आल्यानं अले क्झांडरच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. गोर्जीसाठी हे सगळं नवं होतं. तिने, या तिघांचं बोलणं मेंदूतल्या डीप लर्निंगकडे पाठवून त्याचं विश्लेषण करण्याची सूचना केली.
दरम्यान, आईने मूर्तीचे तुटलेले भाग एका प्लॅस्टिक पिशवित ठेवले नि तणतण करत आत निघून गेली. सगळ्यांचं जेवण अर्धवटच राहिलं.
काही क्षण असेच गेले. कुणीच कुणाशी बोलेना. ही शांतता गोर्जीला असह्य झाली.
अखेर ती आईबाबांना म्हणाली, “असे उपाशी राहू नका. नाहीतर श्रीगणेश खरोखरच रागावतील.”
तेजोमयीला ते पटलं. जेवणावर कधी राग काढू नये, असं आईबाबा बरेचदा तिला सांगत, याची आठवण तिने आईला करुन दिली.
“उगाच शहाणपणा करु नकोस.” आई गरजली. तेजोमयीचं तोंड इवलसं झालं.
“अगं, माझा राग तिच्यावर कां काढतेस?” बाबा नाराजी व्यक्त करत म्हणाले.
“तुमचं असचं असतं.” गोर्जी बोलून गेली. आई, बाबा, तेजोमयी आणि अलेक्झांडरने तिच्याकडे चमकून बघितलं.
“तुला गं काय कळतं?” आई, गोर्जीला रागावली.
“मॉम, तुम्ही मंडळी, वेळेवर जे काही करायला हवं, ते करत नाही. मग असं काही विपरित घडलं की एकमेकांना दोष देता.” गोर्जी धिटपणे म्हणाली. डीप लर्निंगने तिच्याकडे असा निष्कर्ष धाडला होता.
“खरंच चुकलच माझं, तू सांगितलस तेव्हाच, मी हलणाऱ्या मूर्तीकडे लक्षं देऊन, तिची पकड आणखी घट्ट केली असती तर आजची स्थिती उदभवली नसती.” बाबा आईला म्हणाले.
“तुमचं तर चुकलंच डॅड. पण मॉमचं काय?”
“मी काय केलं भवाने?” आई गरजली.
“तुमच्या बोलण्याकडे डॅड दुर्लक्ष करताहेत हे लक्षात आल्यावर, तुम्ही मूर्तीची पकड घट्ट करु शकला असताना मॉम. पण तसं नाही केलंत तुम्ही.”
“गोर्जे, उगाच शहाणपणा करु नकोस.” आई पुन्हा गरजली.
“अगं पण आई, ती खरंच बोलतेयना. उगाच तिला कशाला धारेवर धरतेस. तुम्हा दोघांपैकी कुणीही मूर्तीची पकड घट्ट केली असती तर, आजची दुघर्टना घडतीच ना.” तेजोमयी हिम्मत करुन म्हणाली. ‘बरोबर बरोबर,’ अशा आशयाची मान अलेक्झांडरने डोलावली. आईलाही ते पटलं. तिचा राग थोडा शांत झाला.
“हे बघा, मॉम डॅड, केवळ दुर्लक्ष करण्यातून आणि वेळेच्यावेळी उपाय न केल्याने मूर्ती तुटली. अनेकदा तुम्ही तुमच्या तब्येतीच्या कुरबुरीकडेही असेच दुर्लक्ष करता नि ते दुखणं मोठं होतं. हे मी तुमच्या घरी आल्यापासून बघतेय.” गोर्जी म्हणाली. ही मात्रा, चांगलीच लागू पडली. आईचा राग कुठल्या कुठे पळाला. तिने गोर्जीचा हात हातात घेऊन यापुढे, जेव्हाचे काम तेव्हाच करणार, असं तिला कबूल केलं. बाबांनीही तेच केलं. गोर्जी आणि तेजोमयीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अलेक्झांडरने उडी मारून आनंद व्यक्त केला.
सुरेश वांदिले