देशातील शासकीय व शासन सहाय्यित शिक्षणसंस्थांमध्ये पदवी स्तरीय व्यावसायिक (प्रोफेशनल) अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थींनींना प्रवेश मिळाल्यावर शैक्षणिक आणि इतर खर्चाचा प्रश्न आ वासून उभा राहतो. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने, टॉप क्लास एज्युकेशन स्किम, ही योजना सुरु केली आहे.
या योजनेस हे नाव देण्याचे कारण म्हणजे, यामध्ये समावेश करण्यात आलेल्या सर्व संस्था या गुणवत्ता आणि दर्जाबाबत देशात सर्वाधिक महत्वाच्या समजल्या जातात. यासंस्थांमध्ये सर्व इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, नॅशनल इंस्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इंडियन इंस्टिट्यूट इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील हॉटेल मॅनेजमेंट संस्था, राष्ट्रीय विधी महाविद्यालये, केंद्रीय शिक्षण संस्था यांचा समावेश आहे. कर्मशिअल पालयट ट्रेनिंग कोर्स आणि टाइप रेटिंग कोर्स हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या या संवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो.
याशिवाय नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन काउंसिलने, अ प्लस प्लस आणि अ प्लस या श्रेणी दिलेल्या आणि नॅशनल इंस्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क या योजनेंतर्गत पहिल्या १०० संस्थांचा या योजनेसाठी विचार केला जातो.
या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यावर शिष्यवृत्तीच्या स्वरुपात अर्थसाहाय्य पुरवल जाते. यापैकी ३० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव असतात. ज्यामुलींचा क्रमांक गुणवत्तेनुसार सामायिक यादी (मुले आणि मुलींची एकत्र)त लागला असेल, त्यांचा या ३० टक्क्यांमध्ये समावेश केला जात नाही.
मिळणारे लाभ
(१) या शिष्यवृत्तीमतध्ये शासकीय आणि शासन अनुदानित शिक्षण संस्थांतील संपूर्ण शुल्क माफीचा समावेश आहे. (२) खासगी शिक्षण संस्थांमध्ये ही शुल्क माफी दोन लाख रुपयांपर्यंत आणि खाजगी कर्मशिअल पायलट ट्रेनिंग संस्थेसाठी ही मर्यादा तीन लाख ७२ हजार रुपये आहे. (३) पहिल्या वर्षासाठी शैक्षणिक अनुदान ८६ हजार रुपये दिले. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक वर्षासाठी ४१ हजार रुपये दिल जाते याचा उपयोग (अ) संगणक (डेस्कटॉप किंवा लॅपटॉप) आणि त्यासाठी लागणारे इतर साहित्य उदा- प्रिंटर, सीडी, व्हीसीडी, कीबोर्ड, मदर बोर्ड, हार्डडिस्क ड्राइव्ह, माऊस, साउंड ॲडॅप्टर्स, टोनर, स्पीकर मेमरी चिप,यूएसपी हब, केबल, मेमरी कार्ड खरेदी, (ब) पुस्तके आणि इतर साहित्य खरेदी, (क) जीवनाश्यक बाबींसाठी करता येतो.
नियम आणि अटी
(१) पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे. (२) केंद्रिय समाज कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादितील संस्थेपैकी कोणत्याही संस्थेत प्रवेश मिळायला हवा. (३) प्रत्येक संस्थेसाठी विशिष्ट प्रमाणात शिष्यवृत्तींची संख्या निर्धारित करण्यात येते. त्यानुसारच शिष्यवृत्तीचं वाटप केले जाते. (४) एका पालकाच्या केवळ दोन मुलांनाचा या योजनेचा लाभ दिला जातो.
संपर्क- https://tcs.dosje.gov.in/
०००