(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिजिटल फिटनेस

फिटनेस इंडस्ट्रीचा विस्तार आणि वाढ अतिशय वेगाने होत आहे. करोनोत्तर काळात ही वाढ विशेषत्वाने लक्षात आली. उत्तम जीवनशैलीसाठी तंदुरुस्त असण्याची निवड बहुतेकांना पटली. सुजान नागरिकांचा ओढा या क्षेत्राकडे वाढलेला दिसून येतो. फिटनेस इंडस्ट्रीच्या परिघात व्यायामसाठी लागणारी विविध उपकरणे, आधुनिक साहित्यासह उभारलेले जीम/ फिटनेस स्टुडियो/ व्यायामशाळा/ फिटनेस क्लब, हेल्थ ड्रिंक्स/ फूड निर्मिती करणारे व्यवसाय या बाबींचा समावेश होतो.

 योगासारख्या पारंपरिक पध्दतीशिवाय भारतातील तरुण पिढी अत्याधुनिक साहित्य/ उपकरणे/ हेल्थ प्रॉडक्ट्सचा भाग असलेल्या फिटेनस संस्कृतिकडे आकर्षित होत आहे.

गेल्या एक दोन वर्षात फिटनेस उद्योगाची उलाढाल १५ ते २० बिलियन डॉलर्सपर्यंत पोहचल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचा कयास आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या फिकी, ग्लोबल वेलनेस इंस्टिट्यूट, रेडस्सीर कंसलटिंग सारख्या संस्थांच्या अहवालानुसार सध्या जगात ६० लाख व्यक्ती सरासरीने ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत, दरवर्षी फिटनेसशी संबं‍धित विविध बाबीं (सेवा/ उपकरणे/ जिम वर्गणी/ हेल्थफूड) वर खर्च करतात. ही बाब लक्षात घेता या उद्योगाची वार्षिक वाढ २७ टक्क्यांच्या आसपास वर्तवण्यात आली आहे. २०२ पर्यंत जागतिक स्तरावर ही उलाढाल ३२०० कोटी रुपयांपर्यंत पर्यंत जाऊ शकते.

 

जिमपिक या संस्थेच्या अहवालानुसार ५८ टक्क्यांच्या आसपास पुरुष, मसल बिल्डिंग (स्नायू बांधणी/ सिक्स पॅक आदी), तर ८५ टक्के महिलांचा ओढा झुम्बा सारख्या नृत्यव्यायामकडे व वजन घटवण्याकडे असतो. तणावपासून मुक्ती आणि इतर काही शारीरिक समस्यांच्या निराकरणासाठी बरेचजण फिटनेस केंद्राकडे जातात.

काही कारणांमुळे ज्या व्यक्तिंना फिटनेस क्लब किंवा जिममध्ये जावे वाटत नाही, त्या व्यक्ती व्यक्तिगत प्रशिक्षकाची (पर्सनल ट्रेनर) सेवा घेतात. करोना काळात होम व्हीडीओ, लाव्ह ऑनलाइन सेशन या पर्यायांकडे अनेक व्यक्ती वळल्या आहेत.

फिटनेस उद्योगाचा मुख्य ग्राहक हा १५ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती अधिक दिसतात. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाच्या अंदाजानुसार, २०२२ पर्यंत या वयोगटातील भारतातील लोकसंख्या ४४०० लाखापर्यंत जाऊ शकते. या वयोगटातील व्यक्तींमध्ये सुदृढ आरोग्यासाठी बरीज जाणिवजागृती झाली असून ते फिटनेसशी संबंधित बाबींवर मुक्तपणे खर्च करतात.

उच्च मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्तीत वाढ झालेली आहे. नागरिकरणाचा वेगही मोठा असून २०५० पर्यंत शहरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ७००० लाखपर्यंत जाऊ शकते. ही आकडेवारी फिटनेस उद्योगाच्या वाढ आणि‍ विकासाला पुरक अशी आहे. सततचे पळते आयुष्य आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे देशातील ५० ते ५५० लाख लोकसंख्या ह्रदयरोग, मधुमेह, वेगवेगवगळे ताणतणाव यांच्या परिघात येऊ शकतात. ही आकडेवारी जगाच्या तुलनेत ६० टक्के इतकी आहे. याची जाणिव झाल्याने अनेक व्यक्ती फिटनेसकडे लक्ष द्यायला लागले आहेत. पुरुषांसोबत महिलांची संख्याही वाढू लागली आहे. काही जिम किंवा फिटनेस क्लबमध्ये ४५ टक्क्यांच्या आसपास महिला सदस्य असल्याचे दिसून आले आहे. महिलांचा यातील सहभाग हा ट्रेनर, फिटनेस इन्फ्ल्युयंसर, उद्योजक असा आहे.

फिट इंडिया मुव्हमेंट सारख्या उपक्रमांव्दारे, भारत सरकारही फिटनेस महत्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. फिटनेस आणि वेलनेस उद्योग घटकास, मेक इन इंडिया या उपक्रमात महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यामध्ये गोल्ड जिम आणि एनिटाम फिटनेस यांचा ठळकरीत्या उल्लेख करावा लागेल.

गोल्ड जिमचे भारतात २००२ साल आगमन झाले. सध्या देशभरात त्यांची १२० केंद्रे आहेत. एनिटाम फिटनेस कंपनीचे आगमन २०१२ साली झाले. सध्या १०० च्या आसपास केंद्रे कार्यरत आहेत. बेंगळुरु स्थित क्युअर डॉट फिट, या स्टार्टअपमध्ये सिंगापूरच्या तेमॅसक होल्डिंग या कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबईतील फिटेननिटी या कंपनीमध्ये सिक्स्थ सेन्स वेंच्युर्स या कंपनीने गुंतवणूक केली. बेंगळुर येथील जिमपिक कंपनीत राऊंड ग्लास पार्टनर्स या अमेरिकन कंपनीने गुंतवणूक केली आहे.

करोना काळात मार्च २०२० नंतर ‍करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिम आणि हेल्थसेंटर्स बंद करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्याने ही केंद्र सुरु करण्यात आली. पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये ही केंद्रे बंद करण्यात आली. बंद झालेल्या काही केंद्रांनी डिजिटल सेवा द्यायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डिजिटल सेवा देणाया स्टार्टअपचा उदय या काळात झाला. नामवंत खेळाडू, अभिनेते आणि अभिनेत्री यांचे सहाय्य घेऊन ऑनलाइन धडे देण्यास प्रारंभ झाला.

ऑनलाईन फिटनेस व्यायाम पध्दतीला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. क्युअर डॉट फिवर या ऑनलान प्लॅटफॉर्मवर डिसेंबरमध्ये ६ हजार व्यक्तींची नोंदणी होती. मार्चमध्ये ही संख्या ६५ हजारापर्यंत पोहचली. ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांना  वेगवेगळया व्यायाम प्रकारांची सेवा उपलब्ध करुन दिली जाते. अधिकाधिक लोकांचा ओढा घरीच व्यायाम करण्याकडे असल्याने, वजन घटवने (वेट लॉस) आणि फिटनेस ॲपवरील लोकांचा वेळ या काळात ४० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. याच काळात अशा ॲपचा वापर करणाऱ्या लोकांच्या संख्येत दुपटिने वाढ झाल्याचे, बेंगळुरुस्थित इंडियन डिजिटल फिटनेस ॲण्ड वेलनेस प्लॅटफॉर्म हेल्थीफायमीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. पुण्यातील फिटर या संस्थेत, सिक्वॉया कॅपिटल या अमेरिकेन संस्थेकडून, आपले ऑनलान प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी करण्यात आला.

फिटनेस फ्रीलान्सर्स, इंफ्ल्युअंसर्स, फिटनेस ट्रेनर्स आणि फिटनेस चैन या घटकांनी आपल्या सेवा ऑनलान देणे सुरु केले आहे. एनिटाम फिटनेस या संस्थेनेही फेसबूक पेजवर ऑनलान क्लासेस सुरु केले.‍ फिटर संस्थेने न्युट्रिशन (पोषक आहार), व्यायाम या विषय घटकांशी संबंधित ऑनलान वर्ग सुरु केले. याचा फायदा प्रशिक्षकांना त्यांचे कौशल्य आणखी वृध्दिंगत करण्यासाठी झाला. ऑनलान प्लॅटफॉर्मवरील फिटनेस कार्यक्रम/ प्रशिक्षणांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आल्याने काही परदेशी कंपन्यांनी यात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. करोनातील टाळेबंदीमुळे फिटनेस उद्योगाला जो फटका बसला तो त्यांना ऑनलान प्लॅटफॉर्ममुळे भरुन काढण्यास सुरुवात केली. शारीरिक अंतराचे नियम हे काही काळ तसेच पाळावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे पूर्वीइतकाच प्रत्यक्ष प्रतिसाद फिटनेस क्लब/ जिम/ स्टुडियो/ व्यायामशाळा यांना मिळण्यास वेळ लागेल. मात्र तो पर्यंत ऑनलान वर्गाव्दारे ग्राहकांना सेवा देणे आणि त्यातून उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. घरातील ऑनलान व्यायामशाळा ही जाण्यायेण्याचा वेळ वाचवणारी असल्याचे दिसून आल्याने नागरिकांचा ओढाही अशा डिजिटल वर्गाकडे वाढला आहे.

त्यामुळे या क्षेत्रातही करीअर करता येणे शक्य आहे. त्यासाठी स्वत:ला चांगल्या संस्थेतून प्रशिक्षित करुन घेणे, तंत्रज्ञानाची माहिती करुन घेणे आणि अत्यल्प भांडवलाची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

काही अभ्यासक्रम

स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या थिरुवनंतपुरम स्थित लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन कार्यरत असणाऱ्या या संस्थेत, पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट, हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषय घटकांचा समावेश आहेफिटनेस ॲण्ड वेलनेस, फंडमेंटल्स ऑफ ॲनॉटॉमी ॲण्ड फिजिऑलॉजी ॲण्ड कायनेसिऑलॉजी, स्पोर्ट्स ट्रेनिंग, वेट मॅनेजमेंट, फंडमेंटल्स ऑफ न्युट्रिशनल ॲप्लिकेशन इन हेल्थ ॲण्ड फिटनेस, फंडमेंटल्स ऑफ एक्झरसाज टेस्टिंग ॲण्ड प्रिस्क्रिप्शन, डिझायनिंग फिटनेस ट्रेनिंग प्रोग्रॅम, इंज्युरिज ॲण्ड थेरपॅटिक मॉड्युलेशन, योग ॲण्ड मेडिटेशन, फिटनेस ट्रेनिंग फॉर यूथ, वुमेन ॲण्ड ओल्ड एज.

संपर्क लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन करिआवट्टम, पोस्टथिरुवनंतपुरम६९५५८१. दूरध्वनी ०४७१२४१८७१२, ईमेल-sailncpe@gmail.com, संकेतस्थळhttps://www.lncpe.gov.in/

() ग्वाल्हेर स्थित लक्ष्मीबाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेत, पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट, हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या संस्थेस डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. शारीरिक शिक्षण/ प्रशिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक संस्थेला असा दर्जा पहिल्यांदाच मिळाला असून ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. काय शिकाल ?

या अभ्यासक्रमात फिटनेस ॲण्ड वेलनेस, हेल्थ क्लब मॅनेजमेंट ॲण्ड थेरपेटिक ॲस्पेक्टस ऑफ फिटनेस, अप्लाड ह्युमन ॲनॉटॉमी ॲण्ड फिजिऑलॉजी, योग ॲण्ड नॅचरोपथी, फिटनेस मॅनेजमेंट, मॅनेजमेंट ऑफ स्पेशल एरिआज इन फिटनेस इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. संपर्कशक्तीनगर, मेला रोड, ग्वाल्हेर ४७४००२, दूरध्वनी०७५१४०००९१७, फॅक्स४०००९९२, ईमेलregistrar@http://lnipe.edu.in, संकेतस्थळ

http://lnipe.edu.in

०००

 

() बीपीसीए कॉलेज ऑफ फिजिकल एज्यकेशन ॲण्ड गायो फिटनेस ॲकॅडमी या संस्थांच्या वतिने, प्रोफेशनल एज्युकेशन कोर्स इन फिटनेस ॲण्ड एक्झरसाज ॲण्ड न्युट्रिशन सायन्स, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

बीपीसीए कॉलेज ऑफ फिजिकल एज्यकेशन ही , शारीरिक शिक्षण क्षेत्रातील महत्वाची संस्था समजली जाते. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. गायो फिटनेस ॲकॅडमी १९९९ पासून या क्षेत्रात कार्यरत आहे.

अभ्यासक्रम

() सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस सेंटर मॅनेजमेंट (अभ्यासक्रमाचे विषय घटक हिस्ट्री ऑफ फिटनेस वर्ल्ड ॲण्ड इंडिया, बिलिफ ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ फिटनेस कंझ्युमर, मेंबरशीप, मार्केटिंगब्रँडिंगसेल्स, मेंबरशीप सर्व्हिसबिल्डिंग प्रॉडक्ट, बिझिनेस ऑफ फिटनेस, ह्युमन रिसोर्सेस, फॅसिलिटिज ॲण्ड इक्विपमेंट्स, फ्रंट ऑफिस ण्ड बॅक ऑफिस ऑपरेशन, क्लब स्पा इत्यादी), () सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल फिटनेस ट्रेनिंग ( अभ्यासक्रमाचे विषय घटकथेअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ फिटनेस, प्रिंसिपल्स ऑफ ॲनॉटॉमी ॲण्ड फिजिऑलॉजी, प्रिंसिपल्स ऑफ एक्झरसा, कायनसिऑलॉजी, बायोमेकॅनिक्स, प्रिंसिपल्स ऑफ डायट मॅनेजमेंट ॲण्ड परफार्मन्स, न्युट्रिशन, थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग,) () सर्टिफिकेट कोर्स इन स्ट्रेन्ग्थ ॲण्ड स्पोर्ट्स कंडिशनिंग(अभ्यासक्रमाचे विषय घटक इंट्रोडक्शन टू स्ट्रेन्ग्थ ॲण्ड कंडिशन, प्रिंसिपल्स ऑफ डायटेटिक्स, न्युट्रिशन फॉर स्पोर्ट्स परफार्मन्स, फॅसिलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स कंडिशनिंग, इत्यादी)

अर्हता कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टया सक्षम असावा.

संपर्क () चौथा माळा,प्लॉट बी, फेअरलिंक सेंटर, लिंकरोडच्या विरुध्द दिशेला, मॉनगिनीस फॅक्ट्रिच्या बाजूला, वीरा देसाई इंडस्ट्रिअल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई४००००५३, संकेतस्थळ https://www.gayofitnessacademy.com, ईमेल info@gayofitnessacademy.com () कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, भारतीय क्रीडा मंदिर, नायगाव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई४०००३१, दूरध्वनी०२२२४१६८६०९ , फॅक्स२४७१ २४५७ बॉम्बे फिजिकल कल्चरल असोशिएशन.

() चंद्रशेखर आगाशे, कॉलेज ऑफ फिजिकल एज्यूकेशन पुणेया संस्थेतील अभ्यासक्रमआउुटडोअर फिटनेस इंस्ट्रक्टर कोर्स, एरोबिक्स इंस्ट्रक्टर कोर्स, स्केटिंग इंस्ट्रक्टर कोर्स, योगा इंस्ट्रक्टर कोर्स, स्पोर्ट्स ॲण्ड फिटनेस इंस्ट्रक्टर कोर्स, जिम इंस्ट्रक्टर कोर्स, स्पोर्ट्स न्युट्रिशन कोर्स.

अर्हताकोणत्याही विषयातील १२वी.

 संपर्क चंद्रशेखर आगाशे, कॉलेज ऑफ फिजिकल एज्यकेशन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विरुध्द दिशेला, गुलटेकडी पुणे ४११०३७, टेलेफॅक्स२४२६१८७२, संकेतस्थळhttps://agashecollege.org, ईमेलagashecollegepune@gmail.com

 

०००

() इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन,या संस्थेने, बी.एस्सी इन फिटनेस ॲण्ड लाफस्टाल मॉडिफिकेशन, हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता विज्ञानविषयातील विषयातील १२वी. अभ्यासक्रमामध्ये ॲनॉटॉमी, फिजिऑलॉजी, एक्जरसाज फिजिऑलॉजी, फिटनेस असेसमेंट, न्युट्रिशन, लाफस्टाल मॉडिफिकेशन, योग, सायकॉलॉजी, फिटनेस फॉर वुमेन,चिल्ड्रेन ॲण्ड एल्डरली पिपल, डान्स फॉर फिटनेस ॲण्ड लाफस्टाल मॉडिफिकेशन आदी विषय घटकांचा समावेश आहे.

संपर्क इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन, थर्ड फ्लोअर, नंबर ९३६/११६, सिक्स्थ अव्हेन्यू, अण्णानगर, चेन्नई४०, दूरध्वनी०४४२६१८१८१९, ईमेल-info@iism-edu.com, संकेतस्थळ– iism-edu.com

() गोल्ड जिम या संस्थेचे अभ्यासक्रमॲडव्हान्स्ड पर्सनल ट्रेनिंग कोर्स, कालावधीचार महिने, ऑनलान फास्ट ट्रॅक रोड कालावधी एक महिना. संपर्क २०२२०३, ट्रेड अव्हेन्यू, सुरेन रोड, पश्चिम द्रुतगती मार्गाच्या विरुध्द दिशेला, अंधेरी पूर्व४००००९३, भ्रमणध्वनी८९७६८३४८३१, ईमेल WeCare@GoldsGym.in, संकेतस्थळ– https://goldsgym.in/contact