
डिजिटल मार्केटिंग
फेसबूक, यू ट्यूब, इन्स्टाग्रॉम, व्हॉट्सअप, टेलिग्रॅम अशासारख्या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील करिअर घडवण्याऱ्या विविध संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी चांगले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम करणे आवश्यक ठरतं. समाजमाध्यम (डिजिटल) मार्केटिंगच्या क्षेत्रातील अनेक लघु आणि दीर्घ मुदतीचे प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते केल्यास सैध्दांतिक ज्ञानाचा पाया पक्का होऊ शकतो.
डिजिटल मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात, (१) व्युहनीती, (२) ब्रँडची जाणीवजागृती, (३) ग्राहकांना आकर्षित करणे, (४) समाजमाध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळवणे अशासारख्या विषय घटकांचा समावेश असतो.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) आयआयटी मद्रासच्या सेंटर फॉर कंट्युनिईंग एज्युकेशन
यासंस्थेने, ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेशन इन डिजिटल मार्केटिंग अँड ॲनॅलिटिक्स, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. डेटा सायंसचा उपयोग करुन विपणनातील आकडेवारीचे विश्लेषण सक्षमतेने होऊ शकते, हे या अभ्यासक्रमाव्दारे शिकवले जाते.
(३) सोशल मीडिया मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्याने येऊ शकणाऱ्या व्यक्तिंसाठी गुगलने सुरु केलेला, डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन, हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. या अभ्यासक्रमात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, कंटेट मार्केटिंग, वेब ऑप्टिमायझेशन या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्ही निवडलेल्या समाजमाध्यमांव्दारे किती आणि कोणत्या ग्राहकापर्यंत पोहचू इच्छिता याचे उद्दिष्ट्य ठरवण्याचे तंत्रही शिकवले जाते.
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोझिकोड, या संस्थेने इरुडायटस या शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने, प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग ॲण्ड ॲनॅलिसीस हा १० महिने कालावधीचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केला आहे. एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्यशाखेतील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क https://iimk.eruditus.com/digital-marketing-and-analytics/
काय शिकाल?
सोशल मीडियाच्या प्रगत अभ्यासक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश केला जातो. (१) व्टीटर आणि लिंक्डइनवर जाहिराती देणे, (२) फेसबूक आणि इन्स्टाग्रॅमवर जाहिरातीचे विविध प्रकार, (३) समाजमाध्यमे म्हणजे काय? ते इतके लोकप्रिय कां आहेत? (४) आघाडीचh समाज माध्यमे ॲप्स, (५) समाजमाध्यमासंदर्भात नियम आणि नियामके, (६) समाजमाध्यमांवरील कामगिरी मोजण्याची साधने, (७) मूल्य देऊन केलेली मार्केटिंग आणि आपोआप होणारी मार्केटिंग यातील फरक, (८) फेसबूक, स्पनचॅट, लिंक्डइन, यूट्यूब, व्टीटर, इन्स्टाग्रॅम, प्रिंटरेस्ट या माध्यमांची तोंड ओळख, (९) फेसबूक जाहिराती आणि इन्स्टाग्रॅम मार्केटिंगची तोंड ओळख, (१०) शून्यातून ऑनलाइन ग्राहकांचा पाया तयार करणे, (११) प्रदेश, भाषा, आवडनिवड, वर्तणूक यानुसार ग्राहकांचा पाया तयार करणे.
ऑनलाइन अभ्यासक्रम
पुढील काही संस्थांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केले आहेत (१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोलकता, (२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- बेंगळुरु, (३) मद्रास ख्रिश्चन कॉलेज- चेन्नई, (४) डून बिझिनेस स्कूल डेहरादून, (५) डी.वाय पाटील विद्यापीठ पुणे, (८) जी.डी गोयंका युनिव्हर्सिटी गुरुग्राम, (८) नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – मुंबई, (९) इंडियन इंस्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन,दिल्ली.
ऑनलाईन प्लॅटफार्म्स- उदेमी, डिजिटल विद्या, अपग्रॅड, फ्युचर लर्न, कोर्सेरा, एडेक्स, लिंक्डइन लर्निंग. समाममाध्यमांमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या ज्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयाची पदवी असल्यास ऑनलाइन प्लॅटफार्मवरील अभ्यासक्रम करुन त्याला, आवश्यक ती कौशल्य प्राप्त करता येऊ शकतात. काही महत्वाचे ऑनलाईन कौशल्ये पुढीलप्रमाणे आहेत – (१) शॉपिंग ॲड सर्टिफिकेशन, (२) गुगल डिस्प्ले ॲड सर्टिफिकेशन, (३) गुगल ॲड वर्ड्स सर्टिफिकेशन, (४) हबस्पॉट सर्टिफिकेशन, (५) गुगल ॲनॅलिटिक्स सर्टिफिकेशन, (६) सर्च ॲड सर्टिफिकेशन, (६) व्हिडियो ॲड सर्टिफिकेशन, (७) बिंज ॲड सर्टिफिकेशन,