(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

च्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे भारतीय सैन्यातील तिन्ही दलांच्या प्रमुख पदी आपल्या देशातील महिला विराजमान होऊ शकतात.

एनडीएमधील संपूर्ण प्रशिक्षणाची संरचना ही पुरुष उमेदवारांच्या अनुषंगाने करण्यात आल्याने, या उमेदवारांच्या सुविधांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे महिला उमेदवारांसाठी पुरेशा सुविधांची निर्मिती करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, ही बाब एनडीए व्यवस्थापनाने स्पष्ट केली आहे. तथापि सध्या उपलब्ध सुविधांमध्ये महिलांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

दरवर्षी दोनदा परीक्षा

एनडीएच्या प्रवेशासाठी दरवर्षी दोनदा परीक्षा घेतली जाते. २०२२ सालातील पहिल्या परीक्षेची अधिसूचना निघाली आहे. (ही परीक्षा ११ एप्रिल २०२२ रोजी झाली. एनडीए दोनची परीक्षा सप्टेबर २०२२ मध्ये होईल.) या परीक्षेव्दारे थलसेनेसाठी २०८ उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये १० महिला उमेदवारांवाचा समावेश आहे. नौदलासाठी ४२ उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये ३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. वायुदलासाठी तीन पध्दतीच्या नियुक्त्या केल्या जातात. यामध्ये उड्डाण सेवेसाठी ९२ उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये २ महिला उमेदवारांचा समावेश आहे. जमिनीवरील तांत्रिक सेवा (ग्राउंड ड्युटी) -एकूण उमेदवार १८, त्यात महिला उमेदवार- २, जमिनीवरील अतांत्रिक सेवा (ग्राउंड ड्युटी) – एकूण उमेदवार १०, त्यात महिला उमेदवार- २. म्हणजेच सर्व दलांच्या मिळून १९ महिला उमेदवारांना या पहिल्या परीक्षेव्दारे संधी मिळेल. प्रत्यक्ष प्रशिक्षण काळात या महिलांनी पुरुष उमेदवारांपेक्षा अधिक गुण प्राप्त केल्यास या बॅचमध्ये (तुकडीत) त्या सर्वोच्च स्थानी राहू शकतात. त्याचा फायदा त्यांना भविष्यात पदोन्नतीसाठी होऊ शकतो. (नॅवॅल ॲकॅडेमित १० +२ कॅडेट एन्ट्री योजेनंतर्गत ३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. सध्या तरी हा प्रवेश पुरुष उमेदवारांपुरताच मर्यादित आहे. मात्र सध्या बदलेली मानसिकता लक्षात घेता, भविष्यात या योजनेमध्येही मुलिंना सामावून घेतले जाऊ शकते.)

कठोर चाचणी आणि चाळणी

एनडीए मध्ये मुलिंना प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असला तरी, त्यांना लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाळणी वैद्यकीय चाळणी यात कोणतीही सुट देण्यात आलेली नाही. त्यांना पुरुष उमेदवारांप्रमाणेच सर्व चाचण्यांची अग्निपरीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. बौध्दिक हुषारी सोबतच एनडीए प्रवेशासाठी शारीरिक क्षमता अत्यंत महत्वाचा घटक ठरतो, ही बाब सर्व महिला उमेदवारांनी मनात पक्की ठसवावी. या परीक्षेव्दारे अधिकारी पदावर थेट नियुक्ती होत असली तरी, कोणत्याही क्षणी युध्दभूमिवर हजर व्हावे लागू शकते. सैन्यात भरती होणारे कोणत्याही स्तरावरचे मनुष्यबळ असो ते सर्वप्रथम शत्रुशी दोन हात करणारे सैनिक असतात. त्याच अनुषंगाने त्यांना कठोर प्रशिक्षण दिले जाते.

अर्हता-

 थलसेनेच्या पदांसाठी कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थींनी अर्ज करु शकते. नौदल आणि वायुदलाच्या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या विद्यार्थीनिने १२वीमध्ये विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. ( यंदा १२ वी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थीनीही एनडीए परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. समजा या परीक्षेव्दारे सर्विस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी त्यांची निवड झाल्यास त्यांना विशिष्ट कालावधीमध्ये १२ वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.) कमिशनच्या मते एखाद्या उमेदवाराकडे उच्च गुणवत्ता असल्याचे दिसून आल्यास अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, त्याच्याकडे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता नसली तरी कमिशन त्याची निवड प्रशिक्षणासाठी करु शकते.

महिला उमेदवारांसाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक क्षमतेच्या मानकांची (फिजिकल स्टँडर्ड) माहिती संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सर्व महिला उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी त्याचा सूक्ष्म अभ्यास करायला हवा. त्यातील कोणत्या बाबी आपल्याकडे आहेत, कोणत्या बाबींची कमतरता आहे, याकडे लक्ष द्यावे. परीक्षेचा अर्ज भरणे ते प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी हा चार महिन्याचा असतो. या चार महिन्यात शारीरिक मानकांपैकी काहींची पूर्तता करता येणे शक्य आहे का? याचीही खातरजमा करुन घेणे उचित ठरेल.

वैद्कीयक मानके आणि वैद्यकीय चाळणीची प्रकिया थलसेनेतील उमेदवारांसाठी ,  www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर, हवाई दलातील उमेदवारांसाठी,

www.careerindianairforce.cdac.in

या संकेतस्थळावर आणि नौदलातील उमेदवारांसाठी  www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमदेवारांची उंची, वजन वयोमानानुसार प्रमाणबध्द असायला हवे.

अशी असते परीक्षा

एनडीए परीक्षेसाठी गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (जनरल ॲबिलिटी टेस्ट) असे दोन पेपर्स घेण्यात येतात. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी अडीच तास. गणिताचा पेपर तिनशे गुणांचा. यामध्ये अलजेब्रा, मॅट्रिसेस ॲण्ड डिटरमिनन्ट्स, ट्रिग्नोमेट्री, ॲनॅलिटिकल जिओमेट्री ऑफ टू ॲण्ड थ्री डायमेंशन, डिफरंनशिअल  कॅलक्युलस, इंटिग्रल कॅलक्युलस ॲण्ड डिफरंशिअल इक्वेशन्स, व्हेक्टर अलजेब्रा, स्टॅटिस्टिक्स ॲण्ड प्रोबॅबिलिटी या विषय घटकांवर प्रश्न विचारले जातात. या घटकांचा अभ्यास ११ वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या क्रमिक पुस्तकातून करता येतो. तथापि काही भाग एनसीईआरटी (नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग) च्या ११वी वी १२ वीच्या पुस्तकांमध्ये राहू शकतो. ही पुस्तके ऑनलाईन पीडीएफ स्वरुपात उपलबध आहेत. ज्या विद्यार्थीनींच्या या घटकांमधील संकल्पना अत्यंत स्पष्ट आहेत, त्यांना हा पेपर कठीण जाणार नाही. ज्या घटकांच्या संकल्पना स्पष्ट नाहीत त्या शिक्षकांकडून समजून घेतल्या पाहिजे. या पेपरसाठी जे घटक आहेत, त्यातला कोणताही उप-घटक सोडता कामा नये. कोणत्याही उप-घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

दुसरा पेपर हा जनरल ॲबिलिटी टेस्टचा. गुण सहाशे. या पेपरमध्ये दोन भाग. भाग एक मध्ये इंग्रजीचा समावेश असतो. या भाषेवरील असलेले कौशल्य तपासणी करण्यासाठी प्रश्न विचारले जातात. एकूण गुण – दोनशे. प्रश्नांमध्ये व्याक्रण आणि त्याचे उपयोग, शब्दसंग्रह, उता-यावरील प्रश्न  अशासारख्या प्रश्नांचा समावेश असेल. पाचवी पासून १२वीर्पंत इंग्रजीचा जो अभ्यास केला,त्याची काटेकोर उजळणी केल्यास या भागाची तयारी होऊ शकते.

दुसरा भाग सामान्य ज्ञानाचा. गुण- चारशे. यामध्ये सहा उपविभाग आहेत.(१)भौतिकशास्त्र, (२)रसायनशास्त्र, (३)सामान्य विज्ञान, (४)इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम, (५)भूगोल, (६)चालू किंवा दैनंदिन घडामोडी.या भागाच्या तयारीसाठी सुध्दा सबंधित विषयाची ११वी १२वी  बोर्डाची किंवा एनसीईआरटीची पुस्तके वाचायला हवित.

संघ लोकसेवा आयोगाने विभागनिहाय विषय घटकांची माहिती दिली असली तरी, त्यांच्याशी मिळते जुळते प्रश्नही विचारले जाऊ शकतात, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकापेक्षा अधिक बरोबर उत्तरे असू शकतात. त्यामुळे त्यातील सर्वात अचुक उत्तराची नोंद करावी लागते. एकापेक्षा अधिक बरोबर उत्तराची नोंद केल्यास ते उत्तर चूक समजले जाते.

ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची आहे. निगेटिव्ह मार्किंग पध्दतीचा अवलंब केला जातो. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी अडीच तास. मुलाखतीसाठी ९०० गुण ठेवण्यात येतात.

संपर्क () थल सेना पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी – आर्मी हेडक्वार्टर्स, एजी ब्रँच, आरटीजी (एनडीए एन्ट्री) , वेस्ट ब्लॉक – ३, विंग-१, आर. के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६, दूरध्वनी – ०११- २६१७५४७३ किंवा joinindianarmy.nic.in, () नौदल /नॅव्हॅल ॲकॅडेमी पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी- नॅव्हॅल हेडक्वार्टर्स, डायरेक्टोरेट ऑफ मॅनपॉवर ॲण्ड रिक्र्युटमेंट, ओ.आय ॲण्ड आर सेक्शन, रुम नंबर – २०४, सी विंग, सेना भवन, नवी दिल्ली – ११००११, दूरध्वनी-२३०१००९७ ,ईमेल – officer-navy@nic.in किंवा joinindiannavy.gov.in, () वायुदलाचा पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी – एअर हेडक्वार्टर्स, डायरोक्टोरेट ऑफ पर्सोनेल (ऑफिसर), पीओ ३ (), रुम नंबर १७, जे,  ब्लॉक, वायूभवनच्या विरुध्द दिशेला, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली – ११०१०६, दूरध्वनी -०११-२३०१०२३१, किंवा संकेतस्थळ- www.careerindianairforce.cdac.in

संघ लोकसेवा आयोगाचे दूरध्वनी क्रमांक- 011-23385271/ आहे 011- 23381125/011-23098543

सुरेश वांदिले

००००