तेरे नयना दगाबाज रे…
आजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं. मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवाऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं. लेकराचं पहिलंरडणं ,पहिली शीसुध्दा त्यांना स्मार्टच हवी असते. आजच्या जगाला स्मार्टनेसच्या याअशा-फोबियानं झपाटून टाकलंय. म्हणजेच असं की ओबामा यांनी विजयानंतर जेअश्रू ढाळले ते कसे स्मार्ट होते, याचं चर्वित- चर्वण बरचं दिवस चाललंहोतं.आजचा मानव जेव्हा डायनोसॉरचे सिनेमे काढतो तेव्हा ते डायनोसार ही स्मार्टचदाखवतो. काही वर्षांपूर्वी एका डायन म्हणजे भूतनीवरचा सिनेमा आला .त्यातल्या सर्वडायना या स्मार्टच निघाल्या.
अशा या स्मार्ट जगात दरक्षणी काहीतरी स्मार्ट स्मार्ट घडतच असतं.यातूनच एकास्मार्ट ट्रेनिंग कोर्सचा जन्म, स्मार्टांचं व्हॅटिकन किंवा तिरुपती किंवा पंढरी समजल्याजाणाऱ्या अमेरिकत झालाय.हा स्मार्ट ट्रेनिंग कम गायडन्स कम कोर्स हा, हाऊ टू मेकलफडं टू सेव्ह युवर मॅरेज,अशा स्वरुपाचा आहे.
अभ्यासक्रमाच्या टेक्स्टबूकची प्रस्तावना अशी सांगते की, लग्नाच्या गमती-जमतीची, मोगऱ्या-गुलाब-चमेलीची वर्ष सरली की आधी झेंडूची मग धोतऱ्याची आणिनंतर कॅक्टसची वर्षं सुरु होतात. काट्यांचा काटोरा होतो. उठता बसता काटे, यहाँरुते वहाँ रुते! जाए तो जाए कहाँ.अशी ही स्थिती. ही वर्षं आपल्या आयुष्यातूनकायमची उडन-छू व्हावीत असच सौभ्यागवती पत्नीजी आणि श्री पतीदेव यांना वाटतराहतं.पण पाऊल मागं घेण्याची हिम्मत आतापावेतोच्या प्रवासात बऱ्याच अंशी फुस्सझाली असते. पुढचं पाऊल टाकण्यासाठी लागणारं धैर्यही गळून पडलं असतं. संसारातली फ्रुटी बेचव होते. पेप्सी खारट होते. थम्स अप,डाऊन होतं.मिरांड्यालाकार्ल्याची चव येते. अशावेळी रडत-कुथत बसण्यापेक्षा गुपचूप मसाला मारके दूधप्यायला मिळालं तर ..असं श्री आणि सौ या दोघांनाही वाटू लागतं.
अशा, नयना दगाबाज करु इच्छिणाऱ्या श्री आणि सौंसाठी सातासमुद्रापलिकडेस्मार्ट ट्रेनिंग सुरु झालय. थोडक्यात काय,श्रीला आणि सौला लफडयाची दिशापूर्वेला की दक्षिणेला कशी मिळू शकते, याचे 111 हमखास स्मार्ट उपाय, याप्रशिक्षणात सांगितले जातात.
हे प्रशिक्षण घेतलेल्या श्री आणि सौंना लपून छपून लफडं करण्याचं, तेदडवण्याचं आणि मस्त मजेत जगण्याचं आणि एकमेकांना फसवताना ते तसं वाटूद्यायचं नाही, याचं सूक्ष्म प्रशिक्षण सहजतेनं दिलं जातं. हे प्रशिक्षण ऑनलाइनम्हणजे सूपर स्मार्टली दिलं जातं.
हा अभ्यासक्रम सुरु करणाऱ्या गुरुजींचा असा आत्मविश्वास आहे की, हेशास्त्रशुध्द लफड्याचं प्रशिक्षण घेतलेल्या श्री आणि सौ यांना मजा मजा करण्याचाकिंगफिशर आनंद मिळून त्यांच्या जीवनात पुन्हा गुलाबाचे, चमेलिचे आणि मोगऱ्याचेदिवस धुंद होऊ शकतात. हे असं धुंद होणं एका लग्नाची दुसरी(च)किंवा भलतीचगोष्ट होण्यापासून वाचवू शकतं. एका लग्नाची गोष्ट एकच राहू शकते. आणि साठाउत्तराची कहाणी सुफळ होऊ शकते. याचा अर्थ असा की गडे, तू तुझं आइसफ्रुटमजेत चाखत राहा नि बाबा तू तुझी आइसक्रम झोकात टेस्ट करत राहा.आणि म्हणतराहा,
मैने भी इक बनाई है दुनिया,यहा से दूर/
ऐसा भी इक जहान है,जिसका खुदा हूं मै//..
या स्मार्ट ट्रेनिंग कोर्सने रटाळ आणि सुस्त आणि शुष्क आयुष्याला प्रशस्तहिरवळ दाखवणारा मार्ग दाखवलाय.(असं स्मार्ट मत नोंदवून, तेरे नैना दगाबाज रेअसं मस्त गुणगुणूया की..)