दर्जेदार व्हीएनआयटी
गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत राहणाऱ्या व शासनातवरिष्ट पदावर असेल्या अधिकाऱ्याच्या मुलगा यंदा १२ वीत आहे. या मुलाला अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी त्याने जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेश–मेन) ही परीक्षा दिली. त्यात त्याला चांगले गुण मिळाले. तथापि त्याला आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हे गुण काही पुरेसे नाहीत. तेव्हा त्याने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पर्यायाचा विचार करावा, त्यातही नागपूर येथे असणाऱ्या विश्वेश्वर्यानॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेशासाठी अर्ज करावा, असे मी सुचवले.
या एनआयटीत महाराष्ट्रातील विद्यार्थांसाठी एकूण जागांच्या ५० टक्के जागा राखीव असतात, असं जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा, तो आश्चर्यचकित झाला. कारणत्याला ही बाब ठाऊक नव्हती. तेव्हा लक्षात आलं की अद्यापही आपल्याकडे बरेचपालक एनआयटीच्या प्रवेशप्रकियेबाबत अनभिज्ञ असतात.
जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेश) – मेन परीक्षेत गुणांवर आधारित सर्व एनआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळाले असतील आणि जेईई ॲडव्हास्न्ड परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र ठरु शकत नसेल तर त्याने एनआयटीकडे जाण्याचा मार्ग धरायला हवा.
नागपूर एनएआयटी
नागपूर येथील एनआयटीची स्थापना १९६० साली झाली. देशातील महत्वाच्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये या एनआयटीचा समावेश होतो. अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च दर्जा या संस्थेने कायम राखला आहे. ही संस्था नागपुरातील अंबाझरी तलावाच्या जवळ निसर्गरम्य अशा अडिचशेएकराहून अधिक परिसरात वसली आहे. अत्याआधुनिक प्रयोगशाळा, उत्तमग्रंथालय, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, व्यक्तीमत्वविकासाला चालना देणाऱ्या अनेक बाबी, प्लेसमेंटसेल अशी काही या संस्थची वैशिष्ट्ये सांगता येतील.
संस्थेमध्ये बी.टेक, एम.टेक, पीएचडी आणि एम.एस्सीअभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. बी.टेकसाठी साधारणत: ९०० च्याआसपास जागा असून त्यापैकी निम्म्याजागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. अर्थातच त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉन क्रिमी लेअर इतर मागास वर्ग , दिव्यांग या संवर्गासाठी जागा राखीव असतात.
बी.टेकअभ्यासक्रम
संस्थेमध्ये (१) केमिकल, (२) सिव्हिल, (३) कॉम्प्युटर सायन्स, (४) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, (५) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, (६) मेकॅनिकल, (७) मेटॅलर्जिकलॲण्ड मटेरिअल्स, (८) मायनिंगया अभियांत्रिकी शाखांमध्येआणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चरला प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रकिया जॉईंट सिट ॲलोकेशन ॲथॉरिटी/सेंट्रलसिट ॲलोकेशन बोर्डामार्फत घेतली जाते.
पदवी अभ्यासक्रम केलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे चांगल्या करिअर संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे या संस्थेतील मेटॅलर्जीकिंवा मायनिंग या शाखांमध्ये प्रवेश मिळत असल्यास तो नाकरण्याआधी सर्वंकष विचार करायला हवा. त्यासाठी येथील प्राध्यापकांशीही संपर्क साधायला हरकत नाही.
वेगळे स्थान व दर्जा
व्हीएनआयटीचे शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चेवेगळे स्थान व दर्जाअसल्याने या संस्थेचे कोणतेही अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदवणारे व त्यांनातंत्रकुशल करणारे आहेत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरही या एनआयटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण ते उत्तम करिअर अशा संधी मिळताना किंवा मिळवताना व्हीएनआयटीब्रँड नक्कीच सकारात्मक ठरतो. गेल्या काही वर्षात संस्थेमध्ये प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲनॅलिटिक्स, आयटीसर्व्हिस, मॅनेजमेंट कंसल्टिंग, कोअर मॅन्युफॅक्चुरिंग, ऑटोमोबाइल, आयटीडिजिटल बिझिनेस, कंसलटंट, एज्युकेशनल सर्व्हिसेस, फार्मास्युटिकल्स, पब्लिकसेक्टर अंडरटेकिंग्ज (ऑईल/ गॅस/ एरोस्पेस), मॅन्युफॅक्चुरिंग,आयटी प्रॉडक्टस, सर्व्हिस, कंसल्टींग फर्म, फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स, बँक ॲण्ड फायनांशिअल सर्व्हिसेसआणि विविध अभियांत्रिकी शाखांमधीलच कंपन्यांचा समावेश आहे.
पदव्युत्तरपदवी
व्हीएनआयटीमध्ये २० शाखांमध्ये एम.टेक करण्याच सुविधा आहे. या शाखा पुढीलप्रमाणे आहेत. (१) एन्व्हिरॉन्मेंटल, (२) वाटर रिसोर्स,(३) कंस्ट्रक्शनटेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट, (४) ट्रान्सपोर्टेशन, (५) जिओटेक्निकल, (६) व्हीएलएसआयडिझाइन, (७) कम्युनिकेशन सिस्टिम, (८) कॉम्प्युटर सायन्स, (९) इंडस्ट्रियलइंजिनीअरिंग, (१०) हिट पॉवर, (११) सीएडी–सीएमए, (१२) इंटिग्रेटेडपॉवर सिस्टिम, (१३) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड ड्रायव्हर्स, (१४) मटेरिअल, (१५) प्रोसेसमेटॅलर्जी, (१६)स्ट्रक्चरलडॉयनामिक्स ॲण्ड अर्थक्वेक,(१७) स्ट्रक्चरल, (१८) अर्बनप्लॅनिंग, (१९) एक्सकॅव्हेशन, (२०) केमिकल इंजिनीअरिंग.
या अभ्यासक्रमांना गेट (ग्रॅज्युएट ॲडमिशन टेस्ट फॉर इंजिनीअर्स) या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. ही प्रवेश प्रकिया सेंट्रल कौन्सिलिंग फॉरएम.टेकया संस्थेमार्फत राबवली जाते.
एम.एस्सी
व्हीएनआयटीने विज्ञान शाखेतील केमिस्ट्री (रसायनशास्त्र), गणित (मॅथेमॅटिक्स), भौतिकशास्त्र (फिजिक्स) याविषयांमध्ये एम.एस्सीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विज्ञान शाखेतील या तीन विषयांचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यास या संस्थेत केल्यास विद्यार्थ्याला उत्तम करिअरघडविण्यासाठी निश्चितपणेवेगळे मूल्य प्राप्त होते. येथील अभ्यासक्रम हा अत्याधुनिक प्रयोगशाळा – सुविधा – उपकरणे यांच्या सोबतिने करता येत असल्याने विद्यार्थी पुढील काळात संशोधन आणि अध्यापन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी परिपूर्ण झालेला असतो. या अभ्यासक्रमासाच्या निवडीसाठी जॉईंट ॲडमिशन फॉर मास्टर्स या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. या विद्यार्थ्यांनाही प्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. तिनही शाखांच्या विभागांनी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीयनामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी सहकार्य केले असल्याने, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना त्याचा लाभ होतो.
अर्हता– एम.एस्सी (भौतिकशास्त्र)- भौतिकशास्त्रया विषयासह पदवी आणि किमान दोन वर्षे गणिताचा अभ्यास केलेला असावा, किंवाबी.एस्सी ऑनर्स इन फिजिक्स. (२) एम.एस्सी(रसायनशास्त्र) – बी.एस्सी ऑनर्स इन केमिस्ट्रिी किंवा बी.एस्सी केमिस्ट्री व विज्ञानशाखेचेइतर दोन विषय, १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा.(३) एम.एस्सी(गणित)– बी.एस्सी ऑनर्स इन मॅथेमॅटिक्स किंवा बी.एस्सी मॅथेमॅटिक्स व विज्ञानशाखेचेइतर दोन विषय.
विद्यार्थ्यांच्या साहाय्यासाठी
एनआयटी नागपूर मध्ये बी.टेकच्या पहिल्या वर्गाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रकराचे साहाय्य करण्यासाठी वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा एक घटक तयार करुन, मेटाँरशीप कार्यक्रम राबवला जातो. विद्यार्थ्याला आत्मविश्वास प्रदान करणे, त्याच्या कमकुवत बाजू समजून घेऊ,त्या त्रुटी दूर करणे अशा सारख्या बाबी यामध्ये समाविष्ठ आहेत.
संपर्क- व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी मार्ग रोड, नागपूर- ४०००१०,दूरध्वनी- ०७१२-२८०१३७०,संकेतस्थळ-vnit.ac.in,dr_acd@vnit.ac.in
एनआयटीमधील प्रवेश
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (ॲडव्हान्स्ड) मध्ये चांगले गुण मिळणे आवश्यक ठरते. समजा काही कारणास्तव असे गुण मिळाले नाही तर विद्यार्थ्यांनी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील प्रवेश पर्यायाचा विचार करायला हवा.
आपल्या देशात नागपूरसह ३१ एनआयटी आहे. त्या सर्वांना सेंटर ऑफ एक्सलंसचा दर्जा भारत सरकारने दिला आहे. हा दर्जा आयआयटीच्या समकक्ष समजला जातो. सर्व एनआयटी या स्वायत्त असल्याने औद्योगिक गरजा लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात कालानुरुप बदल करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचे उकृष्ट शिक्षण देशातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मिळावे, त्यांचे तांत्रिक कौशल्य हे देशाच्या जडणघडणीसाठी उपयोगास यावे यासाठी या संस्थांची स्थापना टप्प्याटप्प्याने देशभर करण्यात आली.
बहुतेक सर्वच एनआयटीमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. अत्याधुनिक साधनसामग्री आणि साहित्यासह प्रयोगशाळा, कर्मशाळा (वर्कशॉप) उभारण्यात आले आहेत. उच्चप्रशिक्षित प्राध्यापक शिकवतात. वसतिगृहाची सुविधा आहेत. क्रीडांगणे आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तो चतुरस्त्र व्हावा यासाठी साहाय्य केले जाते. उत्तम ग्रंथालये आहे. परिपूर्ण तंत्रज्ञ निर्माण व्हावा असेच येथील वातारवण असते. प्लेसमेंटसाठी साहाय् केले जाते. विविध प्रांतातील मुले–मुली एकत्र शिकत असल्याने, स्पर्धात्मकता वाढीस साहाय्य होते तसेच आपल्या क्षमतांचा परीघ वाढवण्याची प्रेरणाही मिळते.
बहुतेक एनआयटींनी देशविदेशातील वेगवेगळया शैक्षणिक संस्था, आणि संशोधन करणाऱ्या संस्था यांच्याशी सहकार्य केले असते. त्याचाही लाभ विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जावाढीसाठी होत असतो. देशातील टॉपच्या एनआयटीमध्ये (१) एनआयटी अलाहाबाद, (२) एनआयटी–सुरतकल, (३) एनआयटी–तिरुचिरापल्ली, (४) एनआयटी जालंदर, (५) एनआयटी नागपूर, (६) एनआयटी–वारंगल ,(७) एनआयटी–तिरुचिरापल्ली, (८) एनआयटी– भोपाळ, (९) एनआयटी–कालिकत, (१०) एनआयटी–दिल्ली, (११) एनआयटी–दुर्गापूर,(१२) एनआयटी–रायपूर, (१३) एनआयटी–पाटणा, (१४) एनआयटी– जमशेदपूर (१५) एनआयटी–सिलचर (१६) एनआयटी–सुरत,असा ढोबळमानाने समावेश करता येतो
000
