(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवी क्रांती- इलेक्ट्रिकल व्हेइकल

सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चुरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स, यांच्या अहवालानुसार २०२४ पर्यंत भारतात या क्षेत्रासाठी ३० मिलियन रोजगार संधी उपलब्ध होतील. ही बाब लक्षात घेऊन भारतातील काही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयाशी निगडित वेगवेगळया कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

२०२५ पर्यंत या क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळाची कौशल्य निर्मिती आणि कौशल्याचे उन्नतीकरण करण्यासाठी भारत सरकारने, डीवाय गुरु या संस्थेसोबत सहकार्याचा करार केला आहे. हा कर्मशाळा (वर्कशॉप) एकात्मिक प्रशिक्षण (वर्कशॉप इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम) कार्यक्रम आहे. ऑटोमोटिव्ह, ऑटो-कंपोनंट, डिझाइन आणि निर्मिती घटकात कार्यरत असणाऱ्या किवा कार्यरत होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. हे अभ्यासक्रम या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते. तीन महिन्यापर्यंतची इंटर्नशीप मिळवून दिली जाते. या कालावधीत विद्यावेतन दिले जाते. केंद्रिय तंत्रशिक्षण मंडळाने या अभ्यासक्रमांना मान्यता प्रदान केली आहे. हे अभ्यासक्रम केल्यावर (१)बॅटरी मॉडेलिंग, (२)चार्जिंग इन्स्पेक्टर, (२)मोटार ऑप्टिमायझेशन, (३)प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ॲण्ड डिझाइन इंजिनीअरिंग अशा सारख्या संधी मिळू शकतात.  यातील काही अभ्यासक्रमांचा  कालावधी १२ महिने आहे. हे अभ्यासक्रम ऑनलाइन असून,काही प्रत्यक्ष वर्गही होतील. २५ पेक्षा प्रकल्पावर काम करायला मिळेल. प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

इतर प्रशिक्षण कार्यक्रम (१) इलेक्ट्रिकल व्हेइकल ॲडव्हान्स्ड सटिफिकेशन, (२) इलेक्ट्रिकल व्हेइकल बिझिनेस मॅनेजमेंट, (३) इलेक्ट्रिकल व्हेइकल प्रॉडक्ट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट, (४) सर्टिफाइड इलेक्ट्रिकल व्हेइकल टेक्निशिअन ट्रेनिंग प्रोग्रॅम, (५) इलेक्ट्रिकल व्हेइकल बॅटरी पॅक मॉडेलिंग कोर्स, (६) ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रिकल व्हेइकल पॉवरट्रेन इंजिनीअरिंग, (७) इलेक्ट्रिकल व्हेइकल कॉम्प्युटर एडेड डिझाइन ॲण्ड ड्रॅफ्टिंग, (८) डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल व्हेइकल युजिंग मॅटलॅब, (९) ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग फॉर इलेक्ट्रिकल व्हेइकल ॲप्लिकेशन, (१०) फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल व्हेइकल सर्टिफिकेशन कोर्स, (११) फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग फॉर ई-मोबिलिटी. (१२) ई बाइक डिझाइन वुईथ सॉलिडवर्क्स (१३) हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेइकल कोर्स.

संपर्क – (१) डीवाय गुरु सीओई, अंजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, चारोळी बुद्रुक व्हाया लोणावळा, जिल्हा पुणे-४१२१०५, ईमेल- support@diyguru.org, (२) संकेतस्थळ- https://diyguru.org/electric-vehicle/

 

डिप्लोमा इन ई-मोबिलीटी

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेने, एक वर्षं कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ई-मोबिलीटी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- मेकॅनिकल, प्रॉडक्शन, मेटॅलर्जी ॲण्ड मटेरिअल सायंस, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल , टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन या शाखातील विद्यार्थी पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाळणी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेतील गुंणावर आधारित संवर्गनिहाय प्रवेश निश्चित केला जाईल.

या अभ्यासक्रमात, इलेक्ट्रिकल व्हेइकल कार्यप्रणाली  डिझाइन, एनर्जी स्टोअरजेस सिस्टिम्स, सूपरचार्जेस ॲण्ड फ्युएल सेल्स, पॉवरट्रेनर्स ॲण्ड कंट्रोल्स इन इलेक्ट्रिक व्हेइकल, आंतरराष्ट्रीय मानके, इलेक्ट्रिक वाहनांबाबत शासनाची नियमावली, अशा सारख्या बाबींचा या समावेश आहे.

संपर्क- डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनीअरिंग, सीओइपी(कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग)टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, वेलिस्ली रोड, शिवाजी नगर, पुणे-४११००५, दूरध्वनी – ०२०-२५५०७९१७, संकेतस्थळ- ईमेल-mrn.mech@coeptech.ac.in संकेतस्थळ-https://www.coep.org.in/content/postgraduatediplomaprogram