(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सध्याच्या काळात कार्यशैली, काम करण्याच्या पध्दती, कामाच्या जागा, कामातील बदल आणि कामाची उपलब्धता हे घटक महत्वाचे ठरत आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी क्षमता आणि अनूकुलता  हे दोन या बाबिंना अनन्यसाधारण महत्व आले आहे. नव्या कार्यशैलीचा अंगिकार केलेल्या उमेदवारांनाच यापुढे अशा संधी मिळू शकतील आणि हे रोजगार टिकू शकतील. जुन्या कौशल्यांपेक्षा नवी तंत्रकौशल्ये महत्वाची ठरतील. ती हस्तगत करणे आणि त्यात पारंगतता मिळवणे ही करोनोत्तर काळाची गरज असेल. शिवाय त्यात गतिही दाखवावी लागेल.

नव्या संधी

(१) संशोधन--करोना काळात वैद्यकीय संशोधनास मोठी चालना मिळाली. जगातील प्रमुख देशांनी विषाणू नियंत्रण लसीच्या शोधावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसा ओतला. वैद्यकीय तज्ज्ञांसोबतच डॉक्टर, सामाजिक आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ सुध्दा करोना प्रादुर्भावाच्या विविधांगी परिणामांच्या संशोधनात गढले. धोरणकर्त्यांसाठी  निर्णय घेण्यासाठी आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी हे संशोधन दिशा दाखवणारे ठरले.यापुढील काळात सुध्दा संशोधनाशी निगडित करिअर संधी अधिकाधिक निर्माण होतील.

(२) नव्या डिजिटल पध्दतीच्या शैक्षणिक व्यवस्थेचा उदय झाला असूल प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन घरच्या डिजिटल वर्गखोलित (क्लासरुम) होऊ लागले आहेते. या डिजिटल वर्गखोलिंनी शैक्षणिक व्यवस्थेला नवा आयाम दिला. या डिजिटल अध्यापनासाठी, नव्या कौशल्यांनी युक्त अशा मनुष्यबळाची गरज, मोठ्या प्रमाणावर लागेल.

ऑनलाइन अध्यापन/ शिक्षण/ प्रशिक्षण हे कधी नव्हे ते या काळात प्रत्यक्ष वास्तवात आले. शैक्षणिक संस्थांनी डिजिटल तंत्रज्ञानास सुलभतने स्वीकारले. आता तर त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान न्यू-नॉर्मल बनू पाहते आहे. प्रांरभी विद्यार्थी आणि पालकांना हे तंत्रज्ञान स्वीकारणे कठीण गेले, मात्र आता या दोन्ही घटकांची स्वीकार्हायता लक्षणीयरीत्या वाढलेली दिसते. झूम, गुगल मीट सारख्या ॲपचा अध्यापनासाठी प्रभावीरीत्या वापर केला जात आहे.

यापुढील काळात पारंपरिक शिक्षण पध्दती कालबाह्य ठरण्याची दाट शक्यता आहे. नर्सरी पासून विद्यापीठीय (पदवी-पदव्युत्तर- पीएचडी) शिक्षणासाठी यापुढे डिजिटल तंत्राचाच आधार घेतला जाईल.

() ऑनलाइन ट्यूटर- डिजिटल प्लॅटफॉर्मवरील अध्यापन आणि अध्ययनाच्या वाढत्या प्रसारामुळे या पध्दतीच्या करिअरला चालना मिळाली. एज्युकेशन टेक्नॉलॉजी (शैक्षणिक तंत्रज्ञान) च्या कंपन्यांची झपाट्याने वाढ होत असल्याने याक्षेत्रात पारंगत असणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.

या क्षेत्रासाठी लागणारे कौशल्य- अध्यापन विषयातील पदवी किंवा ज्या विषयात अध्यापन करावयाचे असेल त्या विषयातील पदव्युत्तर पदवी, विद्यार्थ्यांना नियंत्रित करण्याचे कौशल्य, उत्तम लेखन आणि संवाद कौशल्य.

(४) डिजिटल पेमेंट- वेगवेगळया सेवांची देयके भरणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू मागवणे, अन्न पदार्थ बोलावणे या सर्व बाबी डिजिटली करता येणे शक्य आहे. शासनाने या व्यवहारास प्राधान्य दिले आहे. व्यावसायिक, लहान-मोठे व्यापारी यांनीही डिजिटल व्यवहार करावे यासाठी शासन आग्रही आहे. डिजिटल व्यवहारासाठी, शासनाकडून यंत्रणा उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यामुळे पुढील काळात मोबाईल पेमेंट तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(५) स्पेशल (खास) रसायने- करोना काळाने सतत स्वच्छतेच्या क्रियेला गंभिरपणे अंगिकारण्यास बाध्य केले. त्यामुळे हात आणि शरीराची स्वच्छता, घर/ लिफ्ट/ कार्यालये/ उपकरणे यांच्या स्वच्छतेसाठी लागणारे सॅनिटायझर/ जंतुनाशक/ इतर रसायनांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे अन्नपदार्थ निर्मितीकरणाऱ्या कंपन्यांनी विविध श्रेणी आणि उपयुक्ततेच्या अशा स्पेशल रसायनांची निर्मिती केली. औषधांची मागणी वाढल्याने या क्षेत्रासाठी रसायनांची मागणी वाढली.

) वित्तीय नियंत्रक- अनेक कंपन्या सध्या ऑनलाइन पध्दतीने मुक्तपणे वित्तीय सल्लागारांच्या नियुक्तीला प्राधान्य देत आहेत. कायमस्वरुपी वित्तीय सल्लागारास मोठे वेतन द्यावे लागते. इतके वेतन मुक्त वित्तीय सल्लागारास देण्याची गरज नाही. हे ऑनलाइन वित्तीय सल्लागार कंपन्यांना त्यांच्या वित्तीय नियोजनाबाबात सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. कंपन्यांची वित्तीय स्थिती सुदृढ व्हावी यासाठी व्युहनीती आखतात. या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य-जीएसटीचे ज्ञान, वित्तीय नियोजन, वित्तीय विश्लेषण, लेखा परीक्षण, ताळेबंदाचे लेखांकन,

 () शेअर मार्केट स्पेशॅलिस्ट- हा व्यवसाय ऑनलाइन पध्दतीने करुन उत्तम उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. अनेक शेअर ब्रोकर कंपन्या, अशा ऑनलाइन तज्ज्ञांना त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी रोजगार संधी देत असतात. अशा उमेदवारांना हे काम पूर्ण वेळ अथवा अर्धवेळ ऑनलाइन पध्दतीने करता येते. या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य-उत्तम संवाद साधण्याची कला, विश्लेषण करण्याचे कौशल्य, शेअर ब्रोकिंगचे ज्ञान, उत्तम गणितीय कौशल्य.

 

सुरेश वांदिले

००००