(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअरची संधी मिळणं सहल सुलभ जातं. देश विदेशातील महत्वाच्या कंपन्या,कॉर्पोरेट, डिझाइन क्षेत्रातील उद्योजक प्लेसमेंटसाठी येतात.दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट होतं. उमेदवारांची गुणवत्ता आणि शैक्षणिक कामगिरी बघून वार्षिक पॅकेज दिलं जातं.

या संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  डिझाइन ॲप्टिट्यूट टेस्ट(डॅट-प्राथमिक)या नावाने ओळखली जाणारी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची, डिझाइन ॲप्टिट्यूट टेस्ट(डॅट-मेन)परीक्षेसाठी केली जाते. डॅट- प्राथमिक या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर ही केंद्रे आहेत. डॅट मेन परीक्षेमध्ये स्टुडिओ सेटमध्ये सुध्दा एक चाचणी द्यावी लागू शकते. डॅट प्राथमिक आणि डॅट मुख्य या दोन्ही चाचणी परीक्षेतील सर्व घटकांची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचीच गुणवत्ता यादीत निवड केली जाते.डॅट-प्राथमिक परीक्षेतील पेपरसाठी पुर्नतपासणी(रिचेकिंग)ची सुवधा आहे. प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

इतर कॅम्पसेस

 (अ)हरयाणा कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत. या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना  दोन सत्रांचा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स आणि सहा सत्राचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणे बंधनकारक आहे.

(ब)मध्य प्रदेश कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत.

(क)आसाम कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत. या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना  एक वर्षाच्या पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स आणि सहा सत्राचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणे बंधनकारक आहे.

(ड)आंध्रपदेश कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत.या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स करणे बंधनकारक आहे.(अपूर्ण)

 

हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि विषयाचा पर्याय लक्षात घेऊन शाखा प्रदान केली जाते.

या सर्व ठिकाणी १० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग,२७ टक्के जागा ओबीसी-एनसीएल (इतर मागासवर्ग-नॉन क्रिमी लेअर)संवर्ग,१५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव आहेत. सर्व संवंर्ग मिळून एकूण ५ टक्के जागा दिव्यांगासाठी राखीत आहे. गुणवत्ता यादित पहिल्या पाच टक्क्यांमध्ये येणाऱ्या दिव्यांगाचा विचार केला जातो. या उमेदवारांना दिव्यांग प्रमाण पत्रसादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इतर कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

पत्ता:एनआयडी,पालडी,अहमदाबाद:३८०००७,गुजराथ, दूरध्वनी:०७९-२६६२३६९२/ २६६२३४६२, फॅक्स: २६६२११६७,संकेतस्थळ-  www.nid.edu

सुरेश वांदिले