(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत कार्यरत आहे. पर्यटन क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण-संशोधन-सल्लासेवा देण्यासाठी ही संस्था प्रसिध्द आहे .या संस्थेचे ग्वालियर,दिल्ली,भुवनेश्वर,नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत. या संस्थेनं पर्यटन उद्योगाला उपयुक्त ठरु शकतील असे विविध अभ्यासक्रम सुरु केले आहेत.   (1) एमबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट /अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/ कालावधी- दोन वर्षे. (2) बीबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल /अर्हता- कोणत्याही विषयातील 12वी/ कालावधी- तीन वर्षे. या दोन्ही अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.

   कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण

या संस्थेने पुढील कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण सुरु केले आहेत- वाटर स्पोर्ट्स ट्रेनिंग, लाइफ सेव्हिंग टेक्निक, ट्रॅव्हल फोटोग्रॅफी ट्रेनिंग, ट्रेनिंग ऑफ मेडिकल टुरिझम प्रोफेशनल,हेरिटेज वाक/सिटी वाक डिझायनिंग,डेस्टिनेशन मॅनेजमेंट,स्पेशॅलिस्ट गाइड ट्रेनिंग प्रोग्रॅम,स्टेट लेव्हल गाइड ट्रेनिंग प्रोग्रॅम,सिटी/डेस्टिनेशनल लेव्हल ट्रेनिंग प्रोग्रॅम टुरिझम आंत्र्यप्रिन्युरशिप.

   पत्ता- अरमन (ॲडमिशन्स) इंडियन इंस्टिटयूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी ग्वालिएर, 474011 दूरध्वनी-0751-2345823/2437306,फॅक्स-2344054 मेल-iitm@sancharnet.in- संकेतस्थळ- http://www.iittm.ac.in/

0000

पर्यटनातील नव्या संधी

(१) फूड कोर्ट्स – पर्यटनामध्ये खानपानाची मौज घेण्याची एक आंतरिक उर्मी बहुतेक सर्वांनाच असते. नवे पदार्थ,नव्या चवी या आकर्षणातून पर्यटक खाद्यपर्थांकडे वळवतात. उत्तम दर्शन आणि मस्त भोजन झाल्याशिवाय पर्यटन सुफळ – सफल होत नाही. त्यामुळे खान-पानात रस असलेल्या तरुण उद्योजकांना फूड कोर्ट्स ,छोटी रेस्टॉरेंट यामध्ये चांगला व्यवसाय मिळू शकतो. स्थानिक पदार्थांना चांगला उठाव मिळू शकतो. थोड्या अभ्यासानं वेगवेगळया पयर्टन स्थळांच्या आसपास कोणते स्थानिक पदार्थ प्रचलित आहेत, हे कळू शकतं. त्यांचं स्पेशलाईज्ड आऊटलेट्स सुरु करता येऊ शकतं.

   (२) पर्यटन छायाचित्रण- पर्यटन विषयक लिखाणाला सर्व महत्वाच्या नियतकालिकांमधून महत्वाचं स्थान दिलं जातं. त्यांना उत्तमोत्तम छायाचित्रांची गरज भासते. साहसी पर्यटन, अन्नपदार्थे, तीर्थक्षेत्रे, वन्यजीव, पक्षी, गड-किल्ले यांची छायाचित्रे नियतकालिकांना लागतात.मनापासून यात रस घेतला करियरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.

   (३) पर्यटन पत्रकारिता -.पर्यटन विषयक लेखांशिवाय वृत्तपत्रांच्या पुरवण्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. या नियतकालिकांना नावीन्यपूर्ण पध्दतीने लिहिलेलं लिखाण सातत्यानं हवं असतं. पर्यटक कंपन्या अशा लेखकांकडून त्यांच्या ग्राहकांसाठी पुस्तिका पुस्तक लिहून घेतात. त्यासाठी चांगले मानधन देतात. पर्यटन विषयक ब्लाग्ज नेटिझनप्रिय झाले आहेत. काही ब्लॉग्जला पर्यटन कंपन्या प्रायोजित करतात. या ब्लॉग्जना पर्यटन कंपन्यांच्या जाहिराती मिळतात.पर्यटन विषयक विविध कार्यक्रम टीव्हीवर सुरु झाले आहेत. हा ट्रेंड असाच वाढत राहणारा आहे. त्यामुळे पर्यटन पत्रकारिकतेतील तज्ञांना नव्या नव्या संधी मिळू शकतात

   (४) सांस्कृतिक केंद्रे- अनेक पर्यटनक्षेत्रांमध्ये सांस्कृतिक केंद्र उघडण्यात येतात. यामध्ये स्थानिक कलावंत,नकलाकार,जादुगार आदिंना संधी मिळते. कलेतून उत्पन्नाच्या साधन निर्मितीसाठी ही केंद्रे उपयुक्त ठरतात.

   (५) पक्षी निरीक्षक गाईड – गेल्या काही वर्षात पक्षी निरीक्षण पर्यटन हे नवं क्षेत्र उदयास आलं आहे. अनेकांना पक्षी निरीक्षणासाठी उत्सुकता असते. ते या पर्यटनात उत्साहानं सामील होतात. पक्षी निरीक्षणाच्या विविध कालावधीच्या टूर्स आयोजित केल्या जातात. पक्ष्यांबाबत सर्वसाधारण माहिती असणाऱ्यास पक्षी निरीक्षक गाईड्स म्हणून संधी मिळू शकते.

   (६) हस्तकला- हस्तकलेच्या माध्यमातून निर्मित वस्तुंची विक्री हा अनेक पर्यटन स्थळांचा वैशिष्ट्यूपूर्ण भाग ठरतो. बहुतेक पर्यटक हा वस्तू खरेदी करतात. हस्तकला शिकून घेऊन तशा वस्तुंचा पुरवठा करणे किंवा स्वत: अशा केंद्रांना चालवणे या बाबी करियरच्या संधी उपलब्ध करुन देऊ शकतात.

   (७) साहसी पर्यटन- या मध्ये जलपर्यटन,हॉट एअर बलूनिंग,स्कॉयडाव्हिंग ,स्कुबा डायव्हिंग यासारख्या बाबींचा समावेश होतो. साहसी पर्यटनाकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. गोवास्थित राष्ट्रीय जलक्रीडा संस्था नियमितपणे जलक्रीडेसंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करत असते. अशा प्रशिक्षकांना करियरची चांगली संधी मिळू शकते.

सुरेश वांदिले