पॅरामेडिकलमधील संधी
पॅरामेडिकल कांउसिल ऑफ इंडिया या संस्थेने करोनोत्तर काळात पॅरामेडिकल मनुष्यबळासाठी आणखी मोठ्या संधी निर्माण होतील असे भाकित वर्तवले आहे .डॉक्टरांच्या यशात किंवा त्यांच्या अचुक अथवा बहुतांश निर्दोष निदानासाठी या तज्ज्ञांनी कडून आलेले अहवाल आणि निष्कर्ष उपयुक्त ठरत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रानुसार प्रत्येक १००० व्यक्तीमागे एका डॉक्टरची गरज असते. मात्र भारतात हे प्रमाण सध्या १०१८९ व्यक्तिंमागे १ डॉक्टर असे आहे. त्यामुळे देशात सहा लाखांहून अधिक डॉक्टरांची कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार ३०० रुग्णांमागे १ नर्सची गरज असते मात्र भारतात ६७० व्यक्तींमागे एक नर्स आहे. त्यामुळे देशात २ लाख नर्सेसची कमतरता आहे.
करोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला. अपुऱ्या मनुष्यबळामुळे हा ताण आणखीन वाढला. हा ताण काही अंशी पॅरामेडिकल मनुष्यबळाने कमी केला आहे.
पॅरॉमेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांने जीवशास्त्रासह विज्ञान शाखेतून ५० टक्के गुणांसह १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना करीअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये मेडिकल लॅब टेक्निशिअन, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन, डायलेसीस प्रोफेशनल, एक्सरे टेक्निशिअन, इमर्जंसी मेडिकल टेक्निशिअन, मेडिकल ट्रेनर्स, मेडिकल कंटेट रायटर, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, रिसर्च असिस्टंट,यांचा समावेश आहे.
वाढती गरज
आरोग्याशी निगडित उद्योग /व्यवसायात कधीच मंदी येत नाही. यापुढील काळात तर हा उद्योग आणखी वेगाने वाढेल. त्यामुळे पॅरॉमेडिकल मनुष्यबळाची गरज सतत वाढतीच राहणार आहे. इंडिया हेल्थ ॲण्ड वेलनेस सर्व्हिसेस च्या अहवालानुसार २०२२ मध्ये आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या उद्योगातील उलाढाल १३४ मिलियन डॉलर इतकी राहण्याची शक्यता आहे. आरोग्य विषय प्रभावी व अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात भारत हा जगातील एक प्रमुख देश बनला आहे. त्यामुळे परवडणा-या आरोग्य सुविधा घेण्यासाठी जगातील अनेक रुग्ण भारतात येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फांउडेशनच्या मते भारतातील हेल्थ केअर आणि पॅरामेडिकल उद्योग वार्षिक २२.२५ टक्के या दराने वाढत आहे. पुढील काही वर्षात हा दर दुप्पट सुध्दा होऊ शकतो. आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारेही अधिक निधी उपलब्ध करत आहेत. त्यामुळे या क्षेत्राची झपाट्याने वाढ होणार आहे.
०००
आरोग्य कौशल्य
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च या संस्थेमार्फत कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
(१) सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर– कालावधी एक वर्षं, अर्हता– विज्ञान विषयातील १२ वी उत्तीर्ण. शुल्क – सहा हजार रुपये. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शुल्कातून सूट. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, पर्यावरण, अन्न सुरक्षा अशा बहुवीध बाबींकडे या प्रशिक्षित व्यक्तीस लक्ष पुरवावे लागते. स्वच्छ भारत योजनेंमध्ये या प्रशिक्षित व्यक्तिंना महत्वाची भूमिका बजवावी लागत आहे. नागरी संस्था, पंचतारांकित हॉटेल्स, रेल्वे, विमानतळे आदी ठिकाणी या व्यक्तिंना रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
(२) होम हेल्थएड – अर्हता १२ वी विज्ञान. हे कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्ती रुग्णांची व्यक्तिगत काळजी घेऊ शकतात. यामध्ये स्वच्छता, व्यायाम, कामचलावू स्वरुपाचे अन्न शिजवणे, रुग्णांच्या परिस्थितीचे संनियंत्रण आदी बाबी अपेक्षित आहेत. अशा व्यक्तिगत देखभाल करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तिंची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. कालावधी – चार महिने. शुल्क- हजार रुपये. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शुल्कातून सूट
(३) जनरल ड्युटी असिस्टंट–कालावधी सहा महिने, शुल्क दोन हजार रुपये.अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शुल्कातून सूट. रुग्णालयात आणि घरी रुग्णांची प्राथमिक स्वरुपाची देखभाल करणे, त्यांना सुविधा पुरवणे, डॉक्टर आणि नर्सेस यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रुग्णांच्या स्थितीवर लक्ष ठेवणे अशा सारखी कामे या प्रशिक्षित व्यक्तिस करावी लागतात.
(४) फर्स्ट रिस्पांडर – अर्हता– किमान आठवी. कालावधी चार दिवस. शुल्क हजार रुपये. अपघात किंवा इतर कोणत्याही आणिबाणीच्या प्रसंगी सर्वप्रथम रुग्णास पुरवायची आरोग्य सुविधा, अपघातातील रुग्णांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखणे, रुग्णांना तातडीने दवाखान्यात पोहचवणे, प्रारंभिक जीवनरक्षक बाबींचा वापर करता येणे आदी बाबी या प्रशिक्षित व्यक्तींकडून अपेक्षित असतात.
(५) डायबेटिस एज्युकेटर
इतर अभ्यासक्रम
(१) मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ, (२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, (३) डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन, (४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ
· संपर्क– नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च, ३३२, एसव्हीके रोड, खेतवाडी, गिरगाव, मुंबई –४००००४, दूरध्वनी – ०२२–२३८८१७२४, ईमेल– director.fwtrc@nic.in
संकेतस्थळ–www.fwtrc.gov.in
०००००
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांतर्गत प्रयोगशाळेत रुग्णांचे रक्त/मुत्र/थुंकीची तपासणी करणे, या तपासणीचे निष्कर्ष काढणे आणि त्याचा विस्तृत अहवाल तयार करणे या बाबींचा समावेश आहे. हा अहवाल आणि त्यातील निष्कर्षांचा मोठा उपयोग डॉक्टरांना उपचारांची दिशा प्रभावीरीत्या ठरवण्यासाठी होत असतो. डॉक्टरांच्या यशामध्ये मेडिकल लेबॉरेटरी तंत्रज्ञ महत्वाची भूमिका बजावत आहेत.
आपल्याकडे मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ) हा अभ्यासक्रम अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरु करण्यात आला आहे. काही संस्थांमधील या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा तर काहींचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याने12 वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा. या विषयामध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर लेबॉरेटरी मॅनेजर, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशिअन, रिसर्च असोशिएट, लेबॉरेटरी टेस्टिंग मॅनेजर इत्यादी संधी मिळू शकतात.
अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था आणि अभ्यासक्रम
(१) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंस – या संस्थेत तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क– सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंसेस, हिल बेस,लव्हाळे, पुणे – ४१२११५, दूरध्वनी–०२०–६६९७५०४०, संकेतस्थळ– sihspune.org, ईमेल– info@sihspune.org
(२) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्यूएट मेडिकल सायंस–
या संस्थेचे अभ्यासक्रम (1) बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी – तीन वर्षे. (2) सर्टिफिकेट कोर्स इन इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन कोर्स– कालावधी – एक वर्षं. प्रवेशासाठी 12 वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशासत्र आणि जीवशास्त्रात मिळालेल्या गुणांचा आधार घेतला जातो. प्रवेश प्रकिया ऑगस्ट ते सप्टेबर या कालावधीत राबवली जाते.
संपर्क– जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्यूएट मेडिकल सायंस कॅम्पस रोड, गोरीमेदू, धन्वंतरी नगर, पुडीचेरी– ६०५००६, संकेतस्थळ– https://jipmer.edu.in/ दूरध्वनी-०४१३-२२९६००२
(३) एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स
या संस्थेच्या नवी मुंबई आणि औरंगाबाद कॅम्पसमध्ये चार वर्षे कलावधीचा बीएस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क– एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंसेस, एमजीएम कॅम्पस, सेक्टर 1, कामोठे, नवी मुंबई–410209, संकेतस्थळ– mgmuhs.com, ईमेल– registrar@mgmuhs.com, दूरध्वनी– 020-27432471 , फॅक्स– 27431094
(४) भारती विद्यापीठ
या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नलॉजी हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता– बीएस्सी इन मायक्रोबॉयलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री किंवा झुऑलॉजी किंवा बॉटनी. संपर्क– मेडिकल कॉलेज, पुणे – सातारा रोड, पुणे– 411043 ,दूरध्वनी– 020-24373226, फॅक्स– 24372175, ईमेल–bvumedicalpune@gmail.com, संकेतस्थळ– https://mcpune.bharatividyapeeth.edu/
(५) के.जे सोमय्या मेडिकल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर–
या संस्थेने पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून त्या अंतर्गत बायोकेमेस्ट्री, मायक्रोबॉयलॉजी आणि पॅथलॉजी या तीन विषयांपैकी कोणत्याही एकामध्ये स्पेशलायझेशन करण्याची सुविधा आहे. संपर्क– सोमय्या विद्याविहार, कॉम्प्लेक्स, पूर्व द्रुतगती मार्ग, सायन–पूर्व, मुंबई–400022, दूरध्वनी– 022-50954700, ईमेल– somaiyamedical@somaiya.edu, संकेतस्थळ–
सुरेश वांदिले(ekank@hotmail.com/9324973947)
000
