(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

सृदृढ, मानसिक शारीरिक आणि बौध्दिक वाढीसाठी पोषक आहार हा महत्वाचा घटक असतो. आरोग्यदायी वजनवाढ, घट, पोटाचा आकार कमी करणे यासाठी पोषणआहार तज्ज्ञ सहाय्य करतात. मधुमेहासारख्या आजाराला दूर ठेवण्यासाठी वा नियंत्रणात ठेवण्यासाठी सुध्दा या तज्ज्ञांचे सल्ले उपयुक्त ठरतात.

   सध्या कार्पोरेट धर्तीवरची पंचतारांकित आणि मोठी रुग्णालये सर्वत्र उभी राहत आहेत. या रुग्णालयांमध्ये इतर वैद्यकीय सेवांसोबत पोषण आहार तज्ज्ञांची सेवा चोवीस तास उपलब्ध करुन दिली जाते. अनेक आजारांमध्ये डॉक्टरमंडळी रुग्णांना विशिष्ट प्रकाराच्या आहार घेण्याचे सांगतात. पोषण आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारातील विविध घटकांचे नियोजन केले जाते. या विषयात कौशल्य प्राप्त तज्ज्ञांना मोठी मागणी असते. अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये हे तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले जातात. खाजगीरीत्याही अशी सेवा पुरवली जाते. बरेच मोठे खेळाडू,चित्रपट अभिनेते/अभिनेत्री/राजकीय नेते स्वत:चे खाजगी तज्ज्ञ बाळगतात.

   पोषण आहाराबद्यल बरीच जाणीवजागृती झाल्याने करोनोत्तर काळात या क्षेत्रात करिअरच्या विविध संधीही उपलब्ध होतील.

 संस्था आणि अभ्यासक्रम

(1) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन-

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कार्यरत असणाऱ्या या संस्थेने पोषण आहारातील संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी या जगभर ख्याती प्राप्त केली आहे. प्रथिन उर्जा कुपोषणासंदर्भात संस्थेनचे संशोधन महत्वाचे समजले जाते. प्रयोगशाळा, रुग्‍णालये आणि समाज  या तीन घटकांच्या समन्वय आणि सुसूत्रिकरणाव्दारे पोषण आहारासंदर्भातील संशोधनावर संस्थेमार्फत लक्ष केंद्रित केले जाते. सध्याच्या सामाजिक व आर्थिक चौकटीस अनुसरुन पोषण आहारासंदर्भातील समस्यांचे वस्तुनिष्ठ निराकरण करण्यावर भर दिला जातो. देशातील लोकसंख्येच्या विविध स्तरातील पोषण आहाराच्या समस्या जाणून घेतल्या जातात. यासंदर्भातील समस्यांच्या प्रभावी निराकरणाचे व्यवस्थापन केले जाते. राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे,पोषण आहारा संदर्भात तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करणे, शासनास सल्ला पुरवणे ही कामेही या संस्थेकडून अपेक्षित आहे.

 अभ्यासक्रम

(1) एम.एस्सी इन  क्लिनिकल न्युट्रिशन, अर्हता- बी.एस्सी इन होम सायन्स/ ॲल्पाइड न्युट्रिशन/ बायोकेमिस्ट्री/ नर्सिंग किंवा बी.एस्सी इन न्युट्रिशन/ फूड ॲण्ड न्युट्रिशन/ होम सायन्स/ प्राणिशास्त्र/ ॲप्लाइड न्युट्रिशन ॲण्ड पब्लिक हेल्थ/ क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायेटेटिक्स/ फूड सायन्स किंवा न्युट्रिशन डायेटेटिक्स किंवा एमबीबीएस. कालावधी- दोन वर्षे. प्रवेश चाळणी परीक्षेव्दारे.

(2) एम.एस्सी इन स्पोर्टस न्युट्रिशन, अर्हता- बी.एस्सी इन होम सायन्स/न्युट्रिशन /फूड न्युट्रिशन/ ॲप्लाइड न्युट्रिशन ॲण्ड पब्लिक हेल्थ/ क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायेटेटिक्स/फूड सायन्स ॲण्ड क्वालिटी कंट्रोल/ किंवा बी.एस्सी इन लाइफ सायन्स (वनस्पती शास्त्र/ प्राणीशास्त्र/ जैवरसायनशास्त्र/ पोषण आहार/ गृहविज्ञान/ सूक्ष्मजीवशास्त्र/अनुवंश शास्त्र) किंवा एमबीबीएस/ बीएएमएस. कालावधी- दोन वर्षे. प्रवेश चाळणी परीक्षेव्दारे. उपरोक्त दोन्ही अभ्यासक्रम उस्मानिया विद्यापीठ हैदराबादशी संलग्न आहे.

(3) पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन न्युट्रिशन-कालावधी 10 आठवडे, अर्हता- जैविक शास्त्र किवा जैववैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस/ बीडीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ बीपीटी/ बीयुएमएस

संपर्क- हेड एक्सटेंशन ॲण्ड ट्रेनिंग डिव्हिजन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन, जमाय-उस्मानिया, हैदराबाद- ५००००७, दूरध्वनी- ०४०-२७१९७२४७, संकेतस्थळ- nin.res.in ईमेल-petninhyd@yahoo.com

(2)   एसएनडीटी विद्यापीठ

   (1) पी.एच.डी इन फूड सायन्स ॲण्ड न्युट्रिशन/कालावधी- 3 ते 6 वर्षे/अर्हता-संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (2) मास्टर्स इन फूड सायन्स ॲण्ड न्युट्रिशन/कालावधी- 2 वर्षे/अर्हता-संबंधित विषयातील  पदवी. (3) मास्टर्स इन क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स /कालावधी- 2 वर्षे/अर्हता-संबंधित विषयातील पदवी. (4) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स /कालावधी- 1 वर्षे आणि 4 महिने इंटर्नशीप /अर्हता-संबंधित विषयातील  पदवी. (5) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्युट्रिशन ॲण्ड फूड प्रोसेसिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी /कालावधी- 1 वर्ष आणि 4 महिने इंटर्नशीप /अर्हता-संबंधित विषयातील  पदवी. (5) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स, फिटनेस ॲण्ड न्युट्रिशन /कालावधी- 1 वर्ष आणि 4 महिने इंटर्नशीप /अर्हता-संबंधित विषयातील  पदवी. हे अभ्यासक्रम केल्यावर अन्नपदार्थ प्रयोगशाळांमध्ये संशोधक म्हणून संधी मिळू शकते. अन्न सुरक्षा, अन्नपदार्थ उद्योगांमध्ये गुणवत्ता निरीक्षक /अधिकारी, पोषण आहार सल्लागार, अन्नपदार्थ निर्मिती उद्योग, अन्नपदार्थ सेवा आणि व्यापार कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते.(6) सर्टिफिकेट कोर्स इन डायबेटिक केअर ॲण्ड एज्युकेशन

संपर्क-  डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स ॲण्ड न्युट्रिशन, एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटी, जुहू कॅम्पस, सर विठ्ठल विद्याविहार, जुहू रोड, सांताक्रुज (पश्चिम), मुंबई-400049, दूरध्वनी-022-26608855, संकेतस्थळ-http://fsn.sndt.ac.in/, ईमेल- fsn@sndt.ac.in.

 (3) कॉलेज ऑफ होम सायन्स ,निर्मला निकेतन (मुंबई) –   (1) एम.एस्सी होम सायन्स इन फूड, न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, (2) एम.एस्सी इन स्पोर्ट्स  न्युट्रिशन /कालावधी- 2 वर्षे/ अर्हता-कोणत्याही विषयातील बी.एस्सी होम सायन्स किंवा बी.एस्सी बायोकेमिस्ट्री/बी.एस्सी-जैविकशास्त्र/बी.एस्सी- नर्सिंग/ फिजिओथेरपी. हा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम आहे. (3) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन/कालावधी- एक वर्षे आणि दोन महिने इंटर्नशीप /अर्हता- बी.एस्सी (होम सायन्स/ बी.एस्सी-मायक्रोबायलॉजी/बायोकेमिस्ट्री/लाइफ सायन्स)

   संपर्क- निर्मला निकेतन, कॉलेज ऑफ होम सायन्स, 49, न्यू मरिन लाइन्स, मुंबई-400020, दूरध्वनी- 022-22076503,फॅक्स- 22003217, संकेतस्थळ-www.nirmalaniketan.com, ईमेल-office@nnchsc.edu.in

           (4) नागपूर विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ होम सायन्स   या संस्थेत एम.एस्सी इन फूड सायन्स ॲण्ड न्युट्रिशन हा दोन वर्षे कालावधीचा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड पेशंट कौन्सिलिंग हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो.

   संपर्क– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रविंद्रनाथ टागोर मार्ग नागपूर-440001, दूरध्वनी- 0712-2500370, संकेतस्थळ- www.nagpuruniversity.org,

(5) सोफिया कॉलेज फॉर वुमेन (मुंबई)

(1) सर्टिफिकेट कोर्स फॉर डायट ट्रेनर्स, (2) सर्टिफिकेट कोर्स ऑन बेसिक्स इन फूड ॲण्ड न्युट्रिशन. अर्हता- कोणत्याही शाखेतील 12वी /कालावधी- एक वर्ष.

   संपर्क -सोफिया कॉलेज फॉर वुमेन भुलाबाई देसाई रोड, मुंबई – 400026, दूरध्वनी- 022-23512642 ,फॅक्स- 2351 3183, संकेतस्थळ- www.sophiyacollegemumbai.com,ईमेल- sophiyacollegemumbai@gmail.com

(6) फूड ॲण्ड न्युट्रिशन डिपार्टमेंट  (दिल्ली विद्यापीठ)

   (1) एम.एस्सी इन फूड ॲण्ड न्युट्रिशन (अर्हता- 55 टक्के गुणांसह बी.एस्सी-होम सायन्स (आनर्स) –  स्पेशलायझेशन इन फूड आणि न्युट्रिशन /निवड- चाळणी परीक्षेद्वारे /कालावधी-  दोन वर्षे  )

   (2) पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स ॲण्ड पब्लिक हेल्थ न्युट्रिशन (अर्हता- 50 टक्के गुणांसह बी.एस्सी-होम सायन्स/बी.एस्सी-फूड टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी-मायक्रोबायॉलॉजी/ बी.एस्सी-बायोकेमिस्ट्री/ बी.एस्सी-नर्सिंग. निवड- या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर /कालावधी- एक वर्षं),   (3) पी.एच.डी इन फूड ॲण्ड न्युट्रिशन.

   संपर्क- लेडी इरविन कॉलेज, सिकंदरा रोड, नवी दिल्ली- 110001, टेलेफॅक्स- 011-23711222, संकेतस्थळ-www.ladyirwin.edu.in, ईमेल- director@lic.du.ac.in

(6) स्कूल ऑफ कंटि्यन्यूईंग एज्युकेशन

   इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कंटि्यन्यूईंग एज्युकेशन मार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.(1) मास्टर ऑफ सायन्स इन फूड ॲण्ड न्युट्रिशन,कालावधी  किमान- दोन वर्षे/अर्हता- बी.एस्सी होम सायन्स वुईथ स्पेशलायझेशन इन फूड ॲण्ड न्युट्रिशन/डायटेटिक्स/क्लिनिकल न्युट्रिशन/(2) ग्रॅज्युएट डिप्लोमा इन  न्युट्रिशन ॲण्ड हेल्थ एज्युकेशन.कालावधी- एक वर्षं, अर्हता- कोणत्याही विषयातील 12 वी उत्तीर्ण.

    संपर्क – स्कूल ऑफ कंटि्यन्यूईंग एज्युकेशन, रुम नंबर-101, ब्लॉक-जी, झकीर हुसेन भवन, आयजीएनओयू, मैदान घारी, नवी दिल्ली-110068, दूरध्वनी- 011-29572513, 29536347, संकेतस्थळ- www.ignou.ac , ईमेल- soce@ignou.ac

000