(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फूड प्रॉडक्शन,बेकरी,फ्रंट ऑफिस,हाऊसकीपिंग

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲल्पाइड न्युट्रिशन, मुंबई ही आतिथ्यशीलता आणि हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची संस्था. भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या, या संस्थेने कौशल्य विकासाला प्राधान्य देणारे काही पदविका अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी सहज आणि सुलभतेने मिळावी या अनुषंगाने या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर देणारे आहेत. या संस्थेकडे उत्तम अशी प्रयोगशाळा किंवा किचन आहे. आधुनिक उपकरणे आहेत. ही सर्व उपकरणे विद्यार्थ्यांना हाताळायला मिळतात.

पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थी विद्यार्थींनींना १२ वी नंतर, या क्षेत्रात यायचे असेल, त्यांनी या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवारांनी १२ वीमध्ये इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. पदविका अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून आहे.

सर्व पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी दीड वर्षे आहे. यापैकी एक वर्षे संस्थेत, सैध्दांतिक अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यानंतर वेगळया कंपन्या/ औद्योगिक घटक यामध्ये प्रात्यक्षिक करावे लागते.

पदविका अभ्यासक्रम

() डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन- हा अभ्याक्रम केलेल्या उमेदवारांना हॉटेल रेस्टॉरेंट, फास्ट फूड आऊटलेट, रिसॉर्ट, रेल्वे खानपान सेवा, एअरलाइन्स खानपान सेवा, जलवाहतूक खानपान सेवा आणि तत्सम क्षेत्रे  या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते. या अभ्यासक्रमामध्ये पोषण मूल्ये, खाद्य पदार्थांचे मूल्य/किमती, स्वयंपाकशास्त्र, अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, आरोग्यदायक काळजी, वस्तू आणि पदार्थ, या विषय घटकांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात वाणिज्यिक (कमर्शिअल) स्वरुपाच्या अन्न पदार्थांच्या पाककृती निर्मितीचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये सर्वप्रकारच्या भारतीय, चायनीज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय वेगवेगळया प्रकारच्या भाज्या, आणि मांस कापणे, फळे आणि भाज्या सजवून त्या ग्राहकांना देण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचा सराव केला जातो. कोठार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.

(२) डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी- बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयाचे सखोल ज्ञान या अभ्यासक्रमात दिले जाते. यामध्ये ब्रेडची निर्मिती, पॅस्ट्रीची निर्मिती, केक डेकोरेशन, चॉकलेट डेकोरेशन या विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. शिवाय व्यवसाय/ स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान प्रदान केले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना बेकर्स, पॅस्ट्री शेफ, चॉकलेटिअर्स, डेझर्ट स्पेशॅलिस्ट अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

(३) डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस – या अभ्यासक्रमात अन्नपदार्थ आणि खाद्य-पेये सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये अन्नपदार्थ सेवा, विविध पेय सेवा, अन्न आणि पेये नियंत्रण, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवाद संप्रेषण, रेस्टॉरेंट व्यवस्थापन, बार व्यवस्थापन आणि कार्यान्वयन या विषय घटकांचा समावेश आहे.

(४) डिप्लोमा इन हाऊसकीपिंग- या अभ्यासक्रमात आतिथ्यसेवा केंद्र (हॉटेल/ गेस्ट रुम/ निवासस्थाने इत्यादी) यांच्या दैनंदिन देखभालीची कार्यपध्दती, अंतर्गत सजावट, देखभाल- दुरुस्ती सेवा, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवाद संप्रेषण या बाबींचा समावेश आहे.

(५) डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन- या अभ्यासक्रमात आतिथ्यसेवेच्या कार्यालयाचे कामकाज, कार्यपध्दती, लेखा विषयक बाबी, हॉटेलचे लेखा, व्यवसाय संवाद संप्रेषण, संगणकाचा उपयोग या बाबी शिकवल्या जातात.

क्रॉफ्ट कोर्स इन प्रोफेशनल बारटेंडिंग- या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. १२ वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा. १२ वीतील गुण आणि मुलाखत यावर आधारित या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. पंचतारांकित हॉटेलमध्ये, अशा प्रकारच्या कौशल्यप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी मिळू शकते.

रोजगार से हुनर

आतिथ्य सेवा उद्योगास मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी या संस्थेने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने, रोजगार से हुनर या उपक्रमांतर्गत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. सर्व अभ्यासक्रमांसाठी किमान अर्हता आठवी उत्तीर्ण आहे. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –

(१) बेकरी — कालावधी- आठ आठवडे/ वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे. (२) फूड ॲण्ड बिव्हरेज– कालावधी- सहा आठवडे/ वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे, (३) फूड प्रॉडक्शन- कालावधी- आठ आठवडे / वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे, () हाऊसकीपिंग युटिलीटी – कालावधी- सहा आठवडे/ वयोमर्यादा-१८ ते २८ वर्षे.

प्रशिक्षण सुविधा

औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशीप आणि प्लेसमेंटच्या संधी पुढील संस्थांमध्ये मिळतात- द लीला, मॅरिऑट, हिल्टन, फोर सिझन, नोव्होटे, आयटीसी, हयात, ताज ओबेरॉय, ट्रायडंट, मेरिडियन, रॅडिसन, फेअरमाँट, ताज, हॉलिडे इन, सॉफिटेल, इंटरकाँटिनेन्टल इत्यादी

संपर्क – इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) – मुंबई- ४०००२८, दूरध्वनी- ०२२-४५२८४१००, ईमेल-admission@ihmctan.edu, संकेतस्थळ – ihmctan.edu,

०००

सर्वोत्कृष्ट संस्था

नवी दिल्लीस्थित इंस्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन ही, पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. आतिथ्यशीलता, हॉटेल व्यवस्थापन या विषयांमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्था आहे.

या संस्थेतही कौशल्य विकासास प्राधान्य देणारे पुढील अभ्यासक्रम करता येतात. () डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, () डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस –या अभ्यासक्रमाला ७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (३) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन१२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

तिनही पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दीड वर्षे आहे. दीड वर्षांपैकी एक वर्षे संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

प्रशिक्षण संधी

पुढील संस्थांमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात- डिवाइन बेकरी, कॅफे दिल्ली, क्राउन प्लाझा, फोर सिजर, गझल रेस्टाँरेंट, ग्रँड हयात, हॉलिडे इन, हयात रिजन्सी, आयटीसी ग्रँड, आयटीसी मोर्य, आयटीसी शेरटन, जे डब्ल्यू मॅरिऑट, ली मेरिडियन, निर्वान, ओबेरॉय मेडन, प्राइड प्लाजा, रेडिसन ब्ल्यू, शांग्रिला, ताज सिटी सेंटर, ताजमहल, ताजपैलेस, द ललित, लिला पॅलेस, ओबेरॉय राज विलास, ओबेरॉय उदय विलास, पार्क, द ग्रँड ,विवांता, वेलकम, वाईल्ड फ्लावर, रेनेसॉ, इत्यादी.

संपर्क –  इंस्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली ११००१२, दूरध्वनी-  ०११-२४८४१४११, संकेतस्थळ- www.ihmpusa.net, ईमेल- ihmpusa@rediffmail.com

०००

राज्यशासनाची संस्था

स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट- सोलापूर येथे असलेली ही संस्था राज्यशासनाच्या अखत्यारितील आहे. या संस्थेत पुढील पदविका अभ्यासक्रम करता येतात-

() डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी, () डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस, (३) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. प्रवेश १२ वीच्या गुणांवर दिला जातो.

संपर्क- ए १६०, कंबर तलावाजवळ, वैजापूर रोड, ३० सोलापूर- ४१३००४

सुरेश वांदिले