(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन इंस्टिट्यूट (एनआयएफटी) या संस्थेने कौशल्यनिर्मितीचे बरेच अभ्यासक्रम, निरंतर शिक्षण या पध्दतीने सुरु केले आहेत.हे अभ्यासक्रम अल्प कालावधीचे आणि रोजगारास चालना देणारे व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.

(१) डिप्लोमा इन फॅशन आंत्रप्रिन्युरशीप

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (१)विक्री, (२)विपणन (मार्केटिंग), (३) ब्रँडिंग, (४) रिटेलिंग आणि (५)मर्कंडायजिंगचे (व्यवसाय) प्रशिक्षण (६)वस्त्रनिर्मितीचे तांत्रिक ज्ञान, (७) धाग्यांचे तांत्रिक ज्ञान , (८) व्यवस्थापकीय कौशल्य तंत्र आणि तांत्रिक बाबी, (९)व्यवसाय कसा करावा, (१०) व्यवसायाचा आराखडा तयार करणे, (११)व्यवसायाच्या सुसाध्यतेचा अभ्यास, (११) प्रकल्प अहवाल, (१२)प्रकल्प व्यवस्थापन यांचे ज्ञान प्रदान केले जाते.

या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा १२ वीनंतर तीन वर्षे कालावधीची पदविका प्राप्त केलेले उमेदवार अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. दोन ते तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्रवेश घेताना प्राधान्य दिले जाते.

संधी – हा अभ्यासक्रम केल्यावर (१)स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), (२)व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), (३)निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), (४) नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.

०००

(२) ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस

सध्याचा काळ ई कामर्सचा असल्याने, फॅशन व्यवसायही या पध्दतीने करता येणे शक्य व्हावे यासाठी, या संस्थेने तीन महिने कालावधीचा, ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस, हा अभ्यासक्रम एनआयएफटीने, सुरु केला आहे. तो ऑनलाईन पध्दतीने करता येतो. या अभ्यासक्रमात ऑनलाईन व्यवसाय कसा करावा, त्यासाठी सुयोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म कसे निवडावे, ई-कॉमर्स व्यवसायामधील सध्याचे प्रवाह, ई-बिझिनेस वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन मर्कंडायजिंग, ऑनलाईन मार्केटिंग आणि फॅशन आंत्रप्रिन्युरशीप अशा क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.

संधी –हा अभ्यासक्रम केल्यावर स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.

संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई-४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल- fce.mumbai@nift.ac.in ,पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना https://nift.ac.in/mumbai/continuingeducation या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागतो.

 ०००

(३) ब्रँड आयडेंटिटी डिझाइन

बाजारात येणारी कोणतीही नवी वस्तू किंवा उत्पादनाला ग्राहकांकडे आकर्षून घेण्यासाठी स्वतंत्र ओळख निर्माण करणे आवश्यक असते. अशी ओळख निर्माण करण्यासाठी व्युहनीती किंवा आराखडा तयार करावा लागतो तसेच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करुन त्यांना कायमस्वरुपी टिकवायचे असते. त्याअनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना एखाद्या नव्या उत्पादनाची स्वतंत्र ओळख (ब्रँड आयडेंटिटी) निर्माण करण्याचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते.

या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- () लोगो (विशिष्ट चिन्ह/आकृती) ची निर्मिती प्रकिया आणि अभिकल्प/डिझाइन, () लोगो डिझाइनसाठी डिजिटल तंत्राचा वापर, () छायाचित्रण कला, () ब्रँडचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना (१)लोगो डिझाइन, (२)ब्रँड कोलॅट्रल डेव्हलपमेंट, (३)सोशल मीडिया पोस्ट डिझाइन आदी क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते.

 या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जातो. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या रायबरेली (nift.ac.in/raebareli) कॅम्पसमध्ये करता येतो.