फॅशन तंत्र-कौशल्य
फॅशन ज्ञानशाखेशी निगडित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेतील अल्प कालावधीचे अभ्यासक्रम करु शकतात. प्रात्यक्षिकांवर भर असलेल्या अभ्याक्रमांच्या पूर्ततेनंतर रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.
नियमित स्वरुपाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसोबतच नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत कौशल्य निर्मितीचे लघु मुदतीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांचा कालावधी, सहा महिने ते दोन वर्षे असा आहे. प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर असलेल्या या अभ्यासक्रमांमुळे करिअर करणं सुलभ जाऊ शकतं. हे अभ्यासक्रम निरंतर शिक्षण या प्रणालितील आहेत. ते सोईप्रमाणे म्हणजे सध्यांकाळी किंवा सुटींच्या दिवशी करता येतात. हे अभ्यासक्रम फॅशन उद्योगांशी संबंधित उद्योजक आणि या क्षेत्रातील अभ्यासक यांच्या सल्ल्याने तयार करण्यात आले आहेत.
या क्षेत्रातील उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य उमेदवारांमध्ये निर्माण व्हावे या हेतूने अशा अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम केल्यावर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र दिले जाते.
मुंबई कॅम्पस – १) ॲपरेल कॉस्टिंग ॲण्ड फॅशन मर्कंडायजिंग, अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण, कालावधी- सात महिने, २) ॲपरेल डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट, कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण ,कालावधी- सात महिने, ३) कंटेम्प्ररी ब्रायडल ट्रौस्सेऑ (समकालीन किंवा सध्याच्या काळातील नववधुचा पोषाख) – कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण, कालावधी- आठ महिने, ४)क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण आणि फॅशन पदविका किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि फॅशन उद्योगातील ३ वर्षाचा कामाचा अनुभव, कालावधी- सात महिने ,५) क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण, कालावधी- सात महिने, ६) क्रिएटिव्ह मर्कंडायजिंग- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण, कालावधी- सात महिने, ७) टेक्सटाइल ॲप्लिकेशन फॉर होम ॲण्ड फॅशन- किमान १२वी उत्तीर्ण आणि रिटेल फॅशन उद्योग क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव, कालावधी- सहा महिने.
८) डिझाइन डेव्हलपमेंट फॉर इंडियन एथनिक विअर, अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण, कालावधी-११ महिने.हा अभ्यासक्रम आठवड्यातून तीन दिवस शिकवला जातो. ९) फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी- अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण, कालावधी- १२ महिने. हा अभ्यासक्रम आठवड्यातून पाच दिवस शिकवला जातो. १०) फॅशन रिटेल मॅनेजमेंट, अर्हता कोणत्याही विषयातील १२वी आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याचा १ ते दोन वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी – एक वर्षं, आठवड्याच्या शेवटी शिकवला जातो. ११) फॅशन ग्रॅफिक्स ॲण्ड प्रॉडक्ट मॉडेलिंग, अर्हता कोणत्याही विषयातील १२ वी कालावधी- एक वर्षं, आठवड्याच्या शेवटी शिकवला जातो.१२) लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन- अर्हता कोणत्याही विषयातील १२वी कालावधी- एक वर्षं, आठवड्याच्या शेवटी शिकवला जातो. १३)गार्मेंट एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चुरिंग ॲण्ड मर्कंडायजिंग मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी कालावधी- एक वर्षं, आठवडयातून पाच दिवस हा अभ्यासक्रम शिकवला जातो.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्लॉट नंबर- १५, सेक्टर ४, नवी मुंबई- ४१० २१० , दूरध्वनी- ०२२-२७७४७१००, संकेतस्थळ- http://www.nift.ac.in/mumbai/
दिल्ली कॅम्पस- कालावधी एक वर्षं- १) गार्मेंट डिझाइन टेक्नॉलॉजी, अर्हता- १२ वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस. २) ग्रॅफिक डिझाइन ॲण्ड कम्युनिकेशन- अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस. ३) फॅशन रिटेल मॅनेजमेंट- अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून तीन दिवस. ३)गार्मेंट एक्सपोर्ट मर्कंडायजिंग मॅनेजमेंट- अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून तीन दिवस. ४) क्रिएटिव्ह थिंकिंग ॲण्ड डिझाइन डेव्हलपमेंट, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून चार दिवस. ५) डिझाइन इन बुटिक ॲपरेल ॲण्ड ॲक्सेसरी, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस, ६)फॅशन इंटिग्रेशन फॉर ॲपेरल इंडस्ट्री, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस, ७)फॅशन ॲण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी, अर्हता- १२ वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस,८)लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस, ९)फॅशन फॅब्रिक्स फॉर क्रिएटिव्ह एन्टरप्रायझेस, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून तीन दिवस, १०)फॅशन ई-बिझिनेस मॅनेजमेंट अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी, आठवड्यातून तीन दिवस, ११)फॅशन एन्टरप्रायझेस ॲण्ड बिझिनेस मॅनेजमेंट, अर्हता- १२ वी उत्तीर्ण, आठवड्यातून चार दिवस, १२)कंसेप्ट ऑफ फॅशन मॅनेजमेंट, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून दोन दिवस, १३)डिझाइन डेव्हलपमेंट ऑफ इंडियन एथनिक विअर, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून चार दिवस, १४) क्लोदिंग प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी- अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून पाच दिवस, १५)डिप्लोमा इन क्रॉफ्ट डिझाइन डेव्हलपमेंट ॲण्ड प्लॅनिंग, अर्हता- कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी,कालावधी- एक वर्षं
कालावधी सहा महिने –१) पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आठवड्यातून तीन दिवस, २) क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग, अर्हता- १२वी उत्तीर्ण आणि एक ते दोन वर्षाचा अनुभव, आठवड्यातून तीन दिवस
संपर्क- एनआयएफटी कॅम्पस,हौज खास, गुलमोहर पार्क, नवी दिल्ली- ११००१६, दूरध्वनी-२६५४२१२०, फॅक्स-२६५४२१५१
गांधीनगर कॅम्पस- १) फॅशन इंटिग्रेशन फॉर ॲपेरल इंडस्ट्री. अर्हता- १२वी उत्तीर्ण, संबंधित उद्योगाने प्रायोजित केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाते. कालावधी- एक वर्षं, आठवड्यातून पाच दिवस, २)गार्मेंट प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲपेरल डिझाइन, अर्हता- १२वी उत्तीर्ण/कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाते. कालावधी- एक वर्षं, आठवड्यातून पाच दिवस. संपर्क- एनआयएफटी कॅम्पस- जीएचओ रोड, इन्फोसिटीच्या पाठीमागे, डीएआयआसीटीच्या जवळ, गांधीनगर- ३८२००७, दूरध्वनी-०७९-२३२४०८३२, फॅक्स-२३२४०७७२
सुरत उपक्रेंद्र कॅम्पस १)फॅशन डिझायनिंग ॲण्ड ॲपेरेल टेक्नॉलॉजी, अर्हता- १० वी उत्तीर्ण आणि कार्यानुभव/ कालावधी- एक वर्षं, आठवड्यातून पाच दिवस, २)फॅशन मीडिया कम्युनिकेशन, अर्हता- १२वी उत्तीर्ण, आणि कार्यानुभव, कालावधी- १३ महिेने,आठवड्यातून पाच दिवस, ३)टेक्सटाईल डिझाइन ॲण्ड डेव्हलमेंट अर्हता- १० वी उत्तीर्ण आणि कार्यानुभव/ कालावधी- १३ महिने,आठवड्यातून पाच दिवस.
संपर्क- एनआयएफटी सबसेंटर,एनआयएफटी कॅम्पस, सरदार वल्लभभाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस,इच्छानाथ सर्कल,दमस रोड,सुरत-३९५००७,दूरध्वनी-०२६१-२२५९१६९
बेंगळुरु कॅम्पस- १) फॅशन ॲण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी, अर्हता- १२ वी उत्तीर्ण आणि कार्यानुभव/ कालावधी-१३ महिने, आठवड्यातून पाच दिवस, २) फॅशन इंटिग्रेशन फॉर टेक्सटाईल्स, अर्हता- १२ वी उत्तीर्ण आणि कार्यानुभव/ कालावधी-१५ महिने, आठवड्यातून पाच दिवस, ३) फॅशन रिटेल मॅनेजमेंट , अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि कार्यानुभव/ कालावधी-१३ महिने, आठवड्यातून तीन दिवस, ३) गार्मेंट एक्सपोर्ट मॅनेजमेंट , अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि कार्यानुभव/ कालावधी-१३ महिने,आठवड्यातून तीन दिवस, ४) ॲपेरल डिझाइन ॲण्ड डेव्हपमेंट, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ परीक्षा उत्तीर्ण, कालावधी- ७ महिने, आठवड्यातून पाच दिवस, ५) ॲपेरल मर्कंडायजिंग ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग अर्हता- कोणत्याही विषयातील १२ परीक्षा उत्तीर्ण, कालावधी- ७ महिने, आठवड्यातून पाच दिवस ,६)फॅशन आर्ट ॲण्ड वुमेन इलुस्ट्रशेन, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ परीक्षा उत्तीर्ण आणि चित्रकलेचे मुलभूत कौशल्य, फॅशन आणि स्टायलिंगची समज आवश्यक, कालावधी-७ महिने, आठवड्यातून तीन दिवस, ७) डिझाइन,पॅटर्न मेकिंग,ॲण्ड डिझाइन स्टुडिओ मॅनेजमेंट फॉर एथिनिक ॲपरेल, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ परीक्षा उत्तीर्ण, कालावधी- ६ महिने, आठवड्यातून पाच दिवस, ८) डिजिटल मीडिया ॲण्ड व्हिज्युएल कम्युनिकेशन, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ परीक्षा उत्तीर्ण, कालावधी-७ महिने,आठवड्यातून तीन दिवस.
संपर्क- एनआयएफटी कॅम्पस, नंबर २१, सिक्स्टिन्थ क्रॉस स्ट्रीन्ट, २७ मेन रोड, सेक्टर आय,एचएसआर लेआऊट, बेंगळुरु-५६०१०२, दूरध्वनी- ०८०-२२५५२५५०,फॅक्स- २२५५२५६६