(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

नववधुच्या पोषाखाच्या डिझाइनचे क्षेत्र आता करिअर घडविण्यासाठीसुध्दा उपयुक्त ठरु शकते. हे कौशल्याचे क्षेत्र असून त्याविषयीचा प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम, कंटेम्प्ररी ब्रॉयडल ट्रोस्स्यू डिझाइन, या नावाने ओळखला जातो. हा अभ्यासक्रम या संस्थेच्या निरंतर शिक्षण पध्दतीच्या उपक्रमांतर्गत करता येतो.

फॅशनेबल वस्त्रांचे डिझाइन, निर्मिती, विक्री या क्षेत्रांमध्ये आवड असणाऱ्या आणि हटके काही करु इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम कोणत्याही ज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास करता येतो.

या अभ्यासक्रमात वधु पोषाखाच्या डिझाइनच्या अनुषंगाने रंगसंगती, पोत, आकार, साहित्य या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. संबंधित वधुची इच्छा आणि आवड, तिचे आकारमान ,तिचा कल या बाबी लक्षात घेऊन या पोषाखाचे नमूने किंवा साचे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय, पाश्चिमात्य आणि समकालीन फ्युजन वधु पोषाख निर्मितीच्या सर्व तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर फॅशन डिझायनर, उद्योजक, फॅशनेबल पोषाखांची विक्री केंद्र चालक आदी संधी मिळू शकतात. हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा आहे.

संपर्क- https://nift.ac.in/mumbai/continuingeducation

०००

() डिप्लोमा इन फॅशन फिट ॲण्ड स्टाइल

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक फॅशन प्रचलित कल, संभाव्य कल लक्षात घेऊन दर्जेदार स्मार्ट फॅशनेबल डिझायनर्स पोषांखाची निर्मिती करण्याची कला, कौशल्य  आणि तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात. (१) डिझायनर्स, (२) फ्री लान्स डिझाइन कंसलटंट, (३) डिझाइन मॅनेजर्स, (४) स्टायलिस्ट, (५) फोरकास्टिंग ॲण्ड फॅशन ट्रेंड ऑर्गनायझर, (६) कॉस्च्युम डिझायनर, (६) इलुस्ट्रेटर, (७) पॅटर्न इंजिनीअर, (८) आंतरप्रिन्युरर्स.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवारास तो करता येतो.

संपर्क- https://nift.ac.in/mumbai/continuingeducation

०००

() इंट्रोडक्शन टू फॅशन शूज (एथनिक फूटवेअर)या अभ्यासक्रमात पादत्राणांच्या डिझाइनपासून ते पॅकेजिंगपर्यंतच्या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. विशेषत: देशी गरजा आाणि ग्राहकांची आवड व कल लक्षात घेतला जातो. देशांतर्गत फॅशनेबल पादत्राणे निर्मिती उद्योगांना लागणारे डिझाइन आणि तांत्रिक कौशल्य उमेदवारांना शिकवले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या रायबरेली कॅम्पसमध्ये (nift.ac.in/raebareli) करता येतो.

(४) क्रियेटिव्ह फॅशन स्टायलिंग- या अभ्यासक्रमात इव्हेंट (कार्यक्रम/ प्रसंग), थिम (विषय), प्रचलित कल (ट्रेंड), व्यक्तिगत शैली (स्टाइल) नुसार स्मार्ट प्रतिमा निर्मितीसाठी फॅशनेबल वस्त्रप्रावरणांचा वापर करण्याचे तंत्र आणि कौशल्य यावर भर दिला जातो.

काय शिकाल?

(१) डिझाइन आणि सौंदर्यशास्त्राची मुलभूत तत्वे, (२) फॅशन स्टायलिंगची ओळख, (३) मुलभूत छायाचित्रण कला, (४) स्टायलिंग प्रेझेंटेशन

करिअर संधी- (१) फॅशन स्टायलिस्ट, (२) फॅशन कंसलटंट, (३) इमेज मेकओव्हर आर्टिस्ट, (४) फॅशन फोटोग्राफर.

या अभ्यासक्रमाचा कालावधी एक आठवडा. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जातो. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या शिलाँग (nift.ac.in/shillong) कॅम्पसमध्ये करता येतो.

000