बालकदिन करुया वाचकदिन
मुलं, हीच राष्ट्रनिर्माणाचे कार्य करु शकतात, असं, पंडित नेहरु म्हणत. मात्र, त्यासाठी त्यांच्यावर उत्तम संस्कार घडायला हवेत. त्यांचं व्यक्तिमत्व उजळून निघायला हवं. चौफेर व्हायला हवं. त्यासाठी त्यांना वाचानाची आवड लागायला हवी. अशी आवड निर्माण करणारी माझी काही पुस्तके-
(१)१६९५-स्मार्ट रोबो,एआय आणि औरंगजेब : औरंगजेबाच्या शाही जहाजावर पडलेल्या दरोड्याच्या शोध त्याच्याकाळात लागत नाही. मात्र, २०२३ मधील दहावित शिकणारा मुलगा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हा शोध घेतो. त्याच्या शोध, बिबिका मकबऱ्यापर्यंत जातो. काय आहे हे रहस्य? अल्पावधीतच वाचकप्रिय झालेही कुमार विज्ञान कादंबरी. कल्पनारम्यता, वास्तव आणि तंत्रज्ञान यांच्या अदभूत जगात नेते. राजहंस प्रकाशनाने घेतलेल्या कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धेत, या कादंबरीस पहिला क्रमांक मिळाला. (किंमत-२४० रुपये ,संपर्क क्रमांक-०२०-२४४७३३४५९ ,ॲमेझॉनवरही उपलब्ध)
(२)मित्र हरवले- पर्यावरणची महती सांगणाऱ्या कथा.(प्रकाशक-राजहंस प्रकाशन पुणे,किंमत-५० रुपये, संपर्क क्रमांक-०२०-२४४७३३४५९)
(३)बालक पास,पालक नापास- मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे,आवडीप्रमाणे शिकू दिल्यास, काय चमत्कार घडू शकतो, हे सांगणाऱ्या, करिअर कथा.(प्रकाशक-विश्वकर्मा प्रकाशन,पुणे, किंमत-१२५ रुपये, संपर्क- ९१६८६८२२००)
(४)आम्ही स्मार्ट मुलं– आजच्या स्मार्ट, चौकस, हुषार मुलांच्या प्रेरणादायी कथा. (या कथा संग्रहास, मुंबई मराठी साहित्य संघाचा पहिला पुरस्कार मिळाला. प्रकाशक-ग्रंथाली मुंबई. किंमत-१५० रुपये, संपर्क-०२२-२४२१६०५०)
(५) मूषक स्वामींचा दंगा, राणीला इंगा- श्री सिध्दविनायकाचे परमभक्त असलेले मूषकस्वामी लंडनच्या राजमहालात जाऊन, राणीला चांगला धडा शिकवतात. तोसुध्दा त्यांच्या परमशत्रू असलेल्या, पुसीकॅटच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. राणीने, पुसीकॅटचा अपमान कां केला? सिध्दीविनायकांचा आणि पुसीकॅटचा काय संबंध? मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या साहाय्याने, मूषकस्वामी लंडनला कसे पोहचतात? (या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चित्तथरारक अद्भूतरम्य कादंबरीत मिळतील. प्रकाशक-ग्रंथाली मुंबई,किमंत-१२० संपर्क-०२२-२४२१६०५०)
(६)बालकथा ब्लॉग- www.sureshwandie.inया संकेतस्थळावर, बालकथा ब्लॉग- विविध प्रकाराच्या ५५० हून अधिक बाल/कुमार कथा.
मुलांचा, स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी, ही आनंदाची मेजवाणी. वाचा,बघा,आनंदी व्हा,प्रेरणा घ्या,चौफेर फुला…
सुरेश वांदिले
