(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बिझिनेस अनॅलिटिक्स

तंत्रज्ञानातील सतत होणारे बदल आणि व्यवसायामध्ये निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन मोठी व्यावसायिक घराणी, कॉर्पोरेट हाऊसेस व्यवसायवृध्दीसाठी कमी खर्चातील उपाययोजना कशा करता येतील याकडे लक्ष पुरवित आहेत. अनेक संस्था आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी सरसावल्या आहेत.

व्यावसायिक संस्था, विक्री, विपणन, संशोधन, ग्राहकसेवा आदी मार्गातून अनेक प्रकारची व्यामिश्र माहिती गोळा करत असते. या माहितीचा प्रचंडसाठा कालपरत्वे गोळा होत जातो. साठलेल्या या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर संस्था किंवा कार्पोरेट हाऊसेस  यांना भविष्यात येणाऱ्या समस्या, प्रश्न याची कल्पना येऊ शकते. कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची आवशक्यता आहे, हे कळू शकते. कंपनीच्या महसुलात वाढ करण्यासाठी या विश्लेषणाचा उपयोग होऊ शकतो.

सध्या () बँकिंग, () टेलिकम्युनिकेशन, () आऊटसोर्सिंग, () सोशल मीडिया, () फायनांशिअल सर्व्हिसेस, () मॅन्युफॅक्चुरिंग, () हेल्थकेअर, () ट्रॅव्हल, () एनर्जी, (१०) ई-गव्हर्नन्स आणि (११) ई-कॉमर्स या क्षेत्रात बिझिनेस अनॅलिटिक्स यांची सेवा मोठया प्रमाणावर घेतली जात आहे.

भारतात या ज्ञानशाखेतील मनुष्यबळाची मागणी मोठया प्रमाणावर वाढली आहे. मात्र सध्या तरी या क्षेत्रात पुरेशा प्रमाणात असे मनुष्यबळ उपलब्ध नाही. () बिग डाटा (गोळा होणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीचा साठा), () ॲनॅलिटिक्स (साठलेल्या माहितीचे सांख्यिकीय निष्कर्ष काढणे किंवा विश्लेषण करणे), सांख्यिकी, () प्रॉबेबिलिटी (संभाव्यता), () मॅनेजिंग ॲबिलिटी (व्यवस्थापकीय कौशल्य), () बिझिनेस अंडरस्टँडिंग (व्यवसाची सूक्ष्म जाणीव), () मेंटनिंग रिसोर्सेस (संसाधनाची देखभाल) हे विषय हाताळणाऱ्या उच्चप्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आढळून येत आहे.

बिझिनेस ॲनॅलिटक्स प्रणालीद्वारे निर्णय क्षमतेसाठी आवश्यक ठरणाऱ्या विश्लेषणात्मक, कार्यात्मक आणि तांत्रिक कौशल्यात वाढ करणे शक्य होऊ शकते. मॅकन्सी, मॉर्गन स्टॅनले, मायक्रोसॉफ्ट, टाटा समूह ,गुगल, फेसबुक, लिंक्डइन, अमेरिकन एक्सप्रेस, डिलॉइट, ॲक्सेंच्युर, लार्सन ॲण्ड टयुब्रो अशा सारख्या कंपन्यांमध्ये या मनुष्यबळाची भरती केली जात आहे.

करिअर संधी

या मनुष्यबळास () डाटा अनॅलिटिक्स, () फंक्शनल मॅनेजर्स (वित्त/ मनुष्य बळ/ विपणन/ वित्त/ कार्यान्वयन इत्यादी), () बिझिनेस ॲनॅलिस्ट प्रोजेक्ट मॅनेजर, () बिझिनेस इंटेलिजन्स एक्सपर्ट, () बिझिनेस ॲनॅलिटिक्स कन्सलटंट, () डाटा अनॅलिस्ट, () बिगडाटा अनॅलिस्ट, () डाटा अनॅलिटिक्स प्रोग्रॅमर, () डाटा मायनिंग एक्सपर्ट , (१०) डाटा वेअरहाऊस एक्सपर्ट, (११) प्रेडिक्टिव्ह मॉडेलर , (१२) क्वालिटेटिव्ह अनॅलिस्ट अशा सारख्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.

अभ्यासक्रम

(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता या संस्थेने, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर आणि इंडियन स्टॅस्टिकल इंस्टिट्यूट कोलकता या संस्थेच्या साहाय्यानं, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या ज्ञानशाखेतील हा सर्वोत्कृष्ठ अभ्यासक्रम समजला जातो. या अभ्याक्रमाचा कालावधी दोन वर्षे. प्रवेशासाठी आयआयएम कोलकता मार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. अर्हता- (१) बीई/बीटेक/ एम कॉम/एम.एस्सी किंवा (२) १० वीनंतरचा तीन वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदविका (२) १२ वीनंतरचा चार वर्षे कालावधीची बीएस्सी पदवी. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक.

 संपर्क-

http://www.pgdba.iitkgp.ac.in/

(२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरुने,एमबीए इन बिझिनेस ॲनिलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी-दोन वर्षे. कॉमन एन्ट्रस टेस्ट(कॅट) मधील गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. अंतिम निवड संस्थेची लेखी परीक्षा व मुलाखतीवर आधारित केली जाते. संपर्क- https://www.iimb.ac.in/programmes/pgpba