(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेशघेण्यापूर्वी…

डिसेंबर महिना आला की, बिझिनेस स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग, सुरु होते. वेगवेगळ्या, बिझिनेस स्कूलच्या, आकर्षक जाहिराती वृत्तपत्रांमध्ये झळकू लागतात. आमच्याच संस्थेत प्रवेश घ्या, आणि इतक्या-इतक्या, लाखांचे वार्षिक पॅकेज हमखास मिळवाच, अशा सांगणाऱ्या, या जाहिराती असतात. या जाहिरातींवर किती विसंबून राहायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न.

प्लेसमेंट आणि वार्षिक पॅकेज, हे मृगजळ असल्याचे, विद्यार्थ्यांनी पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. काही बिझिनेस स्कूलच्या जाहिरातीतील वार्षिक पॅकेजचे आकडे हे, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) पेक्षाही  अधिक असल्याचे दिसून येते. अशा आकडेवारिंची शहानिशा करता येत नाही. त्यामुळे, संस्थेची जाहिरात उच्चरवाने सांगते, म्हणून, तिकडे धावणे म्हणजे कपाळमोक्ष ठरलेलाच, हे पक्के समजावे.

पॅकेजचे आकडे देताना, सरासरी किंवा ॲव्हेरज पॅकेज इतक्या लाखाचे, असे सांगितले जाते. बहुसंख्य मुलांना, इतके पॅकेज मिळाले, असा त्याचा अर्थ होतो. पण प्रत्यक्षात तसे, असेलच असे नाही. सरासरी काढून आकडेवारी सांगण्याची कला, फसवीच असते. त्याला न भुललेलेच बरे. सर्वोच्च पॅकेज, काही लाख रुपयाचे, हे ठळकपणे जाहिरातीत सांगितले जाते. ते, किती जणांना आणि कोणत्या कंपनीने दिले? हे मात्र, गुलदस्त्यात ठेवले जाते. गेल्या काही वर्षांपासून, मिडियन श्रेणीचे म्हणजेच, सर्वोच्च आणि सरासरी पॅकेजमधील प्रतवारीचे पॅकेज, सांगण्याची पध्दत रुढ झाली आहे. असे हे पॅकेज, किती जणांना मिळाले आणि कोणत्या कंपन्यांनी दिले, हेसुध्दा, जाणून घेणे अत्यावश्यक ठरते.

प्लेसमेंट आणि वार्षिक पॅकेजबाबत, प्रत्यक्ष खात्री केल्याशिवाय अजिबात विश्वास ठेऊ नये. ज्या शैक्षणिक संस्था, प्रवेशासाठी पाठिमागे लागतात, वारंवार फोन कॉल्स करतात, त्यांच्या बाबतीत तर शंकेची पाल, चुकचुकायलाच पाहिजे.

अशा संस्थांच्या, संकेतस्थळावर, प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्याची नावे देताना, हुषारी केली जाते. या संस्था किंवा कंपन्या किंवा उद्योगांचे चिरपरिचित लोगो, अशा माहितीच्या पृष्ठात डकवले जातात. त्यामुळे फसगत होण्याची शक्यता असते. या कंपन्या किंवा उद्योग खरोखरच येतात का? यासाठी प्रत्यक्ष संस्थेत जायला हवे. तिथे अनंत प्रश्न विचारुन, खातरजमा करायला हवी. प्रवेश शुल्कासाठी लाखो रुपये या संस्था, आकारत असल्याने, ही माहिती त्यांनी द्यायलाच हवी. त्यासाठी टाळाटाळ होत असल्यास, दाल मे कुछ काला है, हे स्पष्टच होते.

काही संस्था, फोनवरुनच मुलाखती घेऊन, प्रवेश देण्यास इच्छूक असतात. काही संस्था, घरीच पेपर सोडवा नि प्रवेश घ्या, असेही सांगतात. अशा संस्थांपासून सावध राहायला हवे. रितसर प्रवेश प्रकिया म्हणजेच, लेखी चाळणी परीक्षा, मुलाखत, व्यक्तीमत्व चाचणी, अशा टप्प्यांचा अवलंब करणाऱ्या संस्थांचाच विचार करायला हवा.

यांचा अवश्य विचार करा

गेल्या, तीन- चार वर्षात वेगवेगळया सर्वेक्षण संस्था , बिझिनेस मॅगेझिन यांनी केलेले सर्वेक्षण आणि विद्यार्थी व पालकांचा कल आणि ओढा लक्षात घेतल्यास पुढील बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यास चांगल्या करिअरची संधी सुलभतेनं मिळू शकते-

(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- अहमदाबाद, (२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- बेंगळुरु, (३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोलकता, (४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- लखनौ, (५) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- इंदौर, (६) एस.पी.जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- मुंबई, (७) मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट -गुरगाँव, (८) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- नवी दिल्ली, (९) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड- नवी दिल्ली, (१०) नर्सी मोन्जी स्कूल ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट- मुंबई, (११) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- शिलाँग, (१२) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- पुणे, (१३) सिम्बॉयसीस सेंटर फॉर  मॅनेजमेंट ॲण्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट- पुणे, (१४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-उदयपूर, (१५) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी दिल्ली, (१६) शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट- आयआयटी- मुंबई, (१७) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-तिरुचिरापल्ली, (१८) झेव्हियर  इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-जमेशदपूर, (१९) जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – मुंबई, (२०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- काशीपूर, (२१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आधीचे नॅशनल इंस्टिट्यूट इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग)- मुंबई, (२२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नागपूर, (२३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अमृतसर, (२४) सिडनेहॅम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – मुंबई, (२५) डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल ॲण्ड मॅनेजमेंट इंजिनीअरिंग- आयआयटी कानपूर, (२६) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – संबलपूर, (२७) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – बोधगया, (२८) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राइज – हैदराबाद, (२९) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट – भोपाळ, (३०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट-आनंद, (३१) इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – बनारस हिंदु युनिव्हर्सिटी वाराणसी, (३२) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप- आयआयटी धनबाद, (३३) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी रुरकी, (३४) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी गौहाटी, (३५) विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट – आयआयटी खरगपूर, (३६) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस- आयआयटी मद्रास, (३७) स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिन्युरशिप -आयआयटी जोधपूर, (३८) स्कूल ऑफ मॅनेजमेंट -आयआयटी मंडी, (३९) झेव्हियर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भूवनेश्वर, (४०) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स ॲण्ड बिझिनेस, दिल्ली स्कूल ऑफ बिझिनेस- दिल्ली, (४१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-संबलपूर, (४२) डिपार्टमेंट ऑफ ऑफ मॅनेजमेंट- ‍बिट्स पिलाणी, (४३) स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – कोझिकोड, (४४) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस (पुणे विद्यापीठ), (४५) इंस्टिट्यूट ऑफ ॲग्रीबिझिनेस मॅनेजमेंट -बिकानेर, (४६) वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कुऑपरेटिव्ह मॅनेजमेंट- पुणे, (४७) इंस्टिट्यूट ऑफ हे‍ल्थ मॅनेजमेंट रिसर्च- जयपूर, (४८) सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ    टेक्सटाइल्स  ॲण्ड मॅनेजमेंट- कोईम्बतूर, (४९) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – रायपूर, (५०) के.जे सोमय्या इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायंस मुंबई, (५१) अखिलेश दिनेश मोदी इंस्टिट्यूट फॉर फायनांशिअल ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई, (५२) एल.एन. वेलिंगकर इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च- मुंबई,

इंडियन बिझिनेस स्कूल

हैदराबाद येथील इंडियन बिझिनेस स्कूल ही संस्‍था कोणत्याही सर्वेक्षणात सहभागी होत नाही. तथापि या संस्थेची गुणवत्ता आणि दर्जा वादातीत आहे. या संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जीमॅट किंवा जीआरइ (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. या परीक्षा संबंधिताने परीक्षा केंद्रावर जाऊन दिलेल्या असाव्यात. येथील, “पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट” या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन वर्षाच्या कामाचा अनुभव आवश्यक समजला जा‍तो.

संपर्क https://www.isb.edu

सुरेश वांदिले