(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

माकडाच्या हाती माऊस

   माकडाला माणसांचा पूर्वज समजलं जातं. माकड ते माणूस या प्रवासाला लाखो वर्षं लागली. मात्रअजुनही मॅक्झिमम माणसात माकडांचा किंवा माकडगुणांचा बराच अंश दिसतो. संधी मिळाली की माणसातदडलेला माकड बाहेर पडतो. किंबहुना अशा संधीच्या शोधातच माणूस कायम असतो. कारण त्याचं खरं प्रेमहे विविधरंगी आणि ढंगी माकडचाळे करण्यावर असल्याचं सिध्द झालं आहे.(आठवा बघू कुछ साल पहलेकासल्लू भाय अँड ऐश्वर्या ताईंचा लैला-मजून एपिसोड किंवा आता जोरात आणि जोमात सुरु असलेला ह्रतिकदादा आणि कंगना मावशीचा ईमेल-ईमेल खेळ)

   सर्व प्राणीजगतात माकडांएवढ्या कोलांटउड्या कुणाला घालता येत नाही. पण अशी व्हर्च्युअल शक्तीदयाघन परमेश्वरानं माणसाकडंही ठेवली आहे. तालिबानसारख्या संघटना जगाला वेठीस धरण्यासाठी प्रसिध्दआहेत. त्यांच्या कृष्णकृत्यांचा सूक्ष्म अभ्यास केला तर दिसतं की ही कृत्य त्यांच्यात दडलेला माकडच घडवूनआणत असतो. मल्या काकांचं कधी काळापासूनच वागणं हे असचं होतं. त्याकडे बघत आपण ,क्या बातहै असं म्हणून टाळ्याही वाजवत होतो. असं सुध्दा काहीजण जण ठामपणे सांगतात.

    रामटेक किंवा माहूर येथील मंदिरांच्या आसपास घुटमळणाऱ्या काही माकडांनी माणसाचा एक गुणकौशल्यानं अंगी बाणलाय. दर्शनाला येणाऱ्या माणसाच्या हातातील प्रसादसदृष्य वस्तुंना ते चपळतेनेपळवतात. एखाद्या हुशार भक्तानं हातात प्रसाद ठेवण्याऐवजी तो खिशात दडवून ठेवला तरी मंदिराजवळच्यामाकडांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटत नाही. त्यामुळे भक्त त्याच्याजवळून जाऊ लागताच सराइतपणे ते त्याच्याखिशात हात घालतात.

   विकासकामांचा निधी लंपास करताना जगातील इकडच्या गोलार्धातील आणि तिकडच्याही गोलार्धातीलमाणसांमध्ये हीच माकडीय चपळता विलक्षणरीत्या दिसून आलीय. ग्राहकांना माल देताना दुकानदार चपळाईनंचार दाणे कमी देऊन प्रत्यक्षातील भावापेक्षा चार पैसे अधिक पळवतात.  मॉलवाली मंडळी  तर माकडाच्याशेपटासारखं बील देऊन अधिकृतपणेच चाळीस पैसे खिशात घालतात. एखाद्या कार्यालयात अधिकृतकामांसाठी गेलेल्या सामान्य माणसाच्या खिशात असाच हात अलगद घालण्याची सिध्दी देशोदेशीच्याकार्यालयांनी प्राप्त केलीय. माणूस आणि माकडातलं हे साम्य थक्क करणारं ठरतं.

   सांगायचा मुद्दा हाच की, माणसाचा मेंदू माकडासारखं वागण्याची आणि कृती करण्याची शक्ती अद्यापशाबूत ठेऊन आहे. त्यामुळेच कदाचित माकडाच्याही मेंदूला सध्याच्या माणसारखं कार्यप्रवण होता येऊ शकतंअसं जीवशास्त्रज्ञांची खात्री होती. परवा या खात्रीवर शिक्कामोर्तब झालं. माकडाच्या हाती संगणकाचामाऊस दिला तर तो स्वयंप्रेरणंनं सर्फिंग करु शकतो, असं एका प्रयोगात नुकतच आढळून आलंय.

   माकडाच्या हाती माऊस ही सु-रम्य कल्पना आहे. कल्पना करा की माकड संगणकासमोर बसलाय, कुठेतरी दूरदेशी एक कन्यका चॅटिंग करतेय. ते दोघे फेसबुकवर कनेक्ट झाले आहेत. दोघांचं नंतर तास दोनतास गुलूगुलू चाललंय. नंतर हळूच त्या कन्यकेने माकडरावांना लग्नाची ऑफर दिलीय. त्यांनी ती सहर्षस्वीकारलीय किंवा सर्फिंग करता करता माकडाला विमानतळ नियंत्रण साइटचा पत्ता लागला. त्याने वेडेवाकडेकमांड्स दिले .विमानांचे टायमिंग चुकवले. दिशा चुकवल्या किंवा सर्फिंग करता करता त्याने ई-शॉपिंग सुरुकरुन 25 कोटी रुपयाचं बिल दीपिका पदुकोन यांच्या खात्यात वळतं केले.. किंवा मग स्वारी ऑनलाइनप्लेबॉय मासिकात शिरली तर…तर अशा चित्तथरारक घटना घडू शकतात.

   संगणकात व्हायरस टाकणारे तज्ज्ञ हे माकडाचंच कार्य करीत असतात. एखादा व्हायरस, संगणकयंत्रणेला नंपुसक बनवून टाकू शकतो. प्रत्यक्षात माकडच माऊस घेऊन बसल्यावर त्याचा उन्माद दशपटीनंवाढेल. तो कुणालाही धमकी देईल. टिम्बटुकच्या बायकांना भडकावेल. रणबीररावांच्या विरुध्द कॅटरिना कैफयांच्या कानात आणखी तेल ओतेल. असल्या या भानगडी करुन तो अत्यानंदानं उड्या मारत बसेल.

   माकडाच्या या दिव्यशक्तिची जाणीव माणसाला असतानाही तो त्याच्या हाती माऊस देण्याचा कां बरंविचार करतोय ? माणसाला पूर्वजन्माचे माकडाचे ऋण तर फेडायचं नाहीत ना? मात्र आधुनिक काळातमाणसांचे चाळे लक्षात घेता कुणी कुणाचं ऋण फेडायचं हा प्रश्नच आहे.

   माऊस हाती घेतलेल्या माकडाला संगणकाच्या कृपेनं सांप्रतकालीन माणसाच्या लिला या माकडांपेक्षादसपट (कु) रम्य असल्याचं कळू शकतं. समजा त्याच्या मनात माणसाबद्दल थोडाफार आदर असेलच तरतोही यामुळे निघून जाऊ शकतो. तसं जर झालं तर मग बुरा मत सुनो, बुरा मत देखो आणि बुरा मतबोलो असे उपदेशामृत देणाऱ्या सुप्रसिध्द माकडांनी विद्रोह केला तर..