महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम केल्यानंतर विविध क्षेत्रात करिअर संधी मिळणं अधिक सुलभ झालय.
महाराष्ट्रातील कृषीविद्यापीठांमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात-
बीएस्सी (ऑनर्स) इन (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) वनविद्या, (४) सामुदायिक विज्ञान, (५) कृषी व्यवसाय व्यवस्थापन.
बी. टेक. इन (१) कृषी अभियांत्रिकी, (२) अन्न तंत्रज्ञान, (३) जैवतंत्रज्ञान आणि बॅचलर ऑफ फिशरी सायंस (मत्स्यविज्ञान)
या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे आहे.
प्रवेश अर्हता-
बीएस्सी (ऑनर्स) इन (१) कृषी, (२) उद्यान विद्या–
भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि इंग्रजी, किंवा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र आणि इंग्रजी यापैकी कोणताही एक गट घेऊन १२ वी उत्तीर्ण किंवा इंटर कृषी आणि इंग्रजी. (हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयातील एमचटी-सीईटी /नीट (नॅशनल इलिजिबिलीट कम एन्ट्रन्स टेस्ट)/ जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन)- मेन परीक्षा द्यावी लागेल.)
बीएस्सी (ऑनर्स) वनविद्या, बीएफ एससी (मत्स्यविज्ञान)-
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी, किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, आणि इंग्रजी यापैकी कोणताही गट घेऊन १२ वी उत्तीर्ण किंवा इंटर कृषी आणि इंग्रजी. (हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयातील एमचटी-सीईटी /नीट परीक्षा द्यावी लागेल.)
बी.टेक कृषी अभियांत्रिकी आणि बी.टेक अन्नतंत्रज्ञान–
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित जीवशास्त्र आणि इंग्रजी. (हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयातील एमचटी-सीईटी /जेईई मेन परीक्षा द्यावी लागेल.)
बीएस्सी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान आणि बी.टेक जैव तंत्रज्ञान-
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी. (हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयातील एमचटी-सीईटी /नीट/जेईई मेन परीक्षा द्यावी लागेल.)
बीएस्सी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन-
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित. (हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयातील एमचटी-सीईटी /नीट/जेईई मेन परीक्षा द्यावी लागेल.)
(महत्वाची सूचना- एखाद्या विषयात प्रवेश घेण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्याने, १२ वी परीक्षेत आवश्यक विषयांपैकी एखादा विषय घेतला नसेल तर त्याला संबंधित कृषी विद्यापीठाचा त्या विषयासंदर्भातील फाउंडेशन अभ्यासक्रम करावा लागतो. उदा-बी.टेक कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याने जीवशास्त्राचा अभ्यास केला नसल्यास, ही अपूर्तता भरुन काढण्यासाठी त्याला तसा अभ्यास करावा लागेल.)