सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात सातत्याने व्यवसायवृध्दीसाठी नावीन्यता आणावी लागते, व्यवसायाच्या संकल्पनांमध्ये वेगळ्या सर्जनशील विचारांचा वापर करावा लागतो. त्यासाठी नवे तंत्र, नवी आयुधे आणि नवी प्रकिया यांचा अवलंब करावा लागतो. यातील सातत्यावरच कोणत्याही उद्योग व व्यवसायाचे यश अवलंबून असते. ग्राहकांच्या सध्यकालीन गरजा लक्षात घेण्यासोबतच भविष्याकालीन आवड, गरजा आणि त्यांचे जीवन अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कोणत्याबाबींची आवश्यकता लागेल याचा सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा कोणताही उद्योग वा व्यवसाय कालबाह्य ठरण्याची शक्यता नाकरात येत नाही. त्यामुळे व्यवसायवृध्दीसाठी नवी व्युहनीती करणाऱ्या तज्ज्ञांना महत्व प्राप्त होत आहेत.
हे तज्ज्ञ व्यवसायवृध्दीचे तंत्र आणि संकल्पना वापरण्याचे कौशल्य प्राप्त केलेले असतात. कंपनी/ उद्योग/ व्यवयायाचे मार्केटमधील स्थान अधिक बळकट करणे, नफ्यामध्ये वृध्दी करणे आणि कालसुसंगता टिकवणे या कार्यात प्रमुख भूमिका बजावत असतात.
व्यवस्थापन आणि विपणन या विषयांमध्ये तज्ज्ञता प्राप्त केलेले उमेदवार या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करु शकतात. मार्केटिंग तज्ज्ञास कंपनीच्या वस्तू आणि उत्पादनांची गुणवत्ता व दर्जा उच्च प्रतिचा राहील याकडे कंपनीचे सातत्याने लक्ष वेधावे लागते.
कमी गुणवत्ता आणि दर्जाच्या उत्पादनांची विक्री ही उत्तम व प्रभावी मार्केटिंग कम्युनिकेशनवर अल्पावधितच अयशस्वी ठरु शकते. गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कंपनीचे ब्रँडिंग करणे शक्य होत नाही. अशा कंपन्या ग्राहकांचा विश्वास प्राप्त करु शकत नाही. मार्केटिंग कम्युनिकेटर ग्राहक व कंपनी आणि विविध माध्यमे यांच्यामधील महत्वाचा व प्रभावी दुवा ठरु शकतो. एखाद्या कंपनीचे मार्केटमधील सध्याचे स्थान आणि भविष्यात या स्थानात होणारी घट वा वाढ याविषयी मार्केटिंग कम्युनिकेटर आपल्या कौशल्य वा ज्ञानाद्वारे कंपनी व्यवस्थापकांना सुयोग्य अशी माहिती देऊन सावधगिरीच्या उपयोजना सूचित करु शकतात.
काही अभ्यासक्रम व संस्था
मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) – स्ट्रॅटेजिक मार्केटिंग (व्युहात्मक विपणन) आणि कम्युनिकेशन या विषयाचे अभ्यासक्रम चालवणारी ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम (२) पोस्ट ग्रॅज्यूएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट – कम्युनिकेशन – या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करु शकतात. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.(१)ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड ब्रँड मॅनेजमेंट, (२)डिजिटल कम्युनिकेशन मॅनेजमेंट, (३)मार्केटिंग अॅनॅलिटिक्स (४)डेव्हलपमेंट मॅनेजमेंट ॲण्ड सोशल एन्टरप्राइज, (५)मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांना सामोरे जावे लागते.(१)कॉमन ॲडमिशन टेस्ट – कॅट, झेव्हियर ॲप्टिट्यूड टेस्ट – झॅट किंवा जनरल मॅनजमेंट ॲप्टिट्ड टेस्ट – जीमॅट , या तीनपैकी कोणतीही एक चाळणी परीक्षा द्यावी लागेल. (२) मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ॲडमिशन टेस्ट – एमआयसीएटी. (३)समूह चर्चा आणि मुलाखती. अंतिम निवडीसाठी कॅट/झॅट/जीमॅट या परीक्षेतील गुणांना २० टक्के वेटेज, या एमआयसीएटी परीक्षेतील गुणांना ३० टक्के वेटेज, समूह चर्चा २० टक्के वेटेज, आणि मुलाखती ३० टक्के वेटेज दिले जाते.
इतर अभ्यासक्रम– (१)पोस्ट ग्रॅज्यूएट सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्रिएटिव्ह कम्युनिकेशन- कालावधी एक वर्षं. (२) फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट- कम्युनिकेशन कालावधी तीन वर्षं
संपर्क – मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) शेला, अहमदाबाद – 380058, संकेतस्थळ-www.mica.ac.in, ईमेल-admissionenquiry@micamail
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हर्टायजिंग – अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टाजयजिंग ॲण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वर्षे. संपर्क– नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हर्टायजिंग, सी-२०, सेक्टर दोन, नॉयडा-२०१३०१, संकेतस्थळ-, niaindia.org, ईमेल-admissions@niaindia.org
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन – या संस्थेने मास्टर ऑफ डिझाइन इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट डिझाइन, हा अभिनव अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी निर्मिती, सुशासन, सेवा, कला, माहिती –संवाद तंत्रज्ञान आदी क्षेत्रात नवे बदल, नवे प्रवाह आणि व्यवसायवृध्दीच्या नव्या संकल्पना विकसित करणे आणि त्याचा प्रभावी वापर करण्याची क्षमता प्राप्त करतात. कालावधी – अडीच वर्षे. अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन,अपोजिट टागोर हॉल पालडी, अहमदाबाद- ३८०००७, संकेतस्थळ-http://www.nid.edu
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन– या संस्थेन पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड पब्लिक रिलेशन हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, जेएनयू न्यू कॅम्पस, अरुणा आसिफअली रोड, न्यू दिल्ली- ११००६७, संकेतस्थळ-http://www.iimc.nic.in/
0000
झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेने पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग ऍ़ण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- एक वर्षं. अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क– झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन , ५ महापालिका मार्ग, सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई-४००००१, संकेतस्थळ-http://xaviercomm.org/ ईमेल-admin@xaviercomm.org
०००
एस.पी.जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट– या संस्थेने बॅचलर ऑफ बिझिनेस कम्युनिकेशन हा ३ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता– कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क – (१) पहिला माळा, ट्रेड पॉईंट,कमला मिल्स,लोअर परळ,मुंबई- ४०००१३, दूरध्वनी- ०२२- ६१३०९१००, संकेतस्थळ- www.spjain.org (२) पहिला माळा, कोहिनूर सिटी माल, गेट नंबर एक, कुर्ला-पश्चिम,मुंबई- ४०००७०, दूरध्वनी- ०२२-६१८८७६००
००
युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज– अभ्यासक्रम- बीबीए मीडिया मॅनेजमेंट आणि बीबीए डिजिटल मार्केटिंग हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे. अर्हता- १० वी १२वी मध्ये किमान ५० टक्के गुण. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क –एनर्जी एकर्स, पोस्ट ऑफिस बिधोली, व्हाया प्रेमनगर, देहरादून- २४८००७, दूरध्वनी- ०१३५-२७७०१३७, फॅक्स – २७७६०९०, संकेतस्थळ- upes.ac.in, ईमेल- enrollments@upes.ac.in
०००
सिम्बॉयसीस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज नॉयडा– अभ्यासक्रम- बीबीए वुइथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग, कालावधी – तीन वर्षे. अर्हता- 12वी मध्ये किमान ५० टक्के गुण. कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. निवड -चाळणी परीक्षेद्वारे (http://www.set-test.org/). संपर्क- सिम्बॉयसीस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नॉयडा, प्लॉट नंबर ४७ आणि ४८, ब्लॉक नंबर ६२, सेक्टर ए, नॉयडा २०१३०१,दूरध्वनी- ०१२०- २४०५०६५, संकेतस्थळ-http://www.scmsnoida.ac.in/,ईमेल-admissions@scmsnoida.ac.in
ॲमिटी युनिव्हर्सिटी– अभ्यासक्रम- बीबीए वुइथ मार्केटिंग ऍ़ण्ड सेल्स, कालावधी-तीन वर्षे. अर्हता- १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क संकेतस्थळ-amity.edu